फर्जंद: थरारक युद्धपट!
(हा लेख २० जून २०१८ या दिवशी लिहिला असून त्या दरम्यान आणि नंतर वारेच दिवस मिसळपाव वर काहीतरी कारणास्तव मला लेख अपलोड करता येत नव्हते. म्हणून आता टाकत आहे)
(हा लेख २० जून २०१८ या दिवशी लिहिला असून त्या दरम्यान आणि नंतर वारेच दिवस मिसळपाव वर काहीतरी कारणास्तव मला लेख अपलोड करता येत नव्हते. म्हणून आता टाकत आहे)
२०१० मध्ये अचानक जफर पनाहीच्या अटकेची बातमी जगासमोर आली. जगातल्या जवळपास सगळ्या देशांमधून या अटकेच्या निषेधात सूर उमटला. पण इराणीयन सरकार ठाम होतं. जफरवर सरकारविरोधात जनमत भडकवण्याचा ठपका ठेवला गेला होता. एका अर्थाने तो देशद्रोहच होता. त्यांना ६ वर्षांची कैद झाली. कैदेवर भागलं नाहीच तर पुढची किमान वीस वर्ष त्यांच्यावर चित्रपट बनवण्यापासून, लिखाण करण्यापासून , आपली मतं-विचार सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यापासून आणि देश सोडण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं. जफरनी असं काय केलं होतं कि त्यांच्याच मातृभूमीतलं सरकार त्यांना अशी सजा देत होतं ?
'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच.
एखाद्या देशात जर एक असा कलाकार असेल ज्याचे चित्रपट नेहमीच आंतरराष्ट्रीय स्थरावर नावाजले गेले आहेत आणि जातात. त्याला आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार किंवा सन्मान मिळाले आहेत, ज्याचे चित्रपट जगातल्या सर्व मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले जातात, तर त्या कलाकाराचं त्याच्या देशात काय स्थान असेल? देशातल्या सरकार कडून त्याला मिळणारी वागणूक कशी असेल? ते त्याच्या चित्रपट बनवण्यावर किंवा लिखाण करण्यावर २० वर्ष बंदी नक्कीच घालणार नाहीत… पण समजा हा कलाकार इराण सारख्या कट्टर मुस्लीम राष्ट्रातला असेल तर? वरचं विधान शक्य आहे.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)
कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट
पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?
तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही
तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?
आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस
त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?
आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?
त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने
आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?
नमस्कार ,
चित्रपट समीक्षण वगैरे करण्याइतका मी दर्दी नाही.. त्यातही इंग्लिश चित्रपट --ज्यातले सगळे संवाद नेमके कळाले असतीलच असं नाही.. झरकन जाणारे सगळे सब टाईटल्स सुद्धा १००% वाचले गेल्याची शक्यता नाही. झालंच तर पात्रांची नावं पण विसरलोय (इंटरनेटवर पुन्हा शोध घेता येईल पण कट्ट्यावर गप्पा मारताना कशाला पुन्हा तो खटाटोप).. तर समीक्षण नाही पण एका सुंदर चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटतेय.. ते सांगण्याचा हा प्रयत्न
२०११ च्या काळात इजिप्त धुमसत होता. मुस्लीम ब्रदरहूड आणि जनता यांच्यातला वाद शिगेला पोचला होता. तेहरीर चौक या सगळ्या घडामोडींचं केंद्र बनलं होतं. रोज हजारो माणसं तिथं येत-जमत, निदर्शनं करीत असतं. तेव्हा ’एक २०-२२ वर्षांची मुलगी आपल्या कॅमेरानं हे सगळं टिपत असे. आजूबाजुची परिस्थिती, अंधाधुंद माजलेली अराजकता, वारंवार निघणारे मोर्चे-निदर्शनं, त्यांच्यावरची दडपशाही, लष्कराचं डोळ्यात भरणारं अस्तित्व, जनतेतला रोष असं बरचं काहीसं तिनं आपल्या कॅमे-यात कैद केलं होतं.
आयुष्याच्या महत्वाच्या गरजा भागलेली आजची तरुणाई. कुठच्यातरी भयंकर अडचणींमधून मार्ग काढून काहीतरी नेत्रदीपक करण्याची निकड संपलेली. जगण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोय, हे कळण्याइतका विचार करण्याची सवय नाही, आणि तरी त्या प्रश्नाच्या गर्तेत कधी ना कधी अडकून भरकटणारी, त्या डोळ्यांत भरणाऱ्या भरकटलेपणावर आपापल्या कुवतीने उत्तरं शोधणाऱ्या, सुचवणाऱ्या जगावर कावलेली तरुणाई.
" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो "
काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे. त्यामुळे चित्रपट पाहणे मस्ट झाले.