४ गोष्टींच्या निमित्ताने!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
15 Jul 2018 - 5:38 pm

'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच.

खरतर या मालिकेतल्या छोटेखानी ४ कथा या रूढार्थाने 'कथा' म्हणण्यापेक्षा, त्या पात्रांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत. सरधोपट शेवट-सुरुवात न करता त्यांच्या जीवनातला एक तुकडा दिग्दर्शकांनी आपल्या समोर मांडला आहे. किमान पहिल्या ३ कथांमध्ये तरी हे अगदी प्रकर्षानं जाणवत.
जे सगळीकडे परीक्षण इ. मध्ये सांगून झालंय की या ४ कथांमध्ये समान-सूत्र म्हणजे स्त्रियांच्या भावना व्यक्त होतात. ते खरं आहेच. पण मला त्या पलीकडे जाणवलेली गोष्ट म्हणजे या ५ हि नायिका(शेवटच्या गोष्टीत मी नेहा धुपिया ला पण नायिका गृहीत धरतोय) आपल्या भावनांविषयी प्रामाणिक आहेत. कुटुंब/जवळचे लोक यांच्या समोर ती गोष्ट आल्यावर किंवा त्यातून विलग होण्याची वेळ आल्यावर सुद्धा त्यांना त्याचा पश्चाताप होतोय असं नाही वाटत.

नैतिक/अनैतिक हा वाद जरा बाजूला ठेवून बघितलं तर लक्षात येत कि 'नवरा आणि मित्र एकच व्यक्ती कसे असू शकत नाहीत' म्हणणारी 'राधिका आपटे'; काही न बोलता समजून घेऊन मूकपणे खूप काही व्यक्त होणारी 'भूमी पेडणेकर'; नवऱ्याला खरं सांगून अगदी मुक्त होणारी 'मनीषा कोईराला', आपलं सुख आपणच शोधावं लागत हे सांगणारी 'नेहा धुपिया' आणि 'मी काही चूक केली नाही फक्त जागा चुकली' हे ठामपणे सांगणारी 'कियारा अडवाणी' या सर्वांनी स्वतःला स्वीकारलेलं आहे. माझ्या मते ते मोठ्ठ पाऊल आहे. समाज/कुटुंब यांच्या आधी आपण स्वतःला स्वीकारलं कि सगळं सोपं होत.

नेहा धुपिया च्या फँटसी विषयी प्रिन्सिपलला समजतं म्हटल्यावर त्याचा बाऊ न करता म्हणते, 'ठीक है, कोई मर नहि गया!'
मला एकंदरीत भावला तो हा प्रामाणिकपणा!

रच्याकने: यावर पण लिहावं हे सुचवलं डॉ. कुमार१ यांनी.
धन्यवाद सर :)

कलाचित्रपटप्रकटनआस्वादमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Jul 2018 - 5:52 pm | कुमार१

तुमचे भाष्य. मला भावलेले मुद्दे:
१. भारतीय सेन्सॉर ला वगळून थेट Netflixवर असे दाखवता येणे. याचीही गरज आहेच.

२. भूमी पेडणेकर वाली गोष्ट सर्वात आवडली तर राधिका वाली बोअर झाली

३. चौथ्या गोष्टीतून 'स्त्रीचे परमसुख (climax)हा एरवी त्याज्य समजला जाणारा विषय मांडला तेही आवडले.

लई भारी's picture

16 Jul 2018 - 8:49 am | लई भारी

मला सुद्धा दुसरी गोष्ट जास्त आवडली.
खूप subtleपणे व्यक्त झालीय. open-ended असणंच जास्त भावलं.