हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...
सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.