मोबाईलच्या देवा तुला.....
मोबाईलच्या देवा तुला
टचिंग टचिंग होऊ दे
नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे
जरि लेनं गरिबीचं
घेऊ हाती स्मार्टफोनचं
असल जरि चायना तरि
दिसायला अॅपल किंवा, अँड्रॉयडवानी असु दे
मोबाईलच्या बॅटरिची
कांडी होई वरखाली
स्विचऑफ आता होईल देवा
चार्जर मातुर बारिक पिनचा, युनिवर्सल होऊ दे
चॅट थोडे कॉल थोडे
करतो आम्ही कधीमधी
मॅसेज येती मॅसेजवरी
वाचायला, पचायला अंगी बळ येऊ दे
नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे
------अकस्मात हल्ला विप्लव