आशा
नौका ही बांधलेली
राहील का बांधलेली
उरात भरूनी वारे
ही पाहतो निघालेली
वादळे येती तरी
लाटा फोडून ती गेली
थांबलो तेथेच मी
ती निघून गेलेली
मी असेन येथेच
वेळ नाही गेलेली
परत कधी येईल ती
आशा न विझलेली
नौका ही बांधलेली
राहील का बांधलेली
उरात भरूनी वारे
ही पाहतो निघालेली
वादळे येती तरी
लाटा फोडून ती गेली
थांबलो तेथेच मी
ती निघून गेलेली
मी असेन येथेच
वेळ नाही गेलेली
परत कधी येईल ती
आशा न विझलेली
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती ,
पेपरमध्ये वाचले
"आम्हा घरी धन,*
*शब्दांचीच रत्ने..."
_ जगतगुरू तुकाराम
मी सुटलो... बुंगाट
आम्हा घरी धन,
शब्दांचीच रत्ने,
जुळवू प्रयत्ने,
यमके ही.
काय हे जाहले,
कोसळला बाजार,
कोणता आजार
म्हणावा हा?
जगाचा पोलीस पाटील,
तू ते तर मी हे करेन
भेदरला बिचारा युक्रेन
युद्ध ज्वर
लोक हैराण त्यात,
निवडणूक धुरळा,
जणू अंगावर झुरळा,
झटकती
वाहक ही गांजले
इथे ट्रॅफिक जाम
अमृतांजन बाम,
चोपडती
कोणे एके काळी
व्हॅलेंटाईन दिनी
मोठ्या उत्सुकतेने
मी आणली होती साडी
होती जरी साधी
ती खुश मात्र झाली
प्रयत्न केला खूप तिने
पण नीट नेसता नाही आली
गोंधळली क्षणभर हसली
ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी
पण गोड आठवण प्रेमाची
तिने अजूनही जपून ठेवली
आता एवढ्या वर्षांनी
सुचतील कशा प्रेम ओळी
पण मला पाहायची असते
तिच्या गालावरील सुंदर खळी
त्यासाठी कविता विनोदी
ऐकून म्हणे अजून नाही जमली
मला वाटलं कविता
तिला म्हणायचं होतं साडी
(सौं साठी!)
पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर
कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली
लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव
तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली
बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही
जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही
निर्झरातून वाहणारे
सागरातून लहरणारे
खोल आतून उमलणारे
मी पणाशी झुंजणारे
वास्तवाच्या वाळवंटी
मृगजळे साकारणारे
जाणतो मी स्वल्प काही
जाणिवेला छेदणारे
नेणिवा ओलांडणारे
भोवताला व्यापणारे
व्यापुनी हुलकावणारे
नश्वराच्या चौकटीतून
शाश्वताशी बोलणारे
शोधतो मी गूढ काही
युगायुगांचे असते एकटेपण
लाखोंच्या सोबतीने जगताना
खोल खोल भासते आयुष्य
रितेपन भरून काढताना
अनामिक नात्याची वीण
दिसते कधी घट्ट बसताना
नकळत मग तुटते काही
तिथे मनापासून गुंफताना
डोळ्यादेखत ढळते, ज्यात
वेचले आयुष्य रचताना
हे असे घडू नये वाटते
नेमके तेच घडत असताना
पतंग विसरतो दाहकता
पिंगा घालून जळताना
आयुष्यही असते असेच
कळते जगत जाताना
- संदीप चांदणे
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली.
"या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता.
आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर.
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं...
*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट*
मुर्द्राक्षास...
मुरवि मनोहर द्राक्षालागी
सुधा मधुर अन् गंध केशरी
मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी
अशी चालली मधुरा-मधुरी
द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम्
पाकामधले केशर मधुरम्
द्राक्षरसासह मधुमद मधुरम्
द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम्
- कौस्तुभ आजगांवकर
*मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा