कविता वसंत ऋतु
-
*वसंत ऋतु*
टपो-या कळीचे होई फुल,
दरवळे सुंगध मोग-याचा,
जाई, जुई, चाफा ही फुलतो,
शिडकावा होई प्रसन्नतेचा !!
अत्तराच्या कुप्या जणू का
फुलांमधी लपल्या असती,
सुगंध तयांचा वा-यासवे ,
वाहत राहे सभोवती !!
पळस,पांगारे, निलमोहर,
झुंबर पिवळे बहाव्याचे,
लाल,निळ्या या रंगछटांनी
सौंदर्य बहरते सृष्टीचे !!