खातोश्री
(50 लाखांचं घड्याळ)
टिक टिक टिक टिक
टिक टिक टिक टिक
चालते आहे घडी.
भ्रष्टाचार धूण्याची हो
सापडेल का कुठे वडी?
2 कोटी च्या भेटीनं
उभारली पाडवा गुढी
डायरी मधे नोंद पहा
मिळाली आहे बडी
कुटूंबाची चंगळ चाले
बांधली राष्ट्रवादी घडी
तीन नापास, सत्तेत आले
खेळून एक डाव रडी
टिक टिक टिक टिक
टिक टिक टिक टिक
चालते आहे घडी.
भ्रष्टाचार धूण्याची हो
सापडेल का कुठे वडी?
कॅमेरा असता, घड्याळात तर
वेब सिरीयल काढेल ईडी
जेलमधे जाल जेव्हा
चालेल जनता-जनार्दन छडी.
प्रतिक्रिया
29 Mar 2022 - 8:10 am | कर्नलतपस्वी
घडी घडी मरण तुझे......
भारी ,बघतो काही सुचत का
30 Mar 2022 - 12:30 am | बाजीगर
बघा काय जुळतय का
एसटी कर्मचारी...वगैरे
31 Mar 2022 - 7:48 pm | चौथा कोनाडा
लै भारी.
आता घड्याळाच काटे फिरवेल:-)