किती काळ झुलवायचे
खरे सांग आता तुझ्या बंद ओठी कितीदा नाव माझे उमटायचे
किती यायच्या सरी या उरी अन किती अश्रू पाण्यात सिमटायचे
तुझी नक्षत्रे बिलगली घराला पुढे चांदण्यांना कसे रेटायचे
मळभ ढगांचे पुन्हा पांघरोनी माझ्या नभाने किती दाटायचे
उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे
भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे
गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे
कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे