कविता वसंत ऋतु

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
6 Apr 2022 - 5:48 pm

-
*वसंत ऋतु*
टपो-या कळीचे होई फुल,
दरवळे सुंगध मोग-याचा,
जाई, जुई, चाफा ही फुलतो,
शिडकावा होई प्रसन्नतेचा !!

अत्तराच्या कुप्या जणू का
फुलांमधी लपल्या असती,
सुगंध तयांचा वा-यासवे ,
वाहत राहे सभोवती !!

पळस,पांगारे, निलमोहर,
झुंबर पिवळे बहाव्याचे,
लाल,निळ्या या रंगछटांनी
सौंदर्य बहरते सृष्टीचे !!

पक्षी झाडांवरी आनंदे,
किलबिलती, विहरत जाती,
कोकीळही मंजूळ स्वरांनी
वसंतॠतुचे स्वागत करिती !!

ग्रीष्माच्या दाहक झळांनी,
धरती होती तप्त झाली,
वसंतातल्या नवपालवीच्या,
शितलतेने तृप्त जाहली !!
--©️वृंदा मोघे
05/04/2022.

कविता

प्रतिक्रिया

बाजीगर's picture

15 Apr 2022 - 9:08 am | बाजीगर

चित्रदर्शी कविता...
चित्रदर्शी च नव्हे तर स्वर ,रंग व सुगंध ...हवेची झूळूक यां सर्वांचा अनूभूती देणारी कविता....

अतिसुंदर !!
धन्यवाद

VRINDA MOGHE's picture

16 Apr 2022 - 9:54 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद