(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)
पेरणा http://misalpav.com/node/49655
अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे
ऐसे(ही) ऐकिले आकाशी
(१) केव्हातरी एकदा म्हणे
दारू हा विषय सोडून
ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"