(मन भूत भूत ओरडते..)
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...
आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन
(मन भूत भूत ओरडते..)
तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी
का बाहेरची बाधा होते?
मळभ दाटते तेव्हा
मन भूत भूत ओरडते..
सहावे इंद्रिय जेव्हा
शंकांची उडवीते राळ,
आवेग जरा वा-याचा
भासतो जणू वेताळ..
मिटताच डोळे माझे
उभा मज समोर ठाकतो,
रोज मला उठवाया
तो झोटिंग बनुनी येतो..