वो शाम...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
2 Mar 2020 - 9:02 am

1 तू म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू आरामात..
मी आपली बसले, तुझ्याशी काटकोन करून कोप-यात!
पण तो काटकोन सांभाळताना मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला??
आणि म्हणे "आरामात बसू"!

2 पाणीचं होतं की अजून काही?
अख्खा जग संपवला मी हावरटासारखा.
तुला वाटलं असेल वाळवंटातून आलीये ही...
पण एखाद्याच्या हातचं पाणी किती ते गोड लागावं??
शप्पथ!

3 तू दरवाजा बंद केलास आणि माऊ तुझ्या पायात..
इतकं अलगद उचलंलस तू तिला..
तिच्यावर नाक घासलंस, तिला गालापाशी नेलंस..
बरं झालं तुझे डोळे बंद होते तेव्हा..
नाहीतर दिसलंच असतं माझ्या डोळ्यात..
किती माऊ बनायचं होतं मला ते..

4 स्कूटरवर बसल्यावर तुला कॉफी आठवली..
अन् मला अमृता..*
कॉफी तर संपून गेली इकडंचतिकडंच बोलता बोलता...
पण ते वीतभर अंतभर ठेवायच्या नादात,
राहून गेल्या नं तुझ्या पाठीवरच्या रेघोट्या?

5 इतकं चांगलं कुणी असू नये
इतकं देखणं कुणी हसू नये
इतकं लाघवी कुणी बोलू नये
इतकं जवळ कुणी बसू नये..
नाही बुवा झेपत आपल्याला मग शहाण्यासारखं वागणं..

6बरं झालं बारावीनंतर गणित सुटलं..
नाहीतर त्या संध्याकाळच्या अशा infinite probabilities मध्ये मी नक्कीच हरवून गेले असते..

7 किसी शहर की किसी गली के
किसी कोने में खड़ी..
किसी इमारत के किसी दफ्तर के
किसी कोने में गुजरी
किसी इतवार की कोई शाम....
किसी मन के
किसी कोने से
गुजरने का नाम ही नहीं लेती....

(* अमृता प्रीतम स्कूटरवर साहीरच्या मागे बसून त्याच्या पाठीवर बोटांनी लिहित असे. तो reference आहे.)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2020 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त लिहिली आहे.

प्राचीताईंचा कवितेगणिक बेंजामिन बटन होतो आहे..... बहुतेक...

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 9:50 am | प्राची अश्विनी

म्हंजे????

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2020 - 11:15 am | ज्ञानोबाचे पैजार

तो पण असाच दिवसागणिक तरुण होत होता...
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 12:51 pm | प्राची अश्विनी

गुगललं

श्वेता२४'s picture

2 Mar 2020 - 10:02 am | श्वेता२४

किती माऊ बनायचं होतं मला ते..
माऊ बनायला कुणाला आवडणार नाही? ;)).......
हे खूपच छान.....

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 12:51 pm | प्राची अश्विनी

:)

चौथा कोनाडा's picture

2 Mar 2020 - 1:05 pm | चौथा कोनाडा

इतकं चांगलं कुणी असू नये
इतकं देखणं कुणी हसू नये
इतकं लाघवी कुणी बोलू नये
इतकं जवळ कुणी बसू नये..
नाही बुवा झेपत आपल्याला मग शहाण्यासारखं वागणं..

वाह, क्या बात है, किती लोभस आवाका !
सर्वच कविता सुंदर आहेत !

प्रचेतस's picture

2 Mar 2020 - 6:07 pm | प्रचेतस

क्या बात..!
खूपच सुरेख

शलभ's picture

2 Mar 2020 - 7:19 pm | शलभ

सुरेख.. खूप आवडली.

राघव's picture

2 Mar 2020 - 8:29 pm | राघव

आवडली.

निओ's picture

2 Mar 2020 - 11:24 pm | निओ

खूप छान

तुषार काळभोर's picture

3 Mar 2020 - 5:58 am | तुषार काळभोर

किती तरल.. किती साधं..

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2020 - 9:04 am | प्राची अश्विनी

सर्वांंना मनापासून धन्यवाद.__/\__

पलाश's picture

4 Mar 2020 - 8:09 am | पलाश

फार सुंदर! आवडलीच! :)

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2020 - 5:31 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2020 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. तुम्ही तुमच्या निवडक कवितांचं पुस्तक करा.
शुभेच्छा आहेतच. लिखते रहो.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2020 - 5:31 pm | प्राची अश्विनी

:)
तुम्ही असं म्हटलंत यात सगळं आलं!_/\_