वो शाम...
लेखनप्रकार
1 तू म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू आरामात..
मी आपली बसले, तुझ्याशी काटकोन करून कोप-यात!
पण तो काटकोन सांभाळताना मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला??
आणि म्हणे "आरामात बसू"!
2 पाणीचं होतं की अजून काही?
अख्खा जग संपवला मी हावरटासारखा.
तुला वाटलं असेल वाळवंटातून आलीये ही...
पण एखाद्याच्या हातचं पाणी किती ते गोड लागावं??
शप्पथ!
3 तू दरवाजा बंद केलास आणि माऊ तुझ्या पायात..
इतकं अलगद उचलंलस तू तिला..
तिच्यावर नाक घासलंस, तिला गालापाशी नेलंस..
बरं झालं तुझे डोळे बंद होते तेव्हा..
नाहीतर दिसलंच असतं माझ्या डोळ्यात..
किती माऊ बनायचं होतं मला ते..
4 स्कूटरवर बसल्यावर तुला कॉफी आठवली..
अन् मला अमृता..*
कॉफी तर संपून गेली इकडंचतिकडंच बोलता बोलता...
पण ते वीतभर अंतभर ठेवायच्या नादात,
राहून गेल्या नं तुझ्या पाठीवरच्या रेघोट्या?
5 इतकं चांगलं कुणी असू नये
इतकं देखणं कुणी हसू नये
इतकं लाघवी कुणी बोलू नये
इतकं जवळ कुणी बसू नये..
नाही बुवा झेपत आपल्याला मग शहाण्यासारखं वागणं..
6बरं झालं बारावीनंतर गणित सुटलं..
नाहीतर त्या संध्याकाळच्या अशा infinite probabilities मध्ये मी नक्कीच हरवून गेले असते..
7 किसी शहर की किसी गली के
किसी कोने में खड़ी..
किसी इमारत के किसी दफ्तर के
किसी कोने में गुजरी
किसी इतवार की कोई शाम....
किसी मन के
किसी कोने से
गुजरने का नाम ही नहीं लेती....
(* अमृता प्रीतम स्कूटरवर साहीरच्या मागे बसून त्याच्या पाठीवर बोटांनी लिहित असे. तो reference आहे.)
वाचने
10046
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
सुरेख
In reply to सुरेख by ज्ञानोबाचे पैजार
म्हंजे????
In reply to म्हंजे???? by प्राची अश्विनी
बेंजामिन भाईको नही जानती....???
In reply to बेंजामिन भाईको नही जानती....??? by ज्ञानोबाचे पैजार
गुगललं
ओहो.......... जबरदस्त
In reply to ओहो.......... जबरदस्त by श्वेता२४
:)
इतकं चांगलं कुणी असू नये
क्या बात..! खूपच सुरेख
सुरेख.. खूप आवडली.
छान!
मस्त
वा.. बहोत खूब!
सर्वांंना मनापासून धन्यवाद.__
फार सुंदर! आवडलीच! :)
In reply to फार सुंदर! आवडलीच! :) by पलाश
;)
क्या बात है.
In reply to क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)