तेव्हापासून..
'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..!
उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..! हे बरं नाही..
हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय..
म्हणजे समजा पुस्तकं घ्यायला गेल्यावर नेहमीच्या सवयीनं एखादं पान उघडून अधलामधला पॅराग्राफ चाळला आणि असलं एखादं टुकार वाक्य दिसलं की अर्ध्या सेकंदात पुस्तक मिटून जागच्या जागी जातं आणि मानसिक प्रतिक्रिया, शेरेबाजी चालू होते...शिवाय कुजकं हसू येतं ते वेगळंच...