गाणी - मनातली
हिंदी फिल्म इंडस्ट्रीने जीवनातल्या प्रत्येक घडीसाठी, प्रसंगासाठी, घटनेसाठी गाणी पुरवलेली आहेत. तुम्ही कोणताही प्रसंग डोळ्यासमोर आणा, त्याला साजेसं गाणं तुम्हाला नक्कीच सापडेल. प्रियकराला स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करायला हिंदी गाणी जितक्या आस्थेने मदत करतात तितक्याच आस्थेने प्रेमभंग झालेल्या हृदयाला पिळवटून टाकणारी गाणी तत्परतेने पुढे येतात.