जिंदगी का क्या पता .. राहे किस ओर मुडेंगी.
हाल हो ... बेहाल हो ....चलना अपना काम है...
मागील दुवा ध्रांगध्रा-३ http://misalpav.com/node/49727
गाणे गुणगुणायला सुरवात कोणी केली ते सांगता येणं कठीण आहे. पण आम्ही दोघेही तेच गाणं गुणगुणतोय. इतका वेळ ती चढणीची वाटणारी वाट आता तितकीशी चढणीची वाटत नाहिय्ये.डोंगरात चालताना ती गोष्टीत असते तशी दाट झाडी तशीही नव्हतीच तुरळक एखादे झाड दिसायचे तेही आता नव्हते.
पायाखाली येऊन घसरायला होणारे गवत आता जवळजवळ नाहिसे झालंय. पायवात निसरडी नाही पण मुरुमाड धुळीची झालीये.. पण आम्हाला आता डोक्यावरचे ऊनही जाणवत नाहिये.
थोडावेळ चालल्यावर आमच्म गुणगुणणे बंद पडले. बहुतेक आम्ही मनातच गायला लागलो.काहितरी वेगळे जाणवायला लागलय.कसलीशी शांतता.वार्याचा आवाजही येत नाहिय्ये. पक्ष्यांचे आवाज येणे कधीचेच बंद झालंय.
शाम्ततेच्म एक असते. प्रत्येकासाठी ती एकाच वेळेस वेगवेगळी असते. कोणासाठी वेदना विसरायला लावणारी असते, कोणासाठी ती रागाचा पारा चढवणारी असते , कोणासाठी ती जीवघेणी असते, तर कोणासाठी ती हा क्षण संपूच नये असाच थांबवून ठेवावा असे वाटायला लावणारी असते. पण ही शांतता वेगळीच आहे, थिजलेली वाटतेय.
"शिवा... एक जाणवलं का? ती दोघेही आपल्यापासून काहीतरी लपवताहेत. " महेशने त्या थिजलेल्या शांततेचा भंग केला. महेशचे शब्द सुद्धा खूप लांबून चालून आल्यासारखे थकलेले वाटताहेत. अनोळखी एखाद्या खोल विहीरीतून यावेत तसे. मी चमकून पाहिले. महेश फारतर माझ्या पासून दोन तीन फुटांवर आहे. त्याचे ओठ हलताहेत पण शब्द थोड्या वेळानंतर ऐकु येताहेत.डबिंग चुकलं की चित्रपतातलं पात्र अगोदर बोलताना दिसते आणि ते बोललेलं नंतर ऐकू येतं तसे काहीसे.महेश पण माझ्याकडेच पहातोय......... हा भास होतोय की कसे तेच कळत नाहिये. कदाचित इतकी चढण चढल्यामुळे दम लागून चक्कर आली असावी.म्हणून तसे भास होत असतील म्हणावे तर चालून तेही डोंगराच्या चढावर चालून आलो तरी थकवा तहान असे काही जाणवत नाहिय्ये. मी पुन्हा महेश कडे पहातो. त्याला पाणी हवंय सांगतो.
माझे बोलणेही महेशपर्यंत उशीरा पोहोचत असावे. त्याचा चेहेरा हळू हळू बदलतोय. फिल्म अडकत अडकत पुढे चालल्याप्रमाणे. त्याने पाणाची बाटली सॅकमधून काढली. तीचे झाकण उघडले.त्यातून हेंदकाळून पाणी बाहेर आले. पाण्याचे तीन चार लहानमोठे थेंब महेशच्या हातावर पडून फुटले. त्या थेंबांचा गोलाकार चपटा चकती सारखा झाला . ...... हे सगळं स्लो मोशनमधे दिसतय.
महेशलाही बहुधा तसेच दिसत असावे.त्याचा चेहेरा घाबरलेला, डोळे विस्फारलेले, त्याने हात पुढे करून मला पाण्याची बाटली दिली.
मी घेतली. मला वाटतय महेश खाली पडतोय, मी दुसरा हात पुढे करतो. महेश माझे मनगट पकडतो. एखाद्या झाडाच्या शुष्क मुळीने माझा हात पकडलाय अस वाटतय.
माझ्या मनगटावर महेशच्या हाताची पकड घट्ट होत चाललीये.मला जाणवण्या इतकी घट्ट, आणखी घट्ट , आणखी घट्ट, ..... मनगट तुटेल असं वाततय.
मी महेशकडे पहातो. त्याचे डोळे इतके मोठे झाले आहेत की बुब्बुळं डोळ्याच्या खोबणीतून बाहेर पडतील. डोळ्यात कसलीतरी अनामिक भीती. महेशचे डोळे मोठे होताहेत.आणखी मोठे..... अगदी बटाट्यासारखे झालेत. त्याच्या तोम्डातुन शब्द फुट्त नाहिय्ये. तो एका हाताने नुसताच हातवारे करतोय.संथ गतीने..... संथ गतीने फिल्म चालावी तसे. महेशने माझा हात घट्ट पकडलाय.मात्र तो दूर जायला लागलाय. मला ओढ जाणवते.
मी ओरडतो. महेश....... महेश..... माझा जबडा वासलाय. पण घशातून एकही आवाज बाहेर पडत नाहिय्ये. महेश खाली पडतोय, माझ्या हाताला हिसडा बसलाय.
पडलो तर काहितरी आधार हवा म्हणून मी दुसरा हात आजूबाजूला फिरवला. हात नुसताच हवेत फिरला. महेशने ओढल्यामुळे माझा तोल गेलाय.. मी खाली पडतोय. महेश पण खाली पडतोय. ..... एकदम संथ गतीने..... डोकं दगडावर आदळू नये याची काळजी घेतोय. पी खाली पडलोय. पायवाटेवर.डोळ्या समोर अंधार होत चाललाय. त्याही अवस्थेत मी वर पहातो. सुर्याला एका काळ्या मातकट ढगाने झाकून टाकलंय. उजेड संपत चाललाय.
जाणवण्यासारख्या दोनच गोष्टी. माझ्या मनगटावरची घट्ट होत जाणारी महेशची "पकड" आणि अंधार......
क्रमशः
प्रतिक्रिया
4 Jan 2022 - 8:25 am | विजुभाऊ
ध्रांगध्रा - ५ http://misalpav.com/node/49735
4 Jan 2022 - 11:15 am | गवि
उत्कंठावर्धक. छोटा आहे भाग खूप. पुढचा लगेच टाकलात ते बरं केलंत. आता वाचतो.
8 Jan 2022 - 1:29 pm | चौथा कोनाडा
काय होणार महेशचं ?
हा ही भाग उत्कंठावर्धक !!