उथळ
पुल देशपांडे उर्फ भाई यांस,
उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई
सूज्ञांची परिवशता
अंत कळत नाही.
उथळ .......
रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस
पुरुष लचकती
नाटक वा सिरियल हो
तेच सूत्र भाई
उथळ ........
अकलेला साजिशी
गोष्ट निर्मिती
लांबण किती चालावी
हेच कळत नाही
उथळ .......
नवल मनीं हे वाटे
'गुरु' जनांचे
'पीजे' ला ' सिद्धु' हास्य
खंत उरी राही
उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई !