शिक्रेट (शतशब्दकथा)

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 6:05 pm

म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला!
लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते.
''काकू जरा मुरवण देता का?''
''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू.

मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू.

काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत.
पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी.
नायतर मग चवकशा सुरूच-
''सुमी रोज कशाला येती?''
''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?''

उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच!

मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.
पन तायडीला तशी समज नाय..
काकूंचं आन माजं शिक्रेटच हाय!

कथासमाजजीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

27 Oct 2016 - 6:58 pm | जव्हेरगंज

मुरवान म्हणजे काय?

कथा नेमकी कळली नाही. पण वाचायला मजा आली!!

यशोधरा's picture

27 Oct 2016 - 7:00 pm | यशोधरा

मुरवान= विरजण?

खेडूत's picture

27 Oct 2016 - 9:36 pm | खेडूत

बरोबर.
पश्चिम महाराष्ट्रातला शब्द आहे तो.
*गरीब शेतमजूरांच्या घरी शेती नसल्याने भाजी म्हणजे चैन ठरते, पण कधीमधी शेजारी विरजण मागणे अगदी सर्वसामान्य आहे. ही मुलगी प्रत्यक्ष भाजी मागू शकत नसल्याने विरजणाच्या निमित्ताने रोजच दोन बहिणींच्या जेवणाची सोय पहाते आहे. समजुतदार शेजारी त्यांना मदत करत असत.
(*प्रत्यक्ष पाहिलेली घटना कथेत मांडायचा प्रयत्न. या तिसर्‍या नकुशीनंतर त्यांना आणखी एक बहीण मिळाली!)

अर्धवटराव's picture

27 Oct 2016 - 9:50 pm | अर्धवटराव

काकुसुद्धा या परिस्थितीतुन गेल्या असतील असं काहिसं माझं इट्रप्रिटेशन होतं

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2016 - 12:43 am | बोका-ए-आझम

काकूंचं आणि माजं शीक्रेट - ते असंच काहीतरी असणार.

विचित्रा's picture

27 Oct 2016 - 9:59 pm | विचित्रा

आवडली शशक

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 9:59 pm | टवाळ कार्टा

:(

निओ's picture

28 Oct 2016 - 12:33 am | निओ

आवडली

एस's picture

28 Oct 2016 - 6:06 am | एस

शिक्रेट टोचलं.