ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम -भाग २
---------------------------
सिनिअरचा सिनिअर : बरं तुम्ही सुट्टीत मुलांना बायकोला घेऊन फिरायला जाता काय ?
मी : नाही, आम्ही सुट्टीत गावी जातो.
सिनिअरचा सिनिअर : बरोबर. काही वर्षांपुर्वी मी देखील हेच करायचो. कारण सुट्टीमधे कुठे फिरायला जायचे म्हणजे कमीत कमी ४०-५० हजार तर पाहिजेतच. ते आपल्याकडे नसतात म्हणून बेसीकली आपण गावी जातो. तुमच्या बायकोला विचारा बर की आपण दुबईला, मलेशियाला फिरायला जायचं का ? पाहिजे तर पुढल्या सुट्टीत गावी जाऊ. आय बेट, ती एका पायावर तयार होईल.