... असंही होतं ना कधी कधी....
... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!
... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
... असंही होतं ना कधी कधी....