मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
8 Nov 2016 - 9:55 pm | वगिश
ट्रेकर असो वा नसो, नोटा बदलण्याच्या प्रक्रियेत सर्व काळा पैसा बाहेर पडेल. मास्टर स्ट्रोक.
8 Nov 2016 - 9:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा असल्याने आणि त्यासाठी पॅन/ आधार वगैरे लागत असल्याने काळा पैसावाल्यांना शिस्तीत बुच बसलेलं आहे =))!!
9 Nov 2016 - 2:45 pm | टवाळ कार्टा
हे नक्की आहे का?
9 Nov 2016 - 8:09 pm | वगिश
Exchange la survatila kahi diwas (24 Oct) 4000 limit aahe, per day.
8 Nov 2016 - 9:56 pm | खेडूत
निर्णयाचं स्वागत करायला हवं.
तीसेक वर्षं ही मागणी होती, पण राजकीय इच्छा नसावी.
आता परिणामांबाबत विश्लेषणाच्या प्रतिक्षेत!
(शीर्षक दुरूस्त करायला हवं. बंदी नाहीय ती.)
8 Nov 2016 - 10:03 pm | ट्रेड मार्क
मला Abolish ला योग्य शब्द सुचला नाही. कृपया योग्य शब्द सुचवा.
8 Nov 2016 - 10:10 pm | शाम भागवत
रद्द करणे
8 Nov 2016 - 9:59 pm | वगिश
गरीबांना आनंद आणि श्रीमंतांना घाम. आता पळवाट शोधने औघड आहे.
8 Nov 2016 - 10:01 pm | वगिश
श्रीमंत खोडून काळा पैसा वाले असे म्हणायचे होते.
8 Nov 2016 - 10:24 pm | पुंबा
हेच म्हणतो..
8 Nov 2016 - 10:00 pm | ट्रेड मार्क
नुसता काळा पैसाच नाही तर आपल्या सख्ख्या शेजाऱ्यांकडून ज्या फेक नोटा चलनात होत्या त्या पण आता बाद होणार. म्हणजे त्याबाजूने पण आपला फायदा होईल आणि शेजाऱ्यांनी यासाठी इतके वर्ष जे कष्ट घेतले जे एका फटक्यात निरुपयोगी झाले.
खरंच मास्टर स्ट्रोक. मजा आ गया.
10 Nov 2016 - 10:19 am | असंका
सर्क्युलेशनमध्ये असणार्या खर्या नोटांवर भारताने घेतलेल्या कष्टांपेक्षा सर्क्युलेशनमध्ये असलेल्या खोट्या नोटांवर पाकिस्तानने घेतलेले कष्ट जास्त होते म्हणता?
8 Nov 2016 - 10:01 pm | विनोद१८
माझ्या मनातलेच लिहिले आहे आपण. आता खरी मजा येइल खेळाला, सुरवातीला बरीच व्यावहारीक गैरसोय होइल सगळ्यांची पण अतिंमतः हा एक देशहिताचा सर्वात मोठ्ठा निर्णय या सरकारने घेतला आहे, यावर कुणाचे दुमत नसावे.
8 Nov 2016 - 10:03 pm | साधा मुलगा
कृपया धाग्यावर राजकारण न आणता, प्रॅक्टिकल सल्ले आणि संपूर्ण व्यवहार कसे करावेत यासाठीचे मार्गदर्शन यावर धागा असावा एवढीच अपेक्षा आहे.
8 Nov 2016 - 10:06 pm | जव्हेरगंज
रद्दीचा भाव काय आहे सध्या?
-१२मतीकर
;)
9 Nov 2016 - 3:56 pm | विशुमित
12-मतीकर फक्त एकाच माणसाला (घराण्याला) उद्देशून असेल तर-
जरा हे पण जरा वाचत चला...!!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/welcomes-the-decision-to-demone...
तुमचा मी खूप आदर करतो पण असली वाचाळगिरी तुमच्याकडून अपेक्षित नव्हती.
आणि जर तुम्ही सकल 12-मतीकरांबद्दल बोलत असाल तर कृपया परिघाबाहेर येऊन उघड्या डोळ्यांनी तेथील सामाजिक आणि आर्थिक प्रगती पहा.
9 Nov 2016 - 11:38 pm | श्रीगुरुजी
पवारांची कृती त्यांच्या उक्तीच्या बरोब्बर विरूद्ध असते. त्यामुळे ते वर जे काही म्हणतात त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. १९९८ मध्ये सोनिया गांधींची पालखी उचलण्यात तेच आघाडीवर होते. सोनिया भारताच्या सूनबाई आहेत, त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली आहे असे सांगण्यात ते थकत नव्हते. त्याच सोनिया गांधी परकीय असल्याचा साक्षात्कार पवारांना वर्षभरातच झाला होता व त्यामुळे त्यांनी मे १९९९ मध्ये त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला होता.
१८ जुलै २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय संदर्भात निर्णय देऊन लोढा समितीचा सर्व शिफारशी ६ महिन्यांच्या आत लागू करण्याचा आदेश दिल्यावर ३-४ दिवसात पवारांनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले होते की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडण्यास माझी अजिबात हरकत नाही व पुढील ३ महिन्यांच्या आतच मी अध्यक्षपदाचा राजीनामा देईन. आता जवळपास पावणेचार महिने होत आले तरी ते अजून अध्यक्षपद सोडायचे नावही घेत नाहीत. याउलट अध्यक्षपदावर टिकून राहण्यासाठी त्यांची व इतर सर्वांची धडपड सुरू आहे. एकंदरीत बीसीसीयची गुळाची ढेप त्यांना सोडवत नाहीय्ये.
12 Nov 2016 - 11:37 pm | मृत्युन्जय
दुसरा उपाय काय बारामतीकरांकडे? उलट्ञा बोंबा मारायला त्यांच्याकडे माणासे ठेवलेली आहेत की.
14 Nov 2016 - 10:51 am | विशुमित
म्हणजे इथे बरेच लोक बऱ्याच लोकांसाठी ठेवलेली आहेत, असा अर्थ धुनीत होतो...!!
काल बारामतीकरांच्या बोटाला धरूनच प्रधानसेवक झालो आहे असे कोणी तरी निसंकोचपणे छाती ठोकून सांगत होते..
कृपया फक्त वागण्यातला सुसंस्कृतपणा ठेवा. इथे कोणी बोंबा मारायला येत नाही, हे सभ्य लोकांचं संकेत स्थळ आहे.
14 Nov 2016 - 3:43 pm | श्रीगुरुजी
देशातील इतर नेत्यांकडून स्वतःवर स्तुतीसुमने उधळून घेणे साहेबांना आवडते. १९९० च्या दशकात चंद्रशेखर व इतर समाजवादी नेत्यांना बारामतीला बोलावून त्यांच्या पाहुणचार केल्यावर त्यांनी पवारांचे कौतुक केले होते. नंतर प्रणव मुखर्जी, मोदी व जेटली इ. ना वेगवेगळ्या वेळी बारामतीला बोलावून त्यांचा पाहुणचार करून साहेबांनी त्यांच्याकडून स्वत:बद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकले होते (याच मोदींवर "उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग" अशी टीका अनेकवेळा साहेबांनी केलेली आहे). एखाद्या घरी कोणी पाहुणा म्हणून गेला की तो यजमानांबद्दल चार बरे शब्द बोलतो त्यातलाच हा प्रकार. त्याने बोललेले सर्व काही खरे असते अशातला भाग नाही. २००१ मध्ये आपल्या ६१ व्या वाढदिवसाला व २०१५ मध्ये आपल्या ७५ व्या वाढदिवसाला साहेबांनी सर्व पक्षांचे नेते बोलावून स्वतःचा सत्कार करवून घेतला होता व उपस्थितांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करून त्यांना हरबर्याच्या झाडावर चढविले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी चार शब्द बरे बोलत असतील तर त्याला त्या प्रसंगापुरतेचे महत्त्व असते. जे काही बोलले गेले ते सत्य असते अशातला भाग नाही. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसते कारण त्यात कोणताही वेगळा अर्थ नसतो.
14 Nov 2016 - 5:25 pm | विशुमित
<<<<जे काही बोलले गेले ते सत्य असते अशातला भाग नाही. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसते कारण त्यात कोणताही वेगळा अर्थ नसतो.>>>>
-- म्हणजे अनेक जुम्ल्या मधला हा एक जुमला म्हणायचा. आम्ही उगाच खुश होतोय...पुन्हा अशी गल्ती नाही करणार.
पण---- एवढी स्तुती करायची खरंच काही गरज नव्हती.
""त्यांना आदर्श मानणाऱ्या अनेक लोकांपैकी मी एक आहे ही गोष्ट जाहीरपणे मान्य करताना मला अभिमान वाटतो, असे मोदी यांनी सांगितले. ""
त्यावर हाईक म्हणजे भारताच्या पंतप्रधानांनी बाळबोध होऊन एवढ्या खाली जायला नको होते--
"सार्वजनिक जीवन कसे जगायचे याचे उत्तम उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मला बोटाला धरून त्यांनी चालायला शिकवले.."
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=bBKWIt
14 Nov 2016 - 5:30 pm | पैसा
गेल्या काही दिवसातल्या मोदी-फडणवीस यांच्या उद्योगांमुळे पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रचंड नुकसान झालेले असणार आहे. त्यानंतर "मी हे तुमच्याकडून शिकलो" असे मोदींनी म्हटल्यावर पवारसाहेब जाम खुश झाले असतील असं वाटतंय का तुम्हा लोकांना? =))
14 Nov 2016 - 6:15 pm | मृत्युन्जय
+ १००
मोदींचे चुकलेच. याबाबत तिळमात्र शंका नाही
16 Nov 2016 - 6:25 pm | मोदक
मोदींचे चुकलेच. याबाबत तिळमात्र शंका नाही
+१११
14 Nov 2016 - 8:53 pm | श्रीगुरुजी
त्यात जुमलाबिमला असं काही नाही हो. एखाद्याने आमंत्रण देऊन त्याच्याकडे गेल्यावर शिष्टाचार म्हणून आपण त्या व्यक्तीबद्दल चार बरे शब्द बोलतो. त्यात काही फारसा अर्थ नसतो. त्यातून मोदी तर एखाद्याला हरबर्याच्या झाडावर चढविण्यात पटाईत आहेत. पवारांच्या ६१ व्या व ७५ व्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. त्यात प्रणव मुखर्जी, मोदी, सोनिया गांधी, डाव्या पक्षांचे नेते इ. सर्वजण होते. त्यातून अर्थ काढायचा झाला तर प्रत्येक पक्षाला पवारांच्या पक्षाशी युती करायची आहे असा अर्थ काढता येईल. परंतु तो शिष्टाचाराचा भाग होता. त्यापेक्षा त्यात काहीही कमीजास्त नव्हते. मी आधीच्या प्रतिसादात अनेक उदाहरणे दिली आहेत. इतर पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याकडून आपली आरती ओवाळून घेणे हे पवारांचे जुने तंत्र आहे. आपण राजकारणात अजून संपलेलो नाही व अजून रिलिव्हंट आहोत हे दाखविण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात. अगदी १९८३ मध्ये सुद्धा सर्वत्र कॉंग्रेसची सत्ता असताना पवारांनी पुण्यात विरोधी पक्षनेत्यांचे संमेलन बोलावून आपण राजकारणातून अजून संपलेलो नाही हेच दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
मोदी जे काही बोलले त्याने साहेबांनी हुरळून जाण्यासारखं काहीही नाही व त्यातून राजकीय पंडितांनी कोणताही अर्थ काढण्याची गरज नाही.
15 Nov 2016 - 12:00 pm | विशुमित
पण हे आरती ओवाळायला का जात आहेत, बापुडे..!!
बऱ्याच लोकांना नसेल आवडत त्यांची आरती ओवाळलेली पण आमच्या जीवाला बरं वाटतं कोणीतरी आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाची स्तुती करतंय ते.
शरद पवारांवर आपले मतभेद अखंड राहतील, यावर मात्र एकमत आहे.
धन्यवाद..!!
15 Nov 2016 - 2:51 pm | श्रीगुरुजी
त्यांना साहेब आमंत्रण देऊन बोलावितात म्हणून जातात ते. स्वतःहून ते तिथे जात नाहीत. गेल्यावर शिष्टाचार म्हणून यजमानाबद्दल चार बरे शब्द बोलतात. इतरांनी तिथे जाणे ही साहेबांची गरज आहे, इतरांची नाही कारण साहेबांनाच अजून आपण राजकारणात रिलिव्हंट आहोत हे वारंवार दाखवावे लागते.
15 Nov 2016 - 3:42 pm | विशुमित
<<<<त्यांना साहेब आमंत्रण देऊन बोलावितात म्हणून जातात ते. स्वतःहून ते तिथे जात नाहीत. गेल्यावर शिष्टाचार म्हणून यजमानाबद्दल चार बरे शब्द बोलतात.>>>
--सहमत
<<<< साहेबांनाच अजून आपण राजकारणात रिलिव्हंट आहोत हे वारंवार दाखवावे लागते.>>>
--थोडं वाक्य बदलतो "साहेबांना अजूनही आपणच राजकारणात रिलिव्हंट आहोत हे वारंवार दाखवावे लागते"
15 Nov 2016 - 11:45 pm | अर्धवटराव
गुर्जींना साहेबांची महती नाहिच पटणार कधि.
17 Nov 2016 - 8:42 pm | श्रीगुरुजी
अडवाणी, कल्याणसिंह, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, मुरली मनोहर जोशी, मनोहर जोशी, जसवंत सिंह, अरूण शौरी, देवेगौडा, शरद यादव इ. प्रमाणे साहेबही भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणात कालबाह्य झालेले आहेत. त्यांनी कितीही धडपड केली तरी आता उपयोग नाही.
14 Nov 2016 - 6:14 pm | मृत्युन्जय
इथे कोणी बोंबा मारत आहेत असे मी म्हणालो का? इथे कुणी त्यांचा ठेवलेला आहे असे मी म्हणालो का? मी कुणावरही वैयक्तिक आरोप केलेले नाहित. तुम्हाला ध्वनीत झालेला अर्थ चुकीचा आहे असे स्पष्टपणे सांगु इच्छितो.
बाकी सभ्य आम्ही आहोतच. धन्यवाद.
15 Nov 2016 - 11:46 am | विशुमित
<<<<<दुसरा उपाय काय बारामतीकरांकडे? उलट्ञा बोंबा मारायला त्यांच्याकडे माणासे ठेवलेली आहेत की.>>>>
--- बारामती मध्ये फक्त पवारच राहत नाहीत. बारामतीकर म्हण्यापेक्षा थेट शरद पवारांचे नाव घ्या की. पण मी म्हणतो कारण नसताना, पुरावा नसताना स्व कंड जिरवण्यासाठी लोकांनी पवारांचं नावाने का म्हणून पिंका टाकाव्यात? ते पण मिपा वरती?
--- उलट्या बोंबा मारायला माणसे ठेवली आहेत हे तुम्ही माझ्या जव्हेरगंज यांच्या प्रतिसादाच्या प्रतिवादालाच उत्तर दिले आहे, मग ते मलाच ध्वनित होतात ना.
--- दुसऱ्याच्या प्रतिसादाला कव्हर करण्यासाठी धावून येऊन एका विशिष्ट क्षेत्राची बदनामी करण्याची असलेली प्रवृत्ती कोणत्या सभ्येतेमध्ये बसते हे जरा कळू शकेल काय?
-- राहायला प्रश्न ५०० आणि १००० च्या नोटांचा, सकल बारामतीकरांनी नक्कीच स्वागत केलं आहे नोट बंदीचे. लोक उत्स्फुरतेने नोटा बदलून घेत आहेत. काही समस्या होत्या/आहेत त्या हळूहळू कमी होतील ही अशा आहे.
15 Nov 2016 - 1:59 pm | मृत्युन्जय
बारामती मध्ये फक्त पवारच राहत नाहीत. बारामतीकर म्हण्यापेक्षा थेट शरद पवारांचे नाव घ्या की.
बारामतीकर म्हटल्यावद बरोबर बसतात दगड. थेट नाव घ्यायची गरज नाही. घ्यायला घाबरतही नाही. मी कश्याप्रकारे लिहिणार हे मी ठरवायचे. जोपर्यंत मी इथल्या कुणाबद्द्दलही अपशब्द वापरत नाही तोवर मी बारामतीकर म्हणावे, शरद पवार म्हणावे काका म्हणावे की अजुन काही म्हणावे हे मीच ठरवेन.
पण मी म्हणतो कारण नसताना, पुरावा नसताना स्व कंड जिरवण्यासाठी लोकांनी पवारांचं नावाने का म्हणून पिंका टाकाव्यात? ते पण मिपा वरती?
कसले कारण, कसला पुरावा?
--- उलट्या बोंबा मारायला माणसे ठेवली आहेत हे तुम्ही माझ्या जव्हेरगंज यांच्या प्रतिसादाच्या प्रतिवादालाच उत्तर दिले आहे, मग ते मलाच ध्वनित होतात ना.
तुम्ही आ बैल मुझे मार करुन घ्यायला लागलात तर मी काय करु शकतो. मी काय लिहिले आहे ते पुरेसे स्पष्ट आहे. तुम्हाला ठेवले आहे किंवा नाही याबद्दल मी एक अवाक्षरही काढलेले नाही.
--- दुसऱ्याच्या प्रतिसादाला कव्हर करण्यासाठी धावून येऊन एका विशिष्ट क्षेत्राची बदनामी करण्याची असलेली प्रवृत्ती कोणत्या सभ्येतेमध्ये बसते हे जरा कळू शकेल काय?
--
मी कुणाला कव्हर करायला आलोय असे तुम्ही म्हणणे म्हणजे आश्चर्यच आहे,
बारामती, पवार, रा ष्ट्रावादी वगैरे विषय निघाले की तुम्ही धावुन येता, भाजपा / मोदीची बदनामी करता , उगाच टीका करता आणी दुसर्याला काय विचारता. सभ्यतेचे निकष तुम्ही पाळले तरी खुप झाले की.
राहायला प्रश्न ५०० आणि १००० च्या नोटांचा, सकल बारामतीकरांनी नक्कीच स्वागत केलं आहे नोट बंदीचे. लोक उत्स्फुरतेने नोटा बदलून घेत आहेत. काही समस्या होत्या/आहेत त्या हळूहळू कमी होतील ही अशा आहे.
उत्तम
15 Nov 2016 - 3:09 pm | विशुमित
<<<<बारामतीकर म्हटल्यावद बरोबर बसतात दगड>>>>
-- कृपया विनाकारण दगड नका मारू. विनाकारण दगड मरणाऱ्यांना लोक वेड्यात काढतात.
<<<कसले कारण, कसला पुरावा?>>>
-- विनाकारण दगड मारणारे नंतर असे प्रश्न विचारातच असतात. त्यांना शॉकची गरज असते पण आता पर्यंत दुर्लक्ष केलं आहे. असो.
<<<तुम्ही आ बैल मुझे मार करुन घ्यायला लागलात तर मी काय करु शकतो>>>
-- मी उगाच जास्त महत्व दिले या प्रतिसादाला, विनाकारण दगड मारणार्यांना दुर्लक्षच करायला पाहिजे होते.
<<<<बारामती, पवार, रा ष्ट्रावादी वगैरे विषय निघाले की तुम्ही धावुन येता>>>
-- धावून येणारच ... कारण काही कारण नसताना एका प्रगत क्षेत्राचे आणि सुसंस्कृत लोकनेत्याची कुत्सितपणे बदनामी कोणी दगड मारणारे करत असतील तर नक्कीच धावून येणार.
<<<<<भाजपा / मोदीची बदनामी करता >>>
-- प्रश्न उपस्थित केले म्हणजे बदनामी केली का?
(सूचना: हा प्रतिसाद फक्त विनाकारण दगड मारणाऱ्यांसाठी आहे, कृपया स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये )
15 Nov 2016 - 3:20 pm | अनुप ढेरे
शरद पवारांची थट्टा एवढी का लाऊन घेता तुम्ही मनाला? जोक आहे समजून सोडून द्या. लोक तसही मोदी, रा.गा इत्यादींची यथेच्छ थट्टा करतातच की.
15 Nov 2016 - 3:34 pm | विशुमित
ओके... सबुरीने घेतो मी फक्त विनाकारण दगड मारणाऱ्यांमुळे थोडा त्रास होतो.
त्यांना पण आवरा असे मी तुम्हाला नाही सांगणार.
इथून पुढे इग्नोर मारेल..
धन्यवाद..
17 Nov 2016 - 3:36 pm | मृत्युन्जय
एका प्रगत क्षेत्राचे आणि सुसंस्कृत लोकनेत्याची
साष्टांग नमस्कार स्वीकारावा इतकेच लिहुन आपली रजा घेतो.
17 Nov 2016 - 3:46 pm | विशुमित
ठीक आहे.... निघू शकता...!!
17 Nov 2016 - 3:53 pm | विशुमित
ओ सॉरी ...
इग्नोर...
17 Nov 2016 - 8:44 pm | श्रीगुरुजी
हहपुवा
21 Nov 2016 - 9:27 am | विशुमित
हलके होऊन या....
21 Nov 2016 - 9:32 am | विशुमित
अयो सॉरी...
विनाकारण हसणाऱ्यांपासून लांबच राहिले पाहिजे नाहीतर विनाकारण कधी दगड मारतील सांगता येणार नाही..!!
21 Nov 2016 - 3:16 pm | श्रीगुरुजी
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या संस्थेवर सकारण दगड मारले होते का?
21 Nov 2016 - 4:17 pm | विशुमित
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या संस्थेवर दगड राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारले होते का?
21 Nov 2016 - 5:31 pm | श्रीगुरुजी
संभाजी ब्रिगेड कोणाची पिल्लावळ आहे?
27 Nov 2016 - 11:14 am | एमी
आता विषय निघालाच आहे तर http://www.misalpav.com/node/13219 इथले आळश्यांचा राजाचे प्रतिसाद मस्ट रिड आहेत.
वरवर पाहता संयत वाटणारा लेख कसा अजेंडायुक्त असू शकतो किंवा पार्श्वभूमीला राहून कोण कसे काड्या करते ते कळेल.
===
बाकी धागा आणि प्रतिसादांबद्दल "भक्त नेव्हर सीज़ टू अमेझ मी"खेरीज बोलण्यासारखे काही नाही.
29 Nov 2016 - 12:14 pm | विशुमित
जाऊ द्या वो अॅमी जी..
४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही.
पुला खालून बरेच पाणी वाहून गेले असताना सुद्दा संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघनतेचे बदरामायण गाण्यातच लोक मुशगुल आहेत.
याने तेढ वाढतच जाईल, हे त्यांच्या ध्यानात येत नाही.
29 Nov 2016 - 12:23 pm | मृत्युन्जय
४८ चे भय नव्हे तर ४८ च्या जळीताची लाज वाटली पाहिजे. पण निलाजर्या लोकांकडु याहुन जास्त अपेक्षा नाही. निलाजरे लोक सुद्धा आत्तापावेतो नरकात गेले. मानसिकता मागे ठेउन गेले याचे दु:ख आहे.
29 Nov 2016 - 1:56 pm | संदीप डांगे
विशुमित, सदर प्रतिसादात जो आशय व्यक्त झालाय त्याचा स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त करतो, इथे संकुचित व कुजकट मानसिकता व्यक्त झाली आहे आपल्याकडून!
29 Nov 2016 - 1:58 pm | अनिरुद्ध.वैद्य
गर्भीत धमकी आहे का?
29 Nov 2016 - 2:40 pm | विशुमित
मृत्युन्जय जी-
- मी कधीच ४८ च समर्थन केलेलं /करणार ही नाही. ज्यांनी त्यावेळेस हे कृत्य केले त्यांचा मी निषेधच करतो.
संदीप जी-
माझ्या संकुचित आणि कुजकट विचारांना सुधारण्यासाठी नक्कीच बराच वाव आहे हे मी मान्य करतो. पण गुरुजींनी "भांडारकर" चा विषय उकरून तो थंड झालेल्या राखेत ठिणगी उत्पन्न करण्याच्या प्रयत्न होता. ही आग धगधगत ठेवण्यात काय हासील?
वरून परत ४८ चा भय वाटतं असे ही मागे ते म्हंटले होते.
http://www.misalpav.com/comment/887772#comment-887772
अनिरुद्ध.वैद्य जी-
कृपया तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
माझा एवढाच हेतू आहे की सामाजिक सलोखा कसा राखला जाईल यावर आपण सर्वानी विचार केला पाहिजे.
30 Nov 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी
४८ चे भय वाटते हे सांगण्यात चुकीचे काय आहे? आधी ब्राह्माणांविरूद्ध ४८ झाले व नंतर दलितांविरूद्ध ७८ झाले. ९० च्या दशकात ब्रिगेडच्या स्थापनेनंतर ट्रेंड बदलला. खेडेकर, कोकाटे, पोळके इ. वेगवेगळी ब्राह्मणद्वेषी पुस्तके लिहून ब्राह्मणांविरूद्ध लिहिण्यात अत्यंत खालची पातळी गाठली. ब्राह्मण नपुसंक असतात, मराठ्यांमुळे त्यांच्या बायकांची कूस उजवते, थोरले बाजीराव यांचे खरे वडील मराठा होते अशी अत्यंत किळसवाणी भाषा वापरली गेली. इतिहासातील ब्राह्मणांचे योगदान, स्वातंत्रलढ्यातील ब्राह्मणांचे योगदान नाकारले गेले. ब्राह्मण हे या भूमीतील नसून परके आहेत असे लिहिले गेले. या पुस्तकांचा निषेध होत असताना तुमचे साहेब, त्यांचे दिव्य पुतणे, त्यांच्या सुकन्या आणि सज्जन समजले जाणारे गृहमंत्री आबा यांनी या पुस्तकांविरूद्ध चकार शब्द काढला नाही. कारवाई करण्याचे तर लांबच राहिले. जेम्स लेनच्या पुस्तकाचे निमित्त करून ब्राह्मणांविरूद्ध द्वेषी प्रचार सुरू झाला. भांडारकर संस्थेवर हल्ला करून मोडतोड केली गेली. काही ब्राह्मण इतिहासकारांच्या तोंडाला काळे फासले गेले. त्याचा फायदा २००४ च्या निवडणुकीत मिळून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. नंतर इतिहासाची मोडतोड करून इतिहासातून दादोजी कोंडदेवांचे योगदान नाकारले गेले. एवढेच नव्हे तर त्यांचा 'आदिलशहाचे हस्तक' असा उल्लेख केला गेला. ब्राह्मण असलेले संत रामदास यांच्याविरूद्ध अत्यंत गलिच्छ लिहिले गेले. सत्तेत असलेले राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रकाराविरूद्ध मूग गिळून गप्प होते. २०१० दांडगाई करून जिजामाता बागेतील दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून तो कचर्याच्या ट्रकमधून नेला गेला. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची मोडतोड केली गेली. शिवाजी महाराजांनी ४०० ढेरपोट्या ब्राह्मणांना गोळ्या घालून मारले असा तद्दन खोटा इतिहास पुस्तकात लिहिला गेला. असल्या द्वेषी प्रकाराला प्रतिबंध घालणे ही तत्कालीन राज्यकर्त्यांची कायदेशीर व घटतात्मक जबाबदारी होती. ती पार न पाडता ते मुद्दाम गप्प बसून राहिले.
सुरवातीला फक्त ब्राह्मणांविरूद्ध द्वेष पसरवित असल्याने इतर जाती संभाजी ब्रिगेडला पाठिंबा देत होत्या. हरी नरके, आ. ह. साळुंके इ. मंडळी ब्रिगेडच्या व्यासपीठावर जाउन ब्रिगेडची भलामण करीत होती. २००५ मध्ये शिवधर्माचे खूळ काढले गेले. आमच्या धर्मात ब्राह्मण सोडून इतर सर्वांना प्रवेश आहे असे जाहीररित्या सांगितले गेले. सुदैवाने हे खूळ फारसे वाढलेच नाही. काही काळातच ब्रिगेडची इतर जातींविरूद्धची भूमिका प्रकाशात आल्यावर इतर जातींच्या डोक्यात प्रकाश पडला. 'वाजवा टाळी, पळवा माळी, 'वाजवा तुतारी, पळवा वंजारी' इ. घोषणा, अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध यातून त्यांची इतर जातींविरूद्धची मानसिकता स्पष्ट झाल्याने इतर जातींचे डोळे उघडले.
आता मराठा मोर्चे सुरू आहेत. राखीव जागांची जोरदार मागणी आहे. राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. जर न्यायालयाने राखीव जागांच्य विरूद्ध निर्णय दिला तर त्याचे खापर ब्राह्मण मुख्यमंत्र्यावर म्हणजेच पर्यायाने ब्राह्मणांवर फोडले जाईल अशी भीति आहे.
30 Nov 2016 - 7:00 pm | संदीप डांगे
दलित 2016 पण add करा लिस्टित...
4 Dec 2016 - 11:02 am | एमी
मोर्चा अरेंज करणारे आणि नाशिक दंगल करणारे हे दोन वेगवेगळे आऊटफीट(?) असल्याची चर्चा ऐसीवर वाचल्याचे आठवते.
===
बादवे शिवसेना, मनसेने केलेल्या राड्यांना कोणत्या 'जाती'च्या पारड्यात टाकायचे?
===
वर जशी मराठ्यांच्या कृष्णकृत्यांची यादी मांडलीय तशीच विहिंप, बजरंगदल, सनातन, गोराक्षस वगैरेंचीपण मांडा आणि त्याच्या पावत्या रास्वसं किंवा ब्राह्मणांच्या नावे फाडा. मग त्यावर इथल्या आयडींची काय रिअॅक्शन असेल?
किंवा दलितांनी, मुस्लिमांनी आतापर्यंत केलेल्या दंगलींची यादी मांडा. त्यांच्या बचावासाठी मआंजावर कोणी येइल का माहीत नाही.
राडा करणारे प्रत्येक जातीत, धर्मात, देशात असतात. तो काही केवळ मराठ्यांचा एक्सक्लुझीव प्रांत नाही. तिकडे अमेरीकेतदेखील ट्रंप जिंकला म्हणून जाळपोळ, दगडफेक करणारे आहेतच की.
===
एनीवे हिंसा, दंगली या निषेधाच्या मार्गांना विरोध आहेच. पण केवळ हिंसा करणारा कोण आहे हे बघून चालत नाही. त्यामागे चिथावणी देणारे, वातावरण तापवणारे, अफवा परवणारे कोण होते हेदेखील पहावे लागते. नाहीतर त्यावरचे उपाय हे केवळ तात्पुरते आणि वरवर मलमपट्टी ठरतात.
===
हर्क्युल प्वॉरोची 'कर्टन' वाचलीय का? 'दोन नॉर्मल व्यक्तींमधल्या नॉर्मल बेबनावाला बरोबर ओळखायचे; तापलेल्या परिस्थितीत त्यातल्या एकाला हळूच प्रोवोक करायचे; आणि त्याने हिंसा केली की मोहीम फत्ते समजून स्वतः पुढच्या कामगिरीसाठी रवाना व्हायचे' असा प्वॉरोच्या मते 'अतिशय डेंजरस' व्हिलन आहे त्यात.
===
असो. धाग्यावर फारच अवांतर होतंय त्यामुळे टाटा.
4 Dec 2016 - 11:11 am | संदीप डांगे
वर जशी मराठ्यांच्या कृष्णकृत्यांची यादी मांडलीय तशीच विहिंप, बजरंगदल, सनातन, गोराक्षस वगैरेंचीपण मांडा आणि त्याच्या पावत्या रास्वसं किंवा ब्राह्मणांच्या नावे फाडा. मग त्यावर इथल्या आयडींची काय रिअॅक्शन असेल?
किंवा दलितांनी, मुस्लिमांनी आतापर्यंत केलेल्या दंगलींची यादी मांडा. त्यांच्या बचावासाठी मआंजावर कोणी येइल का माहीत नाही.
>>> आहो, मांडा की. रिअॅक्शनचा काय विचार करायचा त्यात? माझे संपूर्ण अनुमोदन तुमच्या मांडण्याला, काढा बरं धागा.
राडा करणारे प्रत्येक जातीत, धर्मात, देशात असतात. तो काही केवळ मराठ्यांचा एक्सक्लुझीव प्रांत नाही. तिकडे अमेरीकेतदेखील ट्रंप जिंकला म्हणून जाळपोळ, दगडफेक करणारे आहेतच की.
>> वर यादी मांडायचं म्हणताय आणि परत हे पण बोलताय की राडा करण्याचा जाती-धर्म-देशाशी संबंध नाही. विसंगती नाही काय?
हिंसा, दंगली या निषेधाच्या मार्गांना विरोध आहेच. पण केवळ हिंसा करणारा कोण आहे हे बघून चालत नाही. त्यामागे चिथावणी देणारे, वातावरण तापवणारे, अफवा परवणारे कोण होते हेदेखील पहावे लागते.
>>> ओके, हे तर अगदी मुस्लिम दहशतवाद्यांना भडकवण्यात येते ह्या चालीवर म्हटलेले दिसते. कोणी कितीही भडकवले तरी आपला विवेक, सारासार माणुसपणाचा विचार असतो म्हणतात. जाउ द्या, टोळीयुद्धाच्या काळातून बाहेर येणे अनेकांना अजून मान्यच नाही, त्यात तुम्ही आम्ही काय करणार.
4 Dec 2016 - 11:31 am | एमी
वर यादी मांडायचं म्हणताय आणि परत हे पण बोलताय की राडा करण्याचा जाती-धर्म-देशाशी संबंध नाही. विसंगती नाही काय? >> विसंगती कशी काय?? यादी मांडायची कामं 'तुम्ही' करताय आणि मी सांगतेय की "राडा करण्याचा जाती-धर्म-देशाशी संबंध नाही."
ओके, हे तर अगदी मुस्लिम दहशतवाद्यांना भडकवण्यात येते ह्या चालीवर म्हटलेले दिसते. >> असं कोणी कुठे म्हणल्याचं मीतरी कधी वाचलं नाही.
कोणी कितीही भडकवले तरी आपला विवेक, सारासार माणुसपणाचा विचार असतो म्हणतात. जाउ द्या, टोळीयुद्धाच्या काळातून बाहेर येणे अनेकांना अजून मान्यच नाही, त्यात तुम्ही आम्ही काय करणार. >> वेळ लागेल हे सगळं व्हायला. होइल सावकाश.
4 Dec 2016 - 11:35 am | संदीप डांगे
वेळ लागेल हे सगळं व्हायला. होइल सावकाश.
>> =)) =)) बरोबर आहे.... मोर्चे काढणे झटपट होतं...
4 Dec 2016 - 7:59 pm | अनिरुद्ध.वैद्य
मग ठिकाय बुवा.
४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही.
>> ह्यातन ते काही दिसत नाही अस मला उगीचच वाटलं त्यामुळे सो सॉरी. एकंदरीत वातावरण तसलंच आहे हो. काय करणार ... आम्ची ना संख्या ना आर्थिक ताकद त्यामुळं जपुन रहावं लागत.
बाकी तुम्ही संभाजी ब्रीगेडसोबत नसाल अशी अपेक्षा.
धन्यवाद!!
29 Nov 2016 - 2:48 pm | मोदक
४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही.
मी एक सल्ला देवू का..? तुम्ही मुक मोर्चे काढता तेच चांगले आहे. :=))
29 Nov 2016 - 3:01 pm | विशुमित
<<<मी एक सल्ला देवू का..? तुम्ही मुक मोर्चे काढता तेच चांगले आहे. :=))>>
आता तुम्हीच सांगा अशाने काय होईल? पन्हाळ वाढतच जाईल.
म्हणून 'भांडारकर' बाबत माझा पूर्ण विराम. कारण त्यावर बऱ्याच वेळा चर्चा झाली आहे आणि त्यातून काही ही हशील नाही.
29 Nov 2016 - 3:45 pm | मोदक
पन्हाळ तयार होण्याला राजकारण कारणीभूत आहे आणि आपण प्रत्यक्षपणे या गोष्टीचे बळी आहोत. पन्हाळ वाढत जाऊ नये ही अपेक्षा आपण सामान्य जनतेने व्यक्त केली तरी जातीच्या ठेवींवर पिढ्यान् पिढ्या परतावा मिळत रहावा हे जातीयवादी राजकारणाचे मर्म आहे.
जातीयवादी राजकारण जनता नाकारत असल्याचे स्पष्ट संदेश गेल्या कांही निवडणुकांच्या निकालातून दिसत आहेत. बघू परिस्थीती कितपत सुधारते ते..!
29 Nov 2016 - 4:05 pm | विशुमित
<<<पन्हाळ तयार होण्याला राजकारण कारणीभूत आहे आणि आपण प्रत्यक्षपणे या गोष्टीचे बळी आहोत.>>>
-सहमत
<<<< पन्हाळ वाढत जाऊ नये ही अपेक्षा आपण सामान्य जनतेने व्यक्त केली तरी>>>
- सामान्य माणसाला हे राजकारण समजत नाही, पण जाणणाऱ्या लोकांनी तरी त्याला हवा देऊ नये, ही माझी माफक अपेक्षा होती. कदाचित ते माझे संकुचित आणि कुजकट विचार होते.
<<<<जातीयवादी राजकारण जनता नाकारत असल्याचे स्पष्ट संदेश>>>
-- हे विधान अजून तरी सरसकट सगळीकडे लागू होत नाही.
29 Nov 2016 - 9:05 pm | मोदक
- सामान्य माणसाला हे राजकारण समजत नाही, पण जाणणाऱ्या लोकांनी तरी त्याला हवा देऊ नये, ही माझी माफक अपेक्षा होती. कदाचित ते माझे संकुचित आणि कुजकट विचार होते.
अपेक्षा चुकीची नाही, फक्त अनुकरण सगळ्यांनीच करावे इतकेच (माझ्यासह)
29 Nov 2016 - 8:53 pm | ट्रेड मार्क
आणि उगाच इतरांना लेबलं कशाला लावताय? त्यानुसार तुम्ही मोदी हेटर्स मध्ये मोडता का?
8 Nov 2016 - 10:14 pm | अभिजीत अवलिया
सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय. पण 500/1000 च्या नोटा बाद केल्याने आतापर्यंत ज्यांनी 500/1000 च्या 'नोटांच्या स्वरूपात' पैसा दडवलेला आहे त्यांचीच फक्त गोची होईल. ज्यांनी तो जमीन जुमला, शेअर्स वगैरे मध्ये गुंतवलाय त्यांना काही होणार नाही. पण पाकिस्तान जो भारतात 500/1000 च्या खोट्या नोटा पेरण्यात गुंतलेला होता तो 100 च्या पण खोट्या नोटा बनवेल. त्यामुळे सादर निर्णयाने चांगले पाऊल पडले असले तरी आपली करन्सी जास्तीत जास्त सुरक्षित आणि डुप्लिकेट बनवायला कठीण बनवणे हाच दूरगामी उपाय आहे.
8 Nov 2016 - 10:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत.
8 Nov 2016 - 10:19 pm | शाम भागवत
१०० च्या नोटात व्यवहार करणे फार गैरसोयीचे आहे. मतदानाच्या आदल्या रात्री काही लाख रुपये वाटायचे व ते सुध्दा १०० च्या नोटात म्हणजे फारच अवघड आहे. उत्तरप्रदेश वगैरेच्या निवडणुकात याचा परिणाम जाणवेल असे वाटते.
8 Nov 2016 - 10:20 pm | अनुप ढेरे
अती बड्या धेंडांना काही होणार नाही. त्यांनी अनेक वर्ष शेअर बाजारात गुंतवला आहे पैसा. मिड लेवल लोकांची गोची.
8 Nov 2016 - 10:21 pm | खेडूत
५०० अन दोन हजाराच्या नोटा अधुनिक तंत्राने केलेल्या असतील. १०० च्या नकलणे शक्य आहे, पण ज्या सहजसहजतेने १ कोटी नकलले जातात ते कठीण होईल. बाजाराला प्लास्टिक आणि ई व्यवहारांची सवय लागेल हे महत्वाचे.
8 Nov 2016 - 10:17 pm | कैलासवासी सोन्याबापु
एक नंबर तुफान निर्णय, मोदींनी षटकार ठोकलाय, एकाच दगडात, कितीतरी पक्षी मारले, ब्लॅक मनी, विरोधक, हे पारंपरिक खेळाडू बाद केलेच त्याशिवाय शिस्तीत काँग्रेस अन समाजवादी पार्टी धुळीत मिळवल्या :)
8 Nov 2016 - 10:21 pm | अनुप ढेरे
उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय डेडली ठरेल.
8 Nov 2016 - 10:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
कोणासाठी डेडली म्हणताय?
8 Nov 2016 - 10:43 pm | शाम भागवत
निवडणूकीत काळ्या पैश्याचा वापर करणारे.
:))
8 Nov 2016 - 10:41 pm | शाम भागवत
मतदानाच्या आदल्या दिवशी कदाचित सोन्याची वळी वगैरे वाटप होईल.
सोने चांदी महागणार तर.
:))
8 Nov 2016 - 10:20 pm | शाम भागवत
२००० च्या नोटमधे एक चिप असणार आहे व नोट खराब न करता ती काढता येणार नाही की त्यात बदल करता येणार नाही.
ही चीप नोटेचे स्थान व क्रमांक परावर्तीत करेल.
त्यामुळे सॅटेलाईटच्या सहाय्याने स्थाननिश्चिती करता येईल.
जेव्हा हे सिग्नल्स खूपच जोरदार असतील व ते स्थान संशयास्पद असेल तर त्याचा ठावठिकाणा लावता येईल. तसेच त्याच्या वाहतुकीवरही लक्ष ठेवून छापा घालता येईल.
8 Nov 2016 - 10:23 pm | पुंबा
असे असेल तर भारताच्या इतिहासात technology चा हा सर्वोत्तम उपयोग ठरेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ते यश निर्विवादपणे मोदींचेच असेल. Kudos to Mr Prime minister.
8 Nov 2016 - 10:24 pm | शाम भागवत
धोरण व अंमलबजावणी दोन्हीची मस्त सांगड घातली आहे असे वाटतेय. मुख्य म्हणजे जो काळा पैसा नोटांच्या स्वरूपात नसेल तो जर कधी भविष्यात नोटामधे परावर्तीत करायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न उघडकीस येण्याची शक्यता आहे.
9 Nov 2016 - 1:47 am | साहना
कृपया असल्या अफवा पसरवू नका.
9 Nov 2016 - 8:39 am | शाम भागवत
मी लोकसत्तेच्या बातमीच्या आधारावर लिहिले आहे. अर्थात लोकसत्तेचे संपादक दिलगीरी व्यक्त करून अग्रलेख मागे घेऊ शकतात तसे या बातमीचे होणारच नाही असे मी ठामपणे म्हणू शकत नाही.
रिझर्व्ह बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नोटा छापण्यासाठी एक प्रायव्हेट लि. कंपनी स्थापन केली आहे हे ऐकले होते. तसेच या पध्दतीने खर्च खूप कमी होतो असेही ऐकले होते. रूपयाच्या नोटेचा खर्च सव्वा ते दीड रूपयाच्या घरात जात असल्याने त्या नोटा बंद केल्या होत्या मात्र या आधुनिक पध्दतीने उत्पादन केल्यास हा खर्च ७५ का ७८ पैसे इतकाच येतो त्यामुळे १ रूपयाची नोटही सुरू करता येईल असे ऐकले/वाचले होते.
ही जी चीप आहे तिचे संशोधन अंदाजे १० वर्षापूर्वी सुरू झाले होते. मॉल मधे गिर्हाईकांनी ठकल्गाडीतून सामान काऊंटरवर आणल्यावर त्या सामानाला हातही न लावता तत्क्षणी बिल तयार करणे हा त्यामागे हेतू होता. येणारा संदेश आरशाप्रमाणे परावर्तीत करणारी चीप असल्याने त्याला बॅटरी लागणार नसल्याचे अनेक वर्षांपूर्वी वाचले होते. हल्ली पाश्चात्य देशात मॉलमधे ही यंत्रणा असते असे म्हणतात. २०१६ पर्यंत या तंत्रज्ञानात नक्कीच सुधारणा झाली असणार.
युरोप अमेरिकेतील कारमधील जीपीएस यंत्रणा उपग्रहाशी थेट संपर्क करून कारची स्थाननिश्चिती करू शकते. व अशा कोट्यावधी कार्स ची स्थाननिश्चिती करता येते. मात्र येथे ही यंत्रणा स्वतःहून उपग्रहाशी संपर्क साधत असल्याने विजेची गरज भासते. भारतातही दुर्गम भागात जेथे इंटरनेट किंवा मोबाईलची रेंज येत नाही तेथे मोबाईलमधील जीपीएस यंत्रणेद्वारे स्थाननिश्चिती करता येते व गुगल मॅपच्या आधारे आपण दिशादिग्दर्शन मिळवू शकतो. येथेही मोबाईल स्वतःहून संपर्क साधत असल्याने बॅटरीची आवश्यकता आहे. मात्र यासाठी आपला मोबाईल जीपीएस यंत्रणेला अनुकुल असायला हवा.
आज भारताने ७ उपग्रहांची मालिका बनवून स्वतःची जीपीएस यंत्रणा उभारली आहे. नवीन सॉफ्टवेअर उभारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही भारताकडे उपलब्ध आहे.
थोडक्यात जीपीएस यंत्रणा व संदेश परावर्तन करणारी नॅनो चीप यांच्या एकत्रीत उपयोगाने असे काही करता येऊ शकेल असे वाटल्याने, लोकसत्तेतील बातमी ही निव्वळ एक कविकल्पना आहे असे मला वाटले नाही.
मी हे सर्व कुठेतरी वाचून कॉपी पेस्ट करत नसून फक्त तर्क लढवून टंकत आहे. तरी कृपया बातमीचा दुवा मागू नये. मात्र कोणी मला दुवा दिल्यास तो हात जोडून नम्रतापूर्वक स्विकारला जाईल. :))
तसेच माझा तर्क १०० टक्के बरोबर आहे असे माझे म्हणणे नसल्याने इतरांची मते वाचायला आवडेल
10 Nov 2016 - 10:25 am | असंका
कृपया बातमीची लिंक देताल का? मी सर्च केलं पण सापडलं नाही.
10 Nov 2016 - 2:55 pm | शाम भागवत
येथे लोकसत्तेतील बातमी पहा<\a>
12 Nov 2016 - 7:51 pm | पुंबा
आजिबात छाननी न करता अश्या बातम्या देणं लोकसत्तेत होणं म्हणजे कमाल झाली. जगाला आदर्श पत्रकारिता शिकवणाऱ्या कुबेरांनी याची जबाबदारी घेऊन निदान दिलगिरी तरी व्यक्त करावी.
10 Nov 2016 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन हजाराच्या नोटेत अशी कुठलीही चीप नाही, असे काल मंत्र्यांनी सांगितले.
-दिलीप बिरुटे
10 Nov 2016 - 3:13 pm | शाम भागवत
इकोनॉमिक्स टाईम्समधे आलेय. चीप बद्दल जेटलींनी विचारल तर त्यांनी स्पष्ट उत्तर न देता प्रतिप्रश्न केला की, "तुम्हाला हे कुठुन कळल? मी तरी अस काही ऐकल नाही."
10 Nov 2016 - 12:39 pm | चिगो
ही व्हॉट्सॅपीय अफवा आहे, असं वाटतं.. रिजर्व बँकेच्या सर्क्युलरमधे ह्याबद्दल काहीही लिहीलेले नाहीय..
10 Nov 2016 - 4:41 pm | मराठी कथालेखक
खरं खोटं माहित नाही.
काल एक शेजारी भेटला होता, त्याचा भाऊ बँकेत नोकरीला असतो. बँकेत जेव्हा त्यांना (म्हणजे या शेजार्याचा भाऊ आणि इतर स्टाफ) यांना नोटेची माहिती दिली गेली तेव्हा त्या चीप आहे असं सांगितलं होतं
माझा हा शेजारी अफवा पसरवणारा नाही. त्याचा भाऊ पण तसा नसेल अशी आशा आहे :)
10 Nov 2016 - 4:48 pm | अन्नू
TRUTH of 2000 notes
https://www.youtube.com/watch?v=m21-lIY6Zu8
10 Nov 2016 - 6:59 pm | मराठी कथालेखक
आज ATM चालू होते का ? मला तरी नाही दिसलेत. पण सरकारी निवेदनात काय म्हंटलं होतं की १० तारखेला 'काही' ATM बंद राहतील. म्हणजे निदान काहीतरी चालू असायला हवेत ना ?
पण माझ्या या शेजार्याने मला कालच सांगितलं होतं (अर्थातच त्याच्या भावाकडून आलेल्या माहितीच्या आधारे) की 'ATM उद्याही बंद असेल' म्हणून.
चिपची गोष्टही तशीच असू शकते. म्हणजे 'आतली गोष्ट' जी खरेतर बाहेर फुटणं अपेक्षित नव्हतं पण फुटली म्हणून आता नाकारली जात आहे. मला माहिती आहे की ATM बंद असणे आणि नोटेत चिप असणे या दोन गोष्टी फार भिन्न आहेत आणि त्यांची अशा प्रकारे तुलना करणं फारसं योग्य नाही तरीही एक शक्यता म्हणून विचार करायला हवा.
बाकी बँकिग क्षेत्रातील कुणी इथे असल्यास अधिक माहिती देवू शकतात (वेळ मिळाला तर :)
10 Nov 2016 - 7:03 pm | पैसा
आमच्या इथेही एटीएम बंद होती. पण ती त्या त्या बँकानी बंद केलेली होती. कारण स्टेट बँकेने शंभर रुपयाच्या नोटा इतर बँकाना दिल्या नाहीत. फक्त दहा आणि विसाची बंडले दिली. साहजिकच बँका एटीएम मधे कॅश भरू शकल्या नाहीत. शंभरच्या नोटा आणि पाचशेच्या नव्या नोटा मिळू लागल्या की एटीम नीट काम करू लागतील.
10 Nov 2016 - 7:32 pm | अन्नू
आज ATM चालू होते का ?>>>>>>
माझ्या माहितीप्रमाणे कालपासूनच काही एटीएम चालू करण्यात आले होते (सर्व ठिकाणचे नसावेत कदाचित), शिवाय त्यांना विड्रॉ पैशाची मर्यादाही होती.
चिपची गोष्टही तशीच असू शकते>>>>
नाही. चिपला कार्यरत करण्यासाठी पॉवर सोर्स नाही. आणि इतक्या लांबून सॅटेलाईटला सिग्नल देण्याईतपत तर नाहीच नाही. तसं करायचं जरी बोललं तर त्याला अवाजवी खर्च येऊ शकतो जो कि भारताला परवडणारा नाही.
काही लोक याला मॉलमध्ये वगैरे ठिकाणी असलेल्या डिटेक्टरचं उदाहरण देऊन हे काम करेल असा दावा करतात. पण प्रत्यक्षात ते अशक्य आहे. तो डिटेक्टर शॉर्ट डिस्टन्सला काम करतो, ना कि इतक्या दूरच्या वस्तूंना. साधं लॉजिक आहे- भारतात अजुन फोरजीला नीट नेटवर्क देता येत नाही तिथे नोटेला इतका पावरफुल नेटवर्क भारत कसा उपलब्ध करेल?
https://www.youtube.com/watch?v=RnW3VkPgi7M