रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 9:38 pm

मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.

काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.

असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.

मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?

हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.

http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...

कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.

धन्यवाद.

धोरणसमाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

9 Nov 2016 - 9:02 pm | चित्रगुप्त

येत्या सव्वीस जानेवारीला विविध ठिकाणी घातपात घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या/येणार्‍या पैशांना खीळ घालण्यासाठी योग्य वेळी केलेली उपाययोजना असेही या योजनेचे एक स्वरूप असू शकते. काहीही असो, जे केले ते उत्तमच.

सचिन's picture

9 Nov 2016 - 11:22 pm | सचिन

ईमानदारीका उत्सव !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्राफिमध्ये सापडतील...

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

नोटा बदली करण्यासाठी खालील फॉर्म प्रिंट करून व भरून बरोबर नेल्यास काम लवकर होईल. गर्दीमुळे फॉर्मचा तुटवडा असण्याची शक्यता आहे, शिवाय बँकेत अडचणीच्या जागी उभे राहून फॉर्म भरण्याचा त्रासही वाचेल.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2016 - 11:50 pm | श्रीगुरुजी

हा निर्णय कितपत परीणामकारक ठरेल याविषयी मी साशंक आहे. काळा पैसा हा फारच थोड्या प्रमाणात नोटांच्या स्वरूपात असेल. उर्वरीत काळा पैसा सोने, दागिने, जमीन, परकीय चलन, परदेशातील खात्यात अशा स्वरूपात असणार. त्यामुळे फारच थोडा काळा पैसा श्वेत होऊ शकेल. एक अशी शक्यता आहे की २००० ची नवी नोट आल्यानंतर पुन्हा एकदा काळा पैसा २००० च्या नोटांच्या स्वरूपात साठविला जाईल. मोदींना याची कल्पना असणारच. कदाचित ते काही काळ २००० च्या नोटा अर्थव्यवस्थेत स्थिरावू देतील व काही काळानंतर अचानक २००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून अधिक प्रमाणात काळा पैसा श्वेत स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतील.

हा निर्णय घेण्यात थोडी घाई केली असे मला वाटते. फेब्रुवारीत उ.प्र., उत्तराखंड, पंजाब व मणीपूर येथील विधानसभा निवडणुक आहे. निवडणुकीत प्रचारासाठी व वाटपासाठी काळा पैसा मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपात वापरला जातो. काल घेतलेला निर्णय जर दोन महिने थांबून जानेवारीच्या मध्यानंतर घेतला असता तर हा निर्णय कदाचित जास्त प्रभावी ठरला असता.

असो. हा धाडसी निर्णय आहे. मोदी जेव्हा जेव्हा घेरले जातात तेव्हा अचानक काहीतरी धाडसी कृती करतात. उरी हल्ल्यानंतर चहूबाजूने टीका होत असताना सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. गेल्या काही दिवसात सिमी एनकाऊंटर, एनडीटीव्ही बंदी, ओ आर ओ पी पश्नावरून आत्महत्या इ. प्रश्नांवरून मोदींना घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना कालचा निर्णय आल्याने बाकीचे सर्व वादग्रस्त मुद्दे मृत झाले आहेत. भविष्यात जेव्हा जेव्हा मोदी घेरले जातील तेव्हा तेव्हा असाच एखादा धाडसी निर्णय घेतील अशी माझी आता खात्री झाली आहे.

विकास's picture

10 Nov 2016 - 12:26 am | विकास

काळा पैसा, निवडणुकांशी संबंधीत राजकारण वगैरे मुद्दे आहेतच. पण मला वाटते त्याहूनही महत्वाचे म्हणजे नेपाळ, पाकीस्तान आणि इतरत्र बनत असलेल्या बनावट नोटा या मुळे रदबादल झाल्या आहेत. त्या व्यतिरीक्त या खर्‍या अथवा खोट्या नोटा अतिरेक्यांच्या स्लिपर सेल्स वापरत असणार जेणे करून सर्व व्यवहार कॅशमधेच होयला हवेत. पण त्यांच्या कडचे ५००/१००० चे चलन आता चालू शकणार नाही.

विकास's picture

10 Nov 2016 - 12:34 am | विकास

ह्याला योगायोग म्हणावे का?
India, China to set up joint working groups on fake notes, sharing terror information

"India and China will soon set up two joint working groups to deal with the Fake Indian Currency Notes (FICN) and a round-the-clock hotline to exchange information related to terror and organised crimes."

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 12:59 am | डॉ सुहास म्हात्रे

चीन मुरलेला (पक्षी :बदमाष) देश आहे. अश्या तर्‍हेने पुरवलेली माहिती तो पाकिस्तानला देऊन त्याला सावध करणार नाही याची खात्री नाही. (चीनचा "ऑल वेदर दोस्त" पाकिस्तान, अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांची माहिती तालिबान व इतर अतिरेक्यांना देत आला आहे. तसेच.)

भविष्यात पाकिस्तानच्या भारताच्या खोट्या नोटा छापण्याच्या तंत्रज्ञानामागे चीनचा हात आहे असा पुरावा मिळाला तर मात्र चीनला खजील करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. युएनच्या सुरक्षा समितीचा स्थायी सदस्य असलेल्या देशाची ही पार्श्वभूमी उघडे करणे (किंवा ती उघड करू अशी चीनला भिती घालून आपले एखादे काम काढून घेणे) काही कमी महत्वाचे होणार नाही ;)

विकास's picture

10 Nov 2016 - 1:31 am | विकास

चीन मुरलेला (पक्षी :बदमाष) देश आहे.
असे आमच्या भाई ला म्हणलेले आवडले नाही पण ठीक आहे. ;)

गंमतीचा भाग सोडा, पण आत्ताच्या घडीस आपल्याकडे कणखर नेतृत्व आणि सरकार आहे. त्यामुळे तुर्तास चीनला काय माहिती मिळेल याची काळजी करणार नाही. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 1:59 am | डॉ सुहास म्हात्रे

सद्या कणखर नेतृत्व आणि अनुभवी सुरक्षा सल्लागार असल्याने चीनला "योग्य तीच" माहिती मिळेल याची खात्री केली जाइल, याची खात्री आहे ;) :)

ट्रेड मार्क's picture

10 Nov 2016 - 12:30 am | ट्रेड मार्क

हा निर्णय उगाच हिरोगिरी दाखवायची म्हणून म्हणून घेतल्यासारखा वाटत नाहीये. त्यावर भरपूर विचार आणि बरेच महिने प्लॅनिंग झालंय. असं म्हणतात की ५०० आणि १००० च्या नोटाची व्हॅल्यू मिळून एकूण करन्सी व्हॅल्यूच्या तब्बल ८६% आहे, त्यामुळे एवढ्या सर्व किमतीच्या १०० च्या आणि २००० च्या नोटा उपलब्ध करून देणे याला खूपच वेळ लागेल. पण ती बरीचशी तयारी झालेली दिसतेय.

आता फेब्रुवारी मधल्या निवडणुकांचं म्हणाल तर वाटण्यासाठी पैश्यांची जमवाजमव तर झाली असेलच. ते वाटले किंवा वापरले जाण्याआधी प्रकरण निकालात काढणे कधीपण चांगले आहे.

बाकी मोदी घेरले जात आहेत असं वातावरण तयार केलं जातंय असं वाटतंय. कारण ज्या गोष्टी ते करत आहेत त्या व्यवस्थित प्लॅनिंगने आणि तयारीने केल्या जात आहेत. थोडक्यात विरोधकांना व शत्रूंना एका किंवा अधिक ठिकाणी छोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मोदी दुसरंच काहीतरी करतात. आधी कोणीतरी म्हणल्याप्रमाणे विरोधकांना हीच चिंता लागून राहिली असेल की हा बाबा आता काय उद्योग करणार.

जणू काही बुद्धिबळाचे पट मांडले आहेत आणि त्यावर शिपायांना थोड्या महत्वाच्या प्याद्यांना घेरायची संधी दिल्यासारखं दाखवायचं आणि दुसरीकडून चाल करून डावच संपवून टाकायचा.

बादवे - गुरुजींचा आयडी हॅक झालाय का अशी शंका येतेय काही दिवसांपासून.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2016 - 12:14 am | श्रीगुरुजी

मनमोहन सिंग यांनी जून १९९१ मध्ये रूपयाचे जवळपास २८% अवमूल्यन करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. त्यानंतर २५ वर्षांनी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा तितकाच धाडसी निर्णय झालेला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

चलनाचे अवमुल्यन करण्याचा निर्णय देशाच्या अर्थस्थितीशी निगडीत असतो. तो निर्णय काळ्या पैशाच्या निराकरणासाठी घेतला जात नाही. नव्वदीच्या दशकातल्या भारताच्या आर्थिक दुर्दशेमुळे तो निर्णय घेतला गेला होता.

निर्णय नरसिंह रावांचा होता. ममो फक्त कागदपत्र ( डॉक्युमेंटेशन ) तयार करणारे.

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 12:24 am | संदीप डांगे

आज बऱ्याच व्यावसायिकांना भेटलो, सर्व बाजूने फार दूरवर विचार करून सरकारने पाचर मारून ठेवलीय... काळ्या पैशाच्या सुटकेसाठी कोणताही मार्ग नाही, मोठ्या प्रमाण वाल्याना अजिबात नाहीच, =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 12:49 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व बाजूने फार दूरवर विचार करून सरकारने पाचर मारून ठेवलीय... काळ्या पैशाच्या सुटकेसाठी कोणताही मार्ग नाही, मोठ्या प्रमाण वाल्याना अजिबात नाहीच, =))

+१०००

खर्‍या माहीतगारांचे मत ! :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Nov 2016 - 3:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

नेमकं काय काय करुन ठेवलंय लिहा की, तेवढीच कळफलक बडवणार्‍या माझ्यासारख्या लोकांना माहिती होईल?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2016 - 12:07 am | डॉ सुहास म्हात्रे

एकच गोष्ट उघड करतो ती एकच साधी दिसणारी पाचर किती मोठी आहे हे पहा...

बँकेत २ लाखापेक्षा जास्त कॅश जमा केली तर चौकशी होईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे...

(अ) एखाद्याचे कितीही कोटी वैध पैसे घरात असले तर त्याला भिती नाही. कारणे ते पुढच्या विवरणपत्रात दाखविले जाऊन त्यांच्यावरचा कर भरला जाणार आहे. त्याअगोदर करविभागाने चौकशी केली तर तर पैश्याच्या वैध स्त्रोताचा पुरावा दाखवून करविभागाचे समाधान करता येईल.

(आ) अवैध पैश्याबाबत असे करणे शक्य नाही. म्हणजे अशा पैशापैकी फक्त २ लाख बँकेत जातील व ते येत्या करविवरणात दाखवले जाऊन त्यावर कर बसला तर तो भरावा लागेल.

(इ) अवैध नगदीवर २००% दंड आहे. इतर शिक्षा वेगळ्या.

या अवस्थेत दुसर्‍या लोकांना हाती धरून आपला काळा पैसा पांधरा करण्याचा प्रयत्न केला गेला तरी दर १ कोटी रुपयांमागे (१०० लाख / २ लाख =) ५० माणसे कामाला लावायला लागतील. यावरून हे काम किती कठीण आणि त्यातला एखादा माणूस फुटून करविभागाकडे गेला तरी किती धोक्याचे असेल हे सांगायला नकोच !

आता १०, ५०, १०० कोटी किंवा अधिक नगद रुपये घेऊन बसलेल्या उद्योगधंदेवाल्यांचे आणि निवडणूकीची वाट पहाणार्‍या राजकारण्यांची काय हालत झाली असेल.

तुकडे केलेल्या, जाळलेल्या किंवा तश्याच कचर्‍यात टाकलेल्या नोटा सापडत आहेत अश्या बातम्या माध्यमांत येत आहेत यात काहीच आश्चर्य नाही ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 12:47 am | डॉ सुहास म्हात्रे

या "फिनान्शियल सर्जिकल स्ट्राईकचे" काही महत्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :

१. जुन्या नोटांच्या स्वरूपात बँकेत किती कॅश भरावी यावर मर्यादा नाही. मात्र हे पैसे बँकेत गेले की त्यांचा हिशेब येत्या करविवरणपत्रात द्यावाच लागेल. अर्थातच, संशयास्पदरित्या वाढलेले उत्पन्न आणि त्याचा स्त्रोत याबाबत आयकर विभागाच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळे, सवलतीच्या फायदा मुख्यतः वैघ मार्गांनी मिळवलेल्या पैश्यांसाठीच (किंवा संशय येणार नाही इतक्या कमी काळ्या पैशासाठीच) निर्धोकपणे करता येईल.

कारण, ठराविक रकमेपेक्षा जास्त रकमेच्या कॅश डिपॉझिटवर आमचे लक्ष असेल अशी निवेदने वित्तविभाग, आरबीआय आणि करविभागाकडून येत असल्याचे बातम्यांत ऐकू येत आहे. या कारवाईसाठी २.० लाख, २.५ लाख आणि ३.० अश्या तीन वेगवेगळ्या सीमा सांगितल्या जातात. ते असो.

२. वित्त चलनवलनातील वाढ (लिक्विडिटी):

या दुसर्‍या मुद्द्याच्या हिशेबासाठी आपण "निर्धोकपणे कॅश डिपॉझिटसाठीची" सर्वात कमी रक्कम, २.० लाख गृहीत धरूया.

समजा घरात २ लाखाची कॅश (कॅश पांढरी असो की काळी, देशाला या हिशेबातला फायदा दोन्हीने होणार आहे) घरी असणारे सर्व भारतभर १ कोटी लोक आहेत. त्यांची कॅश निर्धोकपणे बँकेत जाऊ शकते म्हणजे ते ती बँकेत भरतील असे गृहीत धरायला हरकत नाही. तर मग, या सर्जिकल स्ट्राईकने, ही कृती अनिवार्य बनवल्यामुळे...

२ लाख X १ कोटी = रु२ लाख कोटी रुपयांचे चलन दोन महिन्यांपेक्षा कमी वेळात बँकांत जमा होईल.

म्हणजेच, सद्या चलनवलनातून बाहेर असलेले हे चलन केवळ नवीन नोटांत रुपांतरीत होईल असेच नाही तर बँकांची पैसे चलनवलनात ठेवण्याची ताकद (तरलता, लिक्विडिटी) तीन आठवड्यांत रु२ लाख कोटींनी वाढेल. घरात स्वस्थ बसलेले हे पैसे वैधरित्या वित्तचलनवलनात येतील, बँकांना कर्जे देणे तेवढे सुलभ होईल, सरकारच्या विकासकामांकरिता जास्त पैसे उपलब्ध होतील, त्यांच्या मालकांना व्याज मिळेल, इत्यादी अनेक फायदे देशाला व जनतेला होतील.

प्रत्यक्षात, या कृतीअंतर्गत गृहीत धरलेली लोकांची (एकूण १२५ कोटी लोकसंखेमधील) १ कोटी ही संख्या फार कमी आहे. जर प्रत्यक्षात ही संख्या जास्त असली तर त्याप्रमाणे जास्त पैसे चलनवलनात येतील व त्याप्रमाणात फायदे वाढतील...

२ लाख X २ कोटी = ४ लाख कोटी;
२ लाख X ५ कोटी = १० लाख कोटी;
२ लाख X १० कोटी = २० लाख कोटी; इत्यादी.

३. पैश्याचे व्यवहार करताना, बँकेच्या चेक, कार्ड अथवा ऑनलाईन ट्रान्सफर या सुविधा, केवळ मानसिक भितीमुळे (फियर ऑफ द अननोन) न वापरणार्‍या अनेक लोकांना ही योजना त्या सेवा वापरणे अपरिहार्य होणार आहे. त्यामुळे, त्या सेवांबद्दलची अनाठाई भिती कमी व्हायला मदत होणार आहे. याशिवाय, अश्या व्यवस्थेत संगणकाच्या होणार्‍या उपयोगाने वित्तव्यवहारांवर लक्ष ठेवणे सोपे होईल. यामुळे देशातील वित्तव्यवहारांतील अपारदर्शकता लक्षणियरित्या कमी होईल. याचा परिणाम काळा पैसा कमी होण्यात होईल यात शंका नाही.

याशिवाय, जसजशी ही योजना प्रत्यक्ष व्यवहारात येईल तसतसे कमीजास्त ताकदीचे अनेक सकारात्मक रिपल् इफेक्ट्स ३१ मार्च २०१७ आणि त्यानंतर दिसू लागतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 2:04 am | डॉ सुहास म्हात्रे

"संगणकीय वित्त व्यवहारांसाठी पार्श्वभूमी तयार करणे आणि संगणकीय वित्त व्यवहार अनिवार्य करणे" या केवळ काळे धनच नाही तर इतर अनेक प्रकारचा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी खेळल्या जाणार्‍या महामुत्सद्दी खेळीमधला "नोटा बदलणे" हा केवळ एक डाव आहे... अभी बहुत पिक्चर बाकी है ।

विकास's picture

10 Nov 2016 - 1:32 am | विकास

टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमीनुसार

http://timesofindia.indiatimes.com/india/deposits-above-rs-2-5-lakh-to-f...

आबा's picture

10 Nov 2016 - 11:37 am | आबा

प्रतिसाद मजेशीर आहेत... =))
एकूनच भक्तांनी अर्थशास्त्राचे धडे चित्रपटांं मधून घेतलेले असतात

अन्नू's picture

10 Nov 2016 - 1:05 pm | अन्नू

लोल =)) =))

मार्मिक गोडसे's picture

10 Nov 2016 - 6:52 pm | मार्मिक गोडसे

देशातील एकुण चलनाच्या ८६% हिस्सा ५०० व १००० च्या नोटांचा आहे व याचे एकत्रित मूल्य अंदाजे १४ लाख कोटी रुपये इतके होते. ह्या नोटा रद्द केल्यामुळे बँकेत १४ लाख कोटी रुपये इतक्या किमतीचे चलन जमा व्हायला हवे. त्या बदल्यात तितक्याच किमतीचे नवे चलन बदलून मिळेल.समजा देशात काळा पैसा मोठ्या प्रमाणात असेल तर बँकेत जमा होणारे चलन १४ लाख कोटीपेक्षा कमी भरले जाईल.

सरकारने सोन्याबाबतीत कडक धोरण राबवायला हवे होते जेणेकरुन सोनंव्यापार्‍यांना सोनं व्यवहार बंद करणे भाग पडले असते व त्याच वेळी ह्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा करायला हवी होती. असे केले असते तर लोकांना काल आपला काळा पैसा सोने खरेदीत गुंतवणे कठीण झाले असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2016 - 11:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सोनारांना व्यवहार चालू ठऊ देण्यामुळे अनेक मोठे मासे गळाला लागणार आहेत. व्यवसायात मिळालेल्या जुन्या नोटा नवीन करताना ते अचानक वाढलेले उत्पन्न सरकारसमोर उघड होणारच. अचानक वाढलेल्या व्यवहाराचा हिशेब ठेवला नाही तर सोनार अडचणीत आणि ठेवला तर खरेदीदार पकडला जाणार !

सोनारांवर टाकलेल्या धाडींच्या बातम्या सुरू झाल्या आहेत.

आबा's picture

10 Nov 2016 - 11:38 am | आबा

प्रतिसाद मजेशीर आहेत... =))
एकूनच भक्तांनी अर्थशास्त्राचे धडे चित्रपटांं मधून घेतलेले असतात

आपला प्रतिसाद दुसरीकडे चिटकवला तर चालेल का?

अत्यंत धाडसी आणि अभिनंदनीय निर्णय.. आता ह्या निर्णयाची अंमलबजावणी करतांना काही गोष्टी व्हायला हव्यात / होणार..
१. ३० डिसेंबर पर्यंत एका प्रकारची 'इन्फॉर्मल इकॉनॉमी' तयार होणार, ज्यात दुकानदार/व्यापारी ५००-१००० च्या नोटा मान्य करतील, कारण की बहुतांश जनतेकडे दोन-पाच हजार रुपये ह्या प्रकारे असतीलच. त्यामुळे जनजागृती आवश्यक आहे.

२. जन-धन योजनेत खाती उघडली असली, तरी बँकांना 'आऊटरीच प्रोग्राम्स' / कँप्स करावे लागतील. खासकरुन मेघालयसारख्या लहान राज्यातील दुर्गम आणि ग्रामिण भागात.. इथे अजुनही पैसा स्वतःजवळच ठेवण्याची प्रवृत्ती आहे, त्यामुळे 'बँकींग लिटरसी'ची प्रचंड गरज आहे.. जनतेनी पिशवीतून पैसे आणल्याचे किंवा बँकेत जाऊन 'माझा पैसा कुठे आहे ते आत्ताच्या आत्ता दाखव' हे म्हटल्याचे भरपूर किस्से आहेत. परीस्थिती बरीच सुधारली असली, तरी बाघमारात (जिथे मी आधी होतो) तिथे अख्ख्या जिल्ह्यात एकच 'एटीएम' होतं. आता दोन आहेत, म्हणजे २००% प्रगती. ;-)

३. काळा / भ्रष्ट पैसा तर बाहेर पडेलच, पण ह्या निर्णयाची आणखी एक बाजू म्हणजे अतिरेकी कारवायांसाठी पुरवल्या जाणार्‍या पैशाची किंमत शुन्य होणार.. मेघालयात अनेक 'ग्रुप कमांडर्स'नी घरात नोटा सिनटेक्सच्या टाक्यांमध्ये भरुन ठेवल्याचे किस्से ऐकले आहेत.. तो पैसा आता मातीमोल. त्यामुळे ह्या निर्णयाचे 'मिलिशिया-पोलिटीकल नेक्सस'वर काय परीणाम होतात, हे बघायला उत्सुक..

बादवे, ह्या निर्णयाचा घरांच्या किमतीवर काही परीणाम होईल का?

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 3:10 pm | संदीप डांगे

ह्या निर्णयाचा घरांच्या किमतीवर काही परीणाम होईल का?

>> साधारण ३० ते ४० टक्के प्राइस करेक्शन होईल अशी वदंता आहे बाजारात. नक्की काय होईल ते येत्या काळात स्पष्ट होईल. ज्यांच्याकडे काळापैसा आहे ते तो वापरुन जमिनजुमला घेऊ शकत असल्याने अव्वाच्यासव्वा किमती वाढल्या होत्या, तो पैसा आता वापरता येणार नसल्याने ग्राहक कमी होतील, सोबतच पांढराच पैसा हवा असल्याने व्यवहारात पारदर्शकता येईल. पुरवठा जास्त व मागणी कमी अशी परिस्थिती अजूनही मार्केटमधे नाही. जे आहे ते असे आहे की पुरवठा आणि मागणी यात किंमतीच्या अनुषंगानेच तफावत आहे. म्हणजे आत्ताही सुमारे चाळीस टक्के घरे ग्राहकांची वाट बघत आहेत तर त्यापेक्षा जास्त टक्के ग्राहक योग्य किंमतीच्या (परवडणार्‍या) घरांची वाट बघत आहेत.

नव्या नोटा येणार असल्याने रिअल इस्टेट व भ्रष्टाचार यावर कितपत फरक पडेल हा प्रश्न कालपासून मनात उभा राहिला आहे. कारण आताचा गोंधळ, धुरळा खाली बसल्यावर परत येरे माझ्या मागल्या होईल असे वाटते. हजार, पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा बाजारात येणे हे माझ्यामते जरा विचित्र होते आहे. कारण इथून पुढे सहामहिने-एकवर्ष ह्या नव्या नोटा पूर्णपणे जुन्या नोटांना रिप्लेस करतील. ज्यांची पोती भरलेली होती (फक्त नोटांची पोती, दुसर्‍या स्वरुपातली मालमत्ता सुरक्षित आहे) ती तशीही काहीही कामाची नव्हती. मग सहा महिन्यांनी आजचा निर्णय तितकाच परिणामकारक असेल काय? किंवा आजच्या निर्णयाच्या परिणामकारकतेला अधिक प्रभावी करणारा व त्याचा प्रभाव कायमस्वरुपी ठेवणारा दुसरा तेवढाच दमदार निर्णय येईल काय हा प्रश्नही आहेच.

चिगो's picture

10 Nov 2016 - 4:34 pm | चिगो

कारण आताचा गोंधळ, धुरळा खाली बसल्यावर परत येरे माझ्या मागल्या होईल असे वाटते.

ते होणार हो.. त्याचमुळे व्यवहार करतांना ओळख पटवणे, बेनामी व्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादी गरजेचं आहे. आताच्या निर्णयांमुळे जो काळा पैसा आणि नोटा कपाटं / गाद्या/ गोडाऊन/ तिजोर्‍यांमध्ये पडलेला होता, त्याच्या पांढरीकरणाची मुस्कटदाबी होणार, हेही नसे थोडके..

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 4:40 pm | संदीप डांगे

ते तर आहेच की. आताच्या निर्णयांचे मनापासून स्वागत आहेच. ह्या निर्णयांच्या परिणामांना बळकटी देणारे आणखी धडाकेबाज निर्णय येत्या काळात आवश्यक असतील असं आधीच म्हटलंय.

पैसा's picture

11 Nov 2016 - 9:56 am | पैसा

तीन पाच वर्षे किंवा अशाच काही ठराविक काळानंतर उच्च मूल्याचे चलन रद्द करत राहिले तर काळ्या पैशाला बराच आळा बसेल.

माझा व्यवसाय असून मला दार आठवड्याला १ लाख रुपयाचा मालाचा नेफ्ट कंपनी ला पाठवावा लागतो ..तर ३१ डिसेम्बर पर्यंत २.५ लाख भरण्याची जर मर्यादा असेल तर मी काय करावं ..मला आता माल बोलवायचा आहे .
जुन्या ५०० आणि १००० च्या नोटाना हि मर्यादा आहे का कि नवीन नोटा आल्यावर सुद्धा हि मर्यादा आहे .प्लीज जाणकारांनी लवकर मार्गदर्शन करावे

असंका's picture

10 Nov 2016 - 3:31 pm | असंका

पैसे भरायला नैये हो २.५ लाखांची मर्यादा.

ती अशी रक्कम आहे, जिच्यावरच्या रकमांच्या भरण्याचा तपशील आयकरवाल्यांकडे पोचवला जाइल आणि आयकर चुकवला आहे का अशा दृष्टीने या व्यवहाराची चौकशी होउ शकेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 3:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. बँक अकाउंटमध्ये किती दर दिवशी रक्कम (कॅश) भरावी यावर कोणतेही बंधन नाही. २.५ लाख पेक्षा जास्त वैध (पांढरा) पैसा बँकमध्ये जमा केला तर काहीच समस्या येणार नाही. कारण त्याचे विवरण तुमच्या येत्या करविवरणपत्रात येईलच. ज्यांचा जमा केलेला पैसा काळा असेल त्यांना समस्या होईल, कारण त्या पैशाचा स्त्रोत विचारण्याचा अधिकार करविभागाला आहे.

२. चेक, डीडी, डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन ट्रान्सफर यांच्यावर बंधन नाही.

किंबहुना आजच माझ्याकडे माझ्या बँकेचा एसएमएस आला आहे की ऑनलाईन ट्रान्सफरची सीमा वाढवली आहे. इतर बँकानीही तसेच केले असल्यची शक्यता आहे. तुमच्या बँकेकडे चौकशी करा.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2016 - 3:33 pm | श्रीगुरुजी

बर्‍याच बँकांच्या समभागांची किंमत किमान ८% ने वाढलेली आहे. यामागे काय कारण असावे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

याचे उत्तर वर येथे, मुद्दा क्र २ मध्ये आहे.

१ लाख रुपये आठवड्यला म्हणजे साधारण ५ लाख महिन्यात ..मी १ लाख रुपयांचा माळ आणून विक्री केली आणि परत तेच पैसे बँकेत नेफ्ट करायला भरायला तर ते कसे मोजणार

होय महिना पाच लाख म्हणजे अडिच लाखाच्या वर होइल आणि बहुतेक आपल्याकडे त्या पैशाच्या स्रोताबद्दल विचारणा केली जाइल. ती रुटीन स्वरुपाची विचारणा असेल आणि आपण कर चुकवला नसेल, तर आपल्याला चिंता करायचे कारण नाही. शक्यतो आपल्या सीएच्या मदतीने अशा विचारणेला उत्तर द्या. किंवा जर आत्मविश्वास असेल तर आपण स्वत:ची सत्य परीस्थिती स्वतःही मांडू शकता.

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 5:59 pm | संदीप डांगे

आताच वडिलांशी बोललो, वडील इस्टेट ब्रोकरचे काम करतात. त्यांना विचारलं काय हालहवाल नोटाबदलीचा.
म्हणाले नवीन खरेदी-विक्रीवर बंधनं आलीयेत. एकाने दुसर्‍याला द्यायला सतरा लाख कॅश आणले पण तो दुसरा विकत देणारा ह्या नोटा स्विकारण्यास तयार नाही. सौदा स्थगित झालाय. अजून दोन महिने रिअल इस्टेट शांत राहणार आहे. सुमारे ५० टक्क्यांनी किंमती घसरतील असा अंदाज आहे.

नाशिकमधे नोटांच्या बदल्यात सोनारांकडे सोन्याचा भाव ५२००० रुपये तोळा चालू आहे. काळा पैसा तर असाही निर्माण होतंच आहे यातून. अजून बरंच काही गुलदस्त्यात आहे. मार्ग शोधणारे शोधतातच.

कपिलमुनी's picture

10 Nov 2016 - 7:23 pm | कपिलमुनी

अवघड आहे !

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 8:14 pm | संदीप डांगे

अकोला शहरातली स्थिती आहे, नाशिक ला 3500 चे भाव असताना अकोल्यात 5000 चे भाव आहेत, हि फुगवण 50 % काळा पैशामुळे आहे

चिनार's picture

11 Nov 2016 - 9:54 am | चिनार

संदीप भौ..
पन यामुळे घामाच्या आणि कर्जाच्या पैश्याने घर विकत घेतलेल्या लोकांचे एकप्रकारे नुकसानच होइल ना ?
आता भाव कमी झाले तर घर विकतना आम्ही नुकसानीत विकायचे का?

पैसा's picture

11 Nov 2016 - 10:02 am | पैसा

चलन फुगवटा कमी झाल्यामुळे आताच्या तुलनेत कमी किंमत आली तरी हातातल्या पैशांचे मूल्य आताच्या तुलनेत जास्त असेल. तसेही जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून मालमत्ता घेतलेली असेल तर मार्केट चढउतार किंवा इतर काही गोष्टींच्या प्रभावाने त्यात जसा फायदा होऊ शकतो तसे नुकसानही होऊ शकते याला मनाची तयारी पाहिजे. रहाण्यासाठी घेतलेल्या घराची किंमत कमी होवो की जास्त तसा काही फरक पडत नाही.

संदीप डांगे's picture

11 Nov 2016 - 10:41 am | संदीप डांगे

देशासाठी इतकं सहन करायला हरकत नाही

विशुमित's picture

11 Nov 2016 - 7:42 pm | विशुमित

मान गये डांगे भाऊ...!!

देश भक्तांचा कस लागेल.

(हा. घ्या )

सप्तरंगी's picture

10 Nov 2016 - 6:09 pm | सप्तरंगी

NRI साठी फारशी माहिती मिळत नाहीये. NRO अकाउंट ला भरू शकतो पण भारताबाहेर असताना आणि ३१ मार्च पर्यंत भारतात येण्याची शक्यता नसताना हे ' अधिकृतरित्या (legally ) 'कसे काय साध्य करता येऊ शकेल ? Embassy ला हि अजून काहीही माहिती नाही आणि इथे कोणतीही भारतीय बँक नाही.

प्रदीप's picture

10 Nov 2016 - 7:57 pm | प्रदीप

मलाही पडला आहे. रिझर्व बँकेच्या ह्यासंबंधीच्या एफ. ए. क्यू. मधे हे पैसे तुम्ही तुमच्या NRO अकाउंटमधे भरू शकता असा उल्लेख आहे.

"21. I am an NRI and hold NRO account, can the exchange value be deposited in my account?
Yes, you can deposit the Specified banknotes to your NRO account."

पण आपण जर ठराविक मुदतीच्या आत भारतात जाऊच शकणार नसू, तर काय करावे, ह्यासंबंधी काहीही माहिती नाही. तेव्हा मी कालच त्यांना ईमेलीतून हा प्रश्न विचारलाय. उत्तर मिळाल्यास इथे पोस्ट करेन.

पैसा's picture

10 Nov 2016 - 8:01 pm | पैसा

त्याप्रमाणे नातेवाईकाला अ‍ॅथॉरिटी लेटर देऊन त्याच्याकडे नोटा पाठवता येतील असे स्टेट बँकेचे निवेदन आहे. अर्थात नोटा नातेवाईकापर्यंत कशा पोचतील ते मला माहित नाही.

प्रदीप's picture

10 Nov 2016 - 9:18 pm | प्रदीप

हे मीही वाचले आहे. पण नातेवाईकांना ह्यासाठी भरीस घालणे त्रासाचे वाटते.

सप्तरंगी's picture

10 Nov 2016 - 8:39 pm | सप्तरंगी

@ प्रदीप : हो मी पण हेच पहिले. नक्की सांगाल, आम्ही पण वाट पाहतोय काही अपडेट्स यायची. एम्बसीने वाट पहा किंवा आरबीआय ला मेल करायला सांगितले आहे.

@ पैसा बहुतेक नोटा पोस्टाने पाठवणे वैध असते आणि सध्या नातेवाईकांच्या कामात अजून भर घालण्यापेक्षा स्वतःच हे करण्याचा मार्ग उपलब्ध व्हायला हवा.

प्रदीप's picture

13 Nov 2016 - 3:57 pm | प्रदीप

थोडेसे अपेक्षित होते, तेच आले. म्हणजे थोडक्यात एकमेव मार्ग आपल्या NRO अकाउंटमधे स्वतः अथवा कुण्या इतरांतर्फे भरणे. माहितीसाठी संपूर्ण उत्तर इथे डकवत आहे:

"You can deposit the Specified banknotes to your NRO account.

If you have Specified banknotes in India, you may authorise in writing enabling another person in India to deposit the notes into your bank account. The person so authorised has to come to the bank branch with the Specified banknotes, the authority letter given by you and a valid identity proof (Valid Identity proof is any of the following: Aadhaar Card, Driving License, Voter ID Card, Pass Port, NREGA Card, PAN Card, Identity Card Issued by Government Department, Public Sector Unit to its Staff)"

त्यांच्या सध्याच्या धांदलीत उत्तर आले हेच विशेष मानतो.

सप्तरंगी's picture

15 Nov 2016 - 8:18 pm | सप्तरंगी

आभार प्रदीप पण आमच्या नोटा भारतात नाहीत इथे आहेत, म्हणजे वरील त्यांनी सांगितलेले option आमच्यासाठी बाद. इथे राहणाऱ्या आणि डिसेंबर मध्ये भारतात जाणाऱ्या बाकी भारतीयांकडे स्वतःचे आणि मित्रांचे पैसे आहेतच deposit करायला, त्यामुळे ते पण पण कितपत शक्य होईल माहिती नाही. सगळ्या अनिवासाची भारतीयांसाठी बाहेर काहीतरी option उपलब्ध असायला हवे होते. इथे बसून NRo अकाउंटला कॅश कशी deposit करणार ???

शब्दबम्बाळ's picture

10 Nov 2016 - 8:40 pm | शब्दबम्बाळ

अजून पण या प्रश्नच उत्तर मिळत नाहीये कि जर काळा पैसे आटोक्यात आणायचा आहे तर २००० ची नोट का आणली जातेय?
कदाचित १००० ची नोट पण पुन्हा येऊ शकते. मोठया किमतीच्या नोटांनी गैरव्यवहार सुलभतेने करता येतील...

सतिश गावडे's picture

13 Nov 2016 - 5:18 pm | सतिश गावडे

बोकिलांनी एबीपी माझावरील मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, जे लोकांनी बांधलेल्या "अंदाजांपेक्षा" वेगळे आहे. २००० च्या नोटा कमी प्रमाणात छापल्या जाणार असून ५०० आणि १०००च्या नोटा बाद केल्यानंतर लोकांची नोटांअभावी गैरसोय होऊ नये म्हणून हा पर्याय त्यांनी निवडला आहे.

हे सांगताना त्यांनी हायवेच्या कामाचे उदाहरण दिले आहे. हायवेचे काम चालू केल्याने रहदारी ठप्प होऊ नये म्हणून हा सोयीचा असा बायपास आहे.

दोन हजारची नोट का सांगताना लोकांनी भारी पुडया सोडल्या होत्या.

पैसा's picture

13 Nov 2016 - 5:46 pm | पैसा

आणि हायवेचे काम संपल्यावर बायपासची जरूरी रहाणार नाही. तेव्हा तो बंद होऊ शकतोच!

माझा अंदाज असा की साधारण ५ वर्षांनी पुन्हा १००० आणि २००० च्या नोटा रद्द होतील. आणि तेव्हाची चलनवाढीची परिस्थिती बघून कदाचित ५०० सुद्धा.

सतिश गावडे's picture

13 Nov 2016 - 6:08 pm | सतिश गावडे

होय. मात्र ते नविन "जाळं" नक्कीच नाही. ती परिस्थितीची गरज आहे. कमी उत्पादन खर्चात अधिक मुल्याचे चलन तातडीने उपलब्ध करणे हा त्यामागचा हेतू आहे.

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 6:17 pm | संदीप डांगे

तरी त्याने काय फरक पडेल नक्की? म्हणजे २००० ची नोट, पण सुट्टे द्यायला कोणी तयार नाही, १०० च्या नोटांचा तुटवडा. पुढचे काही दिवस खरंच बघू देत काय होतंय.

सतिश गावडे's picture

13 Nov 2016 - 6:51 pm | सतिश गावडे

होय ते आहेच. मी आज दहा नोटा घेऊन आलो आहे आणि कुणीही सुट्टे द्यायला तयार नाही. मात्र रोखीने कराव्या लागणार्‍या मोठ्या रकमेची तर सोय झाली. व्यक्तीशः मलाही अशा मोठ्या रोख रकमेची गरज होती. ती पुर्ण झाली. २००० हजारच्याही नोटा नसत्या तर मला सरकारच्या नावाने शंख करावा लागला असता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुसंख्य किंवा पुरेश्या %मध्ये* लोकांना बँकेच्या मदतीने (चेक, डीडी, केडिट/डेबीट कार्ड, फोन बँकिंग, ऑनलाईन, इ) पैश्याचे मोठे व्यवहार करण्याची सवय लागली की २००० च्या (व नजीकच्या काळात येणार असे म्हटल्या जाण्यार्‍या ५०० व अधिक किंमतीच्या) नवीन नोटा कायमच्या रद्द झाल्या तर आश्चर्य वाटू नये.

हा काळ साधारण १ ते ३ वर्षे असेल असा अंदाज करता येईल, हा काळ बँकिंग व्यवहारांना सवयीचे करण्यासाठी सरकारने आतापर्यंतच्या वापरलेल्या व भविष्यातल्या इतर योजनांमुळे कमी जास्त होऊ शकतो. मोठ्या किंमतीच्या नोटा आजपासून ३ वर्षांच्या आत रद्द केल्या तर (अ) नवीन नोटांच्या उपयोगाने या काळात निर्माण झालेल्या काळ्या पैशाचा आवाका खूप कमी राहील व (आ) नवीन खोटा पैसा छापून तो वापरणे (त्या कृतीला शुन्यापासून सुरुवात करावी लागल्याने) आयएसआय सारख्या संघटनांना तितकेसे सोपे राहणार नाही.

नवीन नोटा रद्द करून रु१००ची नोट मोठ्यात मोठी असल्यावर काळ्या पैशाचे व्यवहार अधिकच कठीण होतील.

कोणत्याच देशात काळा पैसा ०% आहे असे नाही (जसे ० चोर्‍या ही स्थिती); कारण तशी अवस्था व्यवहारात आणण्यासाठी मोजावी लागणारी आर्थिक किंमत जबर असेल व त्यासाठी करावे लागणारे नियम/कायदे सर्वसामान्य नागरिकांना असह्य असतील. काळ्या पैशाचे प्रमाण नगण्य किंवा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार नाही इतके कमी असले तरी तो फायद्याचा तोडगा होईल.

======

* : ज्यांचे दिवसाचे उत्पन्न ६८४ रुपयांपेक्षा म्हणजेच वर्षाचे २.५ लाखापेक्षा कमी आहे त्यांची शिल्लक बँकेत आली तर उत्तमच; पण ती बँकेत आली की नाही याने काळ्या पैशावर परिणाम होणार नाही व त्या नागरीकांना ५०० किंवा अधिक किंमतीच्या नोटा चलनात असल्या नसल्या तरी फार फरक पडणार नाही. भारतात अश्या लोकांची संख्या लक्षणिय आहे. हे नागरीक त्या %च्या बाहेर असतील. याचाच अर्थ असा की, सद्यस्थितीत, मोठ्या किंमतीच्या नोटा रद्द करायची वेळ येण्यासाठी भारतात १००% किंवा त्याच्या फार जवळच्या %मध्ये लोक बँक सॅव्ह्व्ही व्हायची गरज नाही.

सतिश गावडे's picture

14 Nov 2016 - 9:04 am | सतिश गावडे

तुमचे म्हणणे योग्यच आहे काका. मी माझ्या नजिकच्या काळातील रोख रकमेच्या गरजेबद्दल म्हटले. आपल्या रायगड जिल्ह्यातील एका अडनिड्या गावात आज तरी मी कार्ड वापरू शकत नाही. :)

काल मेसमध्ये जेवायला गेलो असता त्यांना "तुम्ही मशीन घ्या आता" असे सुचवले. तर त्या काकू म्हणाल्या "आम्हाला डोकेदुखी होईल ती" :)

यातलं पहीलं पाऊल म्हणजे शॉप अ‍ॅक्ट खाली नोंदणी केलेल्या दुकानांमध्ये कार्ड पेमेंट मशीन अनिवार्य करता येईल.

मार्मिक गोडसे's picture

13 Nov 2016 - 7:10 pm | मार्मिक गोडसे

हे सांगताना त्यांनी हायवेच्या कामाचे उदाहरण दिले आहे. हायवेचे काम चालू केल्याने रहदारी ठप्प होऊ नये म्हणून हा सोयीचा असा बायपास आहे.

नुसता बोर्ड लावून प्रत्यक्षात बायपासचा रस्ताच नसेल तर काय फायदा? रहदारी ठप्पच होणार ना? आज २००० हजारच्या नोटेबाबतीत तेच होतेय.

सतिश गावडे's picture

13 Nov 2016 - 7:28 pm | सतिश गावडे

होय. त्याबाबत जनतेला पुरेशी माहिती करुन द्यायला हवी होती याच्याशी सहमत. हाच प्रश्न मलाही पडला होता आणि मी याच धाग्यावर तो लिहीला होता. मात्र कुणी ढूंकूनही पाहीले नाही माझ्या प्रश्नाकडे.

नंतर काही प्रतिसादातून कळलं की "ते नविन जाळं आहे" =))

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 7:32 pm | संदीप डांगे

"ते नविन जाळं आहे" ह्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या हुशारीबद्दल काय बोलावे ? =)) =)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Nov 2016 - 8:27 pm | हतोळकरांचा प्रसाद

सगासर, २००० च्या नोटेची गरज तुम्ही तुमच्या उदाहरणानेच सिद्ध केलीय. जर काढली नसती तर ते लोकही ओरडलेच असते. आणि २ ते ४ दिवसात ५०० रु.च्या नोटा बाजारात असतील अशी आशा आहे. त्यानंतर हा प्रश्न आताईतका त्रासदायक असणार नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Nov 2016 - 8:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

गरज म्हणण्यापेक्षा उपयुक्तता!

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2016 - 8:54 pm | श्रीगुरुजी

IMPORTANT NOTICE :

Income Tax department has added a new window in their I.T. E-FILING WEBSITE viz " ACCOUNT CASH TRANSACTIONS " , from today morning.....!!!!!

The moment CASH is deposited into your Bank a/c , the amount will immediately reflect in this WINDOW of the I.T. Department. All the Banks Server's have been linked with the CPU of I.T. Department for CASH transactions....!!!!

संजय क्षीरसागर's picture

10 Nov 2016 - 10:22 pm | संजय क्षीरसागर

आज रात्री एकपर्यंत ई-फाईलींग साइट बंद आहे. उद्या नक्की काये ते बघायला हवं.

सतिश गावडे's picture

10 Nov 2016 - 9:46 pm | सतिश गावडे

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या हे उत्तम झाले.

पण आता त्याहीपेक्षा मोठ्या रकमेच्या नोटा छापण्याचे कारण काय?

या व्हिडीओ मध्ये या निर्णयाने शोर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये वेगवेगळया सेक्टर वर कसा कसा परिणाम होईल हे छान समाजावून सांगितलं आहे. जरुर पाहावा.

या व्हिडीओ मध्ये या निर्णयाने शोर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये वेगवेगळया सेक्टर वर कसा कसा परिणाम होईल हे छान समाजावून सांगितलं आहे. जरुर पाहावा.

विकास...'s picture

11 Nov 2016 - 8:55 am | विकास...

माहिती हवी आहे
जाणकार लोकांनी माहिती द्यावी कि
१. एका पॅन कार्ड वर पुढील ५० दिवसांमधील व्यवहार २,५०,००० च्या वर असतील तर त्यांचा स्रोत द्यावा लागेल?
२. एका रेशन कार्ड मधील सगळ्या नावावरील सगळ्या खात्यावरील एकूण व्यवहार दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त असेल तर त्याचा स्त्रोत द्यावा लागेल?

या पैकी बरोबर काय आहे?

पहिले अधिक बरोबर आहे. मात्र त्या कुटुम्बातल्या *अन्य सदस्याचे अन्य व्यवहार पहाता ते शंकास्पद वाटल्यास चौकशी होईल.
मात्र दुसर्‍या शक्यतेत आमची चौकशी का केली असे विचारता येणार नाही.
त्या पॅनकार्डधारकाचा गेल्या दोन वर्षातला व्यवहार पहाता अशी शंका आल्यास चौकशी होऊच शकते.
( * कुटुंबातले अन्य सदस्य ओळखता येतील, कारण बँकेचे पोर्टल आयकर खात्याला उपलब्ध करून दिल्याचे वाचले. एका खात्याचा नॉमिनी दुसर्‍याचा कोण आहे त्याचा उल्लेख असतोच.)

नावातकायआहे's picture

11 Nov 2016 - 9:29 am | नावातकायआहे

३ लाख जाहिर न केलेले पैसे असतिल तर दंड भरुन किती परत मिळतील?
माहिती हवी आहे.

ट्रेड मार्क's picture

11 Nov 2016 - 10:06 pm | ट्रेड मार्क

२.५ लाखांवर टॅक्स नसेल

वरील ५०,००० वर १०% प्रमाणे ५,००० टॅक्स

५,००० च्या २००% पेनल्टी म्हणजे १०,०००

म्हणजे एकूण १५,००० आत्ता भरायला लागतील.

त्यात परत हे ३ लाख तुमच्या सकाळ वार्षिक उत्पन्नात धरले जातील आणि मग त्यावर जो काही आयकर असेल तो भरायला लागेल.

मी यातला तज्ज्ञ नाही त्यामुळे कृपया तुमच्या CA ला वगैरे विचारावे.

राही's picture

11 Nov 2016 - 9:59 am | राही

मोरारजीभाईंनी नोटा रद्द केल्या होत्या तेव्हा सुरतेतल्या हिरेकारखान्यांतल्या कर्मचार्‍यांपैकी काहींनी नोटेची सुरनळी करून त्यात तंबाखू भरून त्याचे धूम्रपान केले होते. त्या काळात हिरेकारागिरांचा पगार चार-पाच आकडी असे.
तेव्हाही मोरारजीभाईंवर सडकून टीका झाली होती. आणि या कृतीचा फारसा उपयोग होणार नाही असे म्हटले गेले होते. याच्या बर्‍याच आधी मोरारजीभाईंनी सुवर्णनियंत्रण कायदा आणला होता ज्याद्वारे उच्च शुद्धतेच्या सोन्याचे दागिने बनवण्यावर बंदी आणली होती. १४ कॅरट इतक्याच शुद्धतेचे (पूर्ण शुद्धता म्हणजे २४ कॅरट) दागिने बनवणे सक्तीचे केले होते. यात भरपूर तांबे असल्याने आणि तांबे हे सोन्याइतके मॅलिएबल आणि डक्टाइल नसल्याने नाजुक कलाकुसरीचे दागिने बनवता येईनासे झाले. ओबडधोबड वळी, तोडे, आंगठ्या कोणी घेईनासे झाले. सुवर्णकारागिरांचा धंदा बसून ते बेरोजगार झाले. त्यांनी आंदोलन केले. तेव्हा नुकसानभरपाई म्हणून या सुवर्णकारांचा समावेश वर्गीकृत जातींमध्ये करून त्यांना शिक्षणात आणि नोकर्‍यांत आरक्षणाची हमी देण्यात आली. अर्थात आपल्या इथल्या सुवर्णबुभुक्षित लोकांनी अनधिकृतपणे शुद्ध सोन्याचे दागिने घडवून घेऊन या कायद्याचे तीन तेरा वाजवले ती वेगळी गोष्ट.

राही's picture

11 Nov 2016 - 10:08 am | राही

अर्थात असे निर्णय वारंवार घेतले जात नसतात. असे म्हणजे चलनसंहार किंवा अवमूल्यन. चलनसंहार तर संकटाच्या वेळीच केला जातो. चलनाचे स्वरूप सतत अस्थिर राहिले तर लोकांचा चलनशाश्वततेवरचा विश्वास उडू लागतो. चलनातले व्यवहार कमी होऊ लागतात. भारतासारख्या अर्थनिरक्षर समाजात असे होणे हे त्रासदायक ठरू शकते. ई-व्यवहार किंवा प्लास्टिक व्यवहार रुळू लागले की चलनसंहाराची तितकीशी गरजच उरत नाही.

अन्नू's picture

11 Nov 2016 - 10:21 am | अन्नू

अशाच आता निवडणुकीच्या जेमतेम तीन दिवस आधी हजार आणि दोन हजारच्या नोटी रद्द कराव्यात! ;)

अनुप ढेरे's picture

11 Nov 2016 - 10:45 am | अनुप ढेरे

महाराष्ट्रात निवडणुका आहेतच आता. त्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी जमवलेले असणार पैसे. त्यांची रिअ‍ॅक्क्षन बघण्यासारखी असेल.

बबन ताम्बे's picture

11 Nov 2016 - 12:20 pm | बबन ताम्बे

आकाराने १०० रु. च्या नोटेपेक्षा छोटी, अत्यंत पातळ कागद. लहान मुलांचे खेळण्यातल्या खोट्या नोटा असतात तशी वाटते. म्हणतात की याची नक्क्ल बनवणे सोपे नाही, पण प्रथम दर्शनी तर २००० रुपयाची नोट अगदी पातळ कागदाचा छोटा तुकडा वाटतो आणि यदाकदाचीत कुणी नकली नोट बनवलीच, तर असली-नकली नोटेमधे सर्वसाधारण माणसाला फरक ओळखणे कठीण होऊन जाईल. त्या मानाने सध्याच्या (आता आउटडेटेड) ५०० आणि १००० च्या नोटा उच्च दर्जाच्या वाटतात .
नोटा रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय खूप स्तुत्य.
पण दुसरीकडे अशा २००० च्या नोटा छापून काळ्या पैशावर नियंत्रण कसे येणार हे कळले नाही. उलट नवीन २००० रुपयाची नोट खूपच हँडी झालीय हाताळायला.

आता हवाला वाल्यांना सोयीचे झाले. पूर्वी खिशात बिशात जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत रक्कम हे अंगडीये नेऊ शकत होते. आता दहा लाख नेतील.

शंभर रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा कशाला हव्या आहेत? परत काळा पैसा निर्माण होईल.

अव्वा च्या सव्वा रक्कम घेउन सोने विकत आहेत, त्यांच्याकडील जास्तीचे पैसे पांढरे कसे करतात ?

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2016 - 12:49 pm | मार्मिक गोडसे

अव्वा च्या सव्वा रक्कम घेउन सोने विकत आहेत, त्यांच्याकडील जास्तीचे पैसे पांढरे कसे करतात ?

हाच प्रश्न मला पडलाय. डाल मे कुछ काला है. म्हणून मी वर ह्याविषयी विचारले होते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Nov 2016 - 8:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

व्यापार्‍यांना ८ दिवस आधीची विक्री दाखवाता येते. टॅक्सेशनमध्ये ज्या रिसीटस दाखवता येतात, त्या ८ दिवस प्रीडेटेड असु शकतात.

त्यामुळे त्यांना आधीची विक्री दाखवुन त्या नोटा जमा करता येईल. अर्थात हा एक अंदाज. सोनार मंडळींकडे किती सोने आहे, ह्याचा काहिही अंदाज नसल्याने सोनाराच्या कॅपॅसिटीनुसार तो पैसा व्हाईट करु शकेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

टेकीला आलेली चिंताग्रस्त माणसे अश्या अनेक चुका करतील आणि सरकारला त्यांना खड्यासारखे निवडायला मदतच होईल :)

सोने घ्या किंवा इतर काही खरेदी करा; कोणत्याही विक्रीची नोंद (सोनार, मॉल किंवा इतर ठिकाणी) होईलच. कारण नोंद न करता जुन्या नोटा घेऊन विक्री केली तर ते बेकायदेशीर होईल व विक्री करणारा त्याच्याकडे त्या नोटा कश्या आल्या ते कसे दाखवणार ?

शिवाय नोव्हेंबर आणि डिसेंबरमधल्या (आणि मागच्या महिन्यांत खोटेपणाने दाखवली तरी त्यामहिन्यांमधल्या) विक्रिची तुलना गेल्या काही वर्षांतील त्या महिन्यांत झालेल्या विक्रिशी करविभाग करेलच... व त्याला पटेल असे कायदेशीर उत्तर देणे कठीण असेल. खरा व्यवहार उघड केला नाही तर विक्री करणारा पकडला जाईल. त्यामुळे, त्याने खरा व्यवहार दाखवून त्यावरचा कर भरणे त्याच्यासाठी योग्य असेल. पण तसे केल्याने खरेदीदार उघडा पडून आयकराची चौकशी त्याच्यापर्यंत पोचेल :)

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2016 - 12:36 pm | मार्मिक गोडसे

आकाराने १०० रु. च्या नोटेपेक्षा छोटी, अत्यंत पातळ कागद. लहान मुलांचे खेळण्यातल्या खोट्या नोटा असतात तशी वाटते.

कदाचीत २००० च्या नोटेचा कागद हलक्या दर्जाचा वापरला असावा ज्यामूळे तीचा उत्पादन खर्च कमी असेल व पुढेमागे चलनातून बाद केले तरी फारसे नुकसान होणार नाही.

पैसा's picture

11 Nov 2016 - 1:09 pm | पैसा

५०० आणि हजारच्या नोटा जेव्हा खोट्या सापडतात तेव्हा बहुतेक वेळा त्यांचा कागद नेहमीपेक्षा हाताला जाड लागतो. आम्ही बँकातले लोक नोट मशीनमधे न टाकता मोजता मोजता केवळ कागदाच्या स्पर्शावरून खोटी नोट ओळखू शकतो. जर का दोन हजारचा कागद पातळ असेल तर त्या खोट्या नोटा अधिक सहज ओळखू येतील.