रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 9:38 pm

मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.

काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.

असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.

मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?

हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.

http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...

कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.

धन्यवाद.

धोरणसमाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

5 Sep 2018 - 12:56 am | डँबिस००७

नीती आयोग व्हाईस चांसलर slams
Demonitization Critic....

https://youtu.be/Mnq7Wu4l7gg

डँबिस००७'s picture

5 Sep 2018 - 12:58 am | डँबिस००७

Vice Chairman अस वाचाव !!

स्वधर्म's picture

5 Sep 2018 - 2:59 pm | स्वधर्म

नीट मांडलीय. मिलिंद मुरूगकर यांचा हा लेख नोटबंदी समर्थकांना पटणार नाही, पण जर कुणी समजून घ्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्यासाठी
https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/the-impact-of-demonet...

त्यातील काही भुकुटी ते इकडे वेगवेगळ्या टॉपिक वर मारत असतात. त्यांना आपण सोडून देऊ या. पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ? कि अजूनही हृदय तयार नाही सत्य मानायला ?

... पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे ..

ट्रेड मार्क's picture

7 Sep 2018 - 9:55 pm | ट्रेड मार्क

चक्की तर तुम्ही पण चालवताय, मोदी द्वेषाची! पण त्यातून भुकटीच काय काहीच बाहेर पडत नाहीये.

त्यांना आपण सोडून देऊ या.

ना मी तुम्हाला धरलंय ना तुम्ही मला.

पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ?

डॉक्टरसाहेबांचं जाऊ द्या हो, पण तुम्ही तुमच्याच धाग्यावर फिरकला नाही. या धाग्यावर जरी तुम्ही मोदीद्वेषाची चक्की चालवली होतीत तरी मी मोदीभक्तीची चक्की चालवली नव्हती. माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता आला नाही म्हणून चक्क पलायन केलंत.

पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे

ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे.

टीप: माझे या प्रतिसादातील मुद्दे पटत नसतील तर तुम्ही तुमचेच लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया परत वाचाव्यात ही विनंती.

लेखकाचा ई-मेल id आहे लेखाखाली. त्याला जरूर कळवा !! मला नाही ..
-------------------------------------------------------------------------
लोकसत्ता लेख - पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे

trademark - ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे.
-----------------------------------------------------------------------------

नितिन थत्ते's picture

7 Sep 2018 - 10:23 pm | नितिन थत्ते

>>या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद

हे बाकी थोर आहे. कुणाचाही काळा पैसा गेला नाही हे दोन वर्षांनी धडधडीत कळूनही तसे झाले हे भक्तांना पटवण्यात मोदीजी कमालीचे यशस्वी झाले आहेत.

नाखु's picture

23 Sep 2018 - 6:10 pm | नाखु

(जेष्ठ मिपाकर, विचारवंत)
तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
जर खरेच या राज,उद्धव,शरद पवार यांना नोटाबंदीचा काहीच फरक पडला नाहीतर दोन वर्षानंतर ही का त्याच्यावर कंठशोष करत आहेत?
क्षणभरासाठी धरू यशस्वी झाली नाही तर शंभर टक्के अयशस्वी ठरली असे तर होत नाही ना?
आयकराच्या जाळ्यात अडकले प्रकरणानंतर माहीती पडेलच की.

पांढरपेशा आणि पांढर पैसा नाखु बिनसुपारीवाला

नितिन थत्ते's picture

23 Sep 2018 - 8:46 pm | नितिन थत्ते

बर्‍याच जणांना अजूनही असं वाटतं हे मोदींचं यश आहे हे मी आधीच मान्य केलंय !!

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2018 - 2:49 pm | मार्मिक गोडसे

काळा पैसा नष्ट करण्यासाठी निरपराध जनतेला का वेठीस धरले मोदींनी? निरपराध जनतेचे आर्थिक नुकसान भरून देणार आहेत का मोदी? मोदींना देशाचा कारभार व्यवस्थित करता यावा म्हणून जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले. नोकरशहांना कामाला लावेल असं वाटलं होतं,पण कसलं काय मोदींनी नोटाबंदी करून वाटमारी सुरू केली. नोटाबंदिची नेमकी उद्दिष्टे काय हे सांगितले नाही,आणि आता अमुक इतके करदाते वाढले ,तमुक इतके पैसे बँकेत आले असं सांगत आहेत. नोटबंदीपूर्वी देशात १७ लाख कोटी रुपये होते , दीड वर्षानंतर हीच संख्या १८.५ लाख कोटी इतकी झाली. ही संख्या का वाढली ह्याचे उत्तर मोदी का देत नाही? नोटबंदीनंतर काही दिवस ' कॅश लेस' व्यवहार वाढले म्हणून सरकार श्रेय घेत होते आज कॅशलेस चे प्रमाण किती आहे? का मोदी गप्प आहेत? नवीन काळा पैसा पुन्हा निर्माण होऊ लागला आहे. तो आता कसा नष्ट करणार?

प्रसाद_१९८२'s picture

24 Sep 2018 - 3:36 pm | प्रसाद_१९८२

देशातील सर्वसामन्य जनता कधीकाळी नोट बंदी झाली होती, हे आता विसरुन देखील गेली असेल. मात्र नोटबंदी होऊन आता दोन वर्षे उलटली तरी नोटबंदीचा तुम्हाला लागलेला "ठणका" अजून काही थांबायचे नाव घेत नाही.

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2018 - 3:46 pm | मार्मिक गोडसे

आयटी सेलवर पोसलेली मेंढर नाही आम्ही नोटाबंदी विसरायला.

प्रसाद_१९८२'s picture

24 Sep 2018 - 4:53 pm | प्रसाद_१९८२

नोटबंदीने तुमचे फारच आर्थिक नुकसान झालेय असे दिसतेय.
तेंव्हा चालूदे तुमचा त्रागा ! :))

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2018 - 5:59 pm | मार्मिक गोडसे

देशातील प्रत्येक निरपराध नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे , त्यात मी सुद्धा आहे. मेंढरांना फायदा नुकसान काय कळणार?

ट्रेड मार्क's picture

24 Sep 2018 - 6:43 pm | ट्रेड मार्क

जरा इस्कटून सांगता का? काय, कसे आणि किती नुकसान झाले?

नुसतं लायनीत उभं राहायला लागलं म्हणून ४ तास गेले असं नाही, कारण आपण लायनीत तर बऱ्याच गोष्टींसाठी उभं राहतो.

तर तुमच्याकडे योग्य तो कर भरल्यानंतर (क्ष) रुपये होते जे आता (क्ष - य) झाले, अगदी खरी रक्कम नाही सांगितली तरी चालेल पण निदान पर्सेंट मध्ये किती कमी झाले ते तर सांगू शकता. त्याचबरोबर ते का आणि कसे कमी झाले असं तुम्हाला वाटतं हे पण सांगा.

टीप: तुम्ही "देशातील प्रत्येक निरपराध नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे , त्यात मी सुद्धा आहे" असं लिहिलं आहे म्हणून वरील प्रश्न विचारले आहेत. फार अवघड वाटत असेल तर तसं सांगा म्हणजे ऊत्तर देणं टाळता येईल.

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2018 - 7:46 pm | मार्मिक गोडसे

जरा इस्कटून सांगता का? काय, कसे आणि किती नुकसान झाले?
https://www.misalpav.com/comment/1010885#comment-1010885
नोटबंदी नसती केली तर तुमच्या माझ्याकडील ५०० आणि १००० ₹ चे मूल्य तितकेच राहिले असते. नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही? माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे.

मार्मिक गोडसे's picture

28 Sep 2018 - 11:16 am | मार्मिक गोडसे

अहो ट्रेड मार्क ,मी इस्कटून सांगितले, माझे नुकसान झाले हे मान्य तरी करणार की नाही?

ट्रेड मार्क's picture

28 Sep 2018 - 8:12 pm | ट्रेड मार्क

तुमच्याकडचे ५०० आणि १००० रुपयाच्या नोटेचे मूल्य ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी किती होते आणि ८ नोव्हेंबर २०१६ नंतर किती झाले हे कुठे सांगितलंय? नुसते मूल्य कमी झाले म्हणून ओरडताय, तसे तर पैश्याचे मूल्य दर दिवशी कमी होतच असते. Time value of money हे तुम्हाला माहित आहे का?

एक सोप्प गणित तुम्हाला करायला सांगतो - ५०० रुपयाची ७ नोव्हेंबर २०१६ रोजीची किंमत - ९ नोव्हेंबर २०१६ रोजीची किंमत - (काळ X महागाई निर्देशांकामुळे कमी झालेली प्रतिदिन किंमत) असं करून उत्तर सांगा.

नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही?

तुमच्याकडे एकच नोट होती? इथेही एक गणित घालतो - तुमच्या कडील ५०० + १००० च्या नोटांची किंमत - (वाहतूक खर्च + (वाया गेलेले तास * प्रतितास मोबदला)) याचं उत्तर सांगा.

माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे.

हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत?

ताळेबंद मांडायचा झाला तर इथेही एक गणित घालायला लागेल, फार अवघड नाही हो - तुमचे नोटबंदीमुळे वरील २ गणितांनुसार झालेले नुकसान - (हा मनस्ताप + हा विचार करण्यात घालवलेला वेळ** + मिपावर टैपण्यात घालवलेला वेळ**)

** तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक तासाची किंमत माहित आहेच, त्यामुळे या गणितात तुम्हाला सहज वापरता येईल

मार्मिक गोडसे's picture

28 Sep 2018 - 11:56 pm | मार्मिक गोडसे

तुमच्याकडचे ५०० आणि १००० रुपयाच्या नोटेचे मूल्य ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी किती होते
तुमच्या बेसिक मध्ये लोच्या आहे. नोटबंदीपूर्वी माझ्याकडील किंवा तुमच्याकडील नोटेचे मूल्य हे कधीच वेगळे नव्हते. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ५० पैसे आणि १००० च्या नोटेला त्यांच्या मूल्याच्या समप्रमानातच होते.
८ नोव्हेंबर २०१६ नंतर किती झाले हे कुठे सांगितलंय?
माझ्या कामाचे दर प्रती मिनिट कामाच्या स्वरूपावर असतात आणि नेमके नोटबंदी च्या काळात हातात कामेही भरपूर होती, परंतु नोटा बदलायला माझा बहुमूल्य वेळ वाया गेला त्यामुळे मी बदलून घेतलेल्या नोटांचे मूल्य negative झाले. नोटा न बदलता तशाच ठेवू द्याव्या तर तो गुन्हा ठरला असता. मोदींच्या मुर्खपणामुळे देशातील कित्येक जणांचे माझ्यासारखे नुकसान झाले.
हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत?
अजिबात नाही. हातावर पोट असल्यामुळे आणि कामाचे वेळापत्रक फिक्स नसल्याने मी नेहमी फावल्या वेळातच असली कामे करतो मग कधी तो दिवस असतो तर कधी रात्र, त्यामुळे माझा वेळही चांगला जातो .
आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का?

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2018 - 12:39 am | ट्रेड मार्क

तुमच्या नुसत्या बेसिक मधेच नाही तर तर्कबुद्धीत लोच्या आहे. एवढं नुसतं बहुमूल्य वेळ वाया गेला म्हणताय पण किती वेळ वाया गेला? अश्या किती नोटा तुमच्याकडे होत्या आणि त्या बदलायला किती वेळा जायला लागलं? नक्की तुमचे किती नुकसान झालं? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देतच नाहीये. खूप काम केल्याने खूप रोख रक्कम जमा झाली होती का? त्यावर टॅक्स वगैरे भरला होता का? सगळं नियमित असेल तर ५० दिवस होते आणि त्यातूनही नोटा बदलायलाच पाहिजे होत्या असं काही नव्हतं, त्या खात्यात भरण्याची पण सोय होती. एकीकडे कामाचे वेळापत्रक फिक्स नसतं म्हणताय आणि मग ५० दिवसात एकही दिवस तुम्हाला खात्यात पैसे भरणे/ काढणे व बदलून घेणे यासाठी सवड झाली नाही?

हे तुमच्या लाडक्या राहुल गांधींसारखं झालं की - नुसता इथे घोटाळा झालाय म्हणायचं पण कसा झाला, किती रकमेचा झाला हे सांगता येत नाही. तुम्हाला राहुल गांधी का आवडतो याचं कारण आता स्पष्ट झालं आहे.

आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का?

जरी तुमच्या कामात खंड पडल्याने तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं म्हणलं तरी तुमच्या हातात असलेल्या नोटेचे मूल्य कमी झाले असं म्हणत नाहीत. तर त्या व्यवहारात तुमचे नुकसान झाले असं म्हणतात.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2018 - 8:53 am | मार्मिक गोडसे

त्यातूनही नोटा बदलायलाच पाहिजे होत्या असं काही नव्हतं, त्या खात्यात भरण्याची पण सोय होती.
माझ्या हाताखालील मजुरांना रोखीत पैसे द्यावे लागतात. नोटबंदीमुळे ५००, १००० च्या नोटा कोणी स्वीकारत नव्हते, कमी रकमेच्या नोटांची टंचाई होती,बँकेतून/एटीम मधून बचतीचे पैसे काढण्यावर मर्यादा होती आणि यात वेळ जात होता आणि वेळेवर मिळत नव्हते. बँकेच्या कामाच्या वेळेतच हे सर्व करावे लागत होते,त्यामुळे व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडत होते. नोटबंदी पूर्वी अशी अडचण येत नव्हती.
खूप काम केल्याने खूप रोख रक्कम जमा झाली होती का?
क्लायंट कडून चेकनेच पैसे घेतो, परंतु हाताखालील मजुरांना रोख द्यावे लागत म्हणून बँकेतून रोख रक्कम काढत असे. मला मिळालेला प्रत्येक पैसा हा सफेद होता. तुम्ही टॅक्सची काळजी करू नका.
जरी तुमच्या कामात खंड पडल्याने तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं म्हणलं तरी तुमच्या हातात असलेल्या नोटेचे मूल्य कमी झाले असं म्हणत नाहीत.
इतके रामायण सांगून रामाची सीता कोण म्हणून विचारताय. पुन्हा सांगतो, नोटबंदी नसती तर माझ्याकडील ५००,१०००च्या नोटा कोणीही स्वीकारल्या असत्या, परंतू नोटबंदीनंतर कोणी स्वीकारत नसल्याने मला हातातली कामे सोडून बँकेतून त्या बदलून घ्यायला लागल्या,हे सर्व मोदींच्या मूर्ख निर्णयामुळे करावे लागले. नुकसान कितीचं झाले हा मुद्दा नाही, माझ्याकडे काळा पैसा नसताना मला हा नाहक भुर्दंड पडला.
तुम्हाला राहुल गांधी का आवडतो याचं कारण आता स्पष्ट झालं आहे.
मुद्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही ही अनावश्यक टिप्पणी करत आहात हे दिसते आहे, आता हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. सिद्ध करा अथवा हा आरोप मागे घ्या.

ट्रेड मार्क's picture

30 Sep 2018 - 7:01 am | ट्रेड मार्क

क्लायंट कडून चेकनेच पैसे घेतो, परंतु हाताखालील मजुरांना रोख द्यावे लागत म्हणून बँकेतून रोख रक्कम काढत असे.

नोटबंदी करण्यामागे हे एक कारण असेल का? तुम्हाला चेकने पैसे मिळत होते पण पुढील व्यवहार रोखीत होता. तुम्ही रोखीत काही व्यवहार करूनही ते सफेद आहेत असं आपण मान्य करूया. पण असे कितीतरी छोटेमोठे व्यावसायिक असतील जे रोखीत व्यवहार करून दाखवत नसतील? तुम्हाला आणि सगळ्यांनाच अडचण झाली असेल यात शंकाच नाही पण जास्त अडचण रोखीत व्यवहार करणाऱ्यांना झाली हे तर मान्य कराल?

तुम्ही मजुरांना रोखीत पैसे देत होतात याने रोख रकमेचा कसा ट्रेल तयार होतो हे बघा. मजुरांची कमाई टॅक्सच्या जाळ्यात येण्याएवढी नसेल, पण हेच मजूर ज्या वाण्याकडून सामान खरेदी करत असतील त्याला रोख पैसे देत असतील. हा वाणी ज्या होलसेलर कडून सामान घेत असेल त्यालाही रोखीत पैसे देत असेल आणि अशीच ही चेन चालू रहात असेल. यातले वाणी आणि होलसेलर हे रोखीत व्यवहार असल्याने किती टॅक्स चुकवत असतील? याच धाग्यात मी आधी कधी तरी विचारलंय की वस्तू रोखीत घेतल्यावर आपल्यापैकी किती जण पक्के बिल घेतात? किरकोळ खरेदी तर जाऊच दे, पण सोन्यासारख्या मोठ्या खरेदीत पण किती जण टॅक्सचे पैसे वाचवावे म्हणून पक्के बिल घेत नाहीत? हे थांबवायला तुम्ही कुठला उपाय सुचवाल?

टॅक्सचा रेट जास्त आहे याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात निदान ४० कोटी लोक तरी काही ना काही काम धंदा करत असतील? यातले अगदी अर्धे लोक आयकराच्या स्लॅब मध्ये येत नाहीत असं म्हणलं तरी २० कोटी लोक इमानदारीत टॅक्स भरतात का? सव्वाशे कोटीपैकी निदान ६० कोटी लोक तर काही ना काही खरेदी करत असतील, किती ठिकाणी रोख व्यवहार करूनही पक्के बिल घेतात. त्याही पुढे जाऊन किती व्यापारी रोख खरेदी झाली तरी इमानदारीत सगळे टॅक्स भरत होते? तुमच्या लक्षात येईल अशी आशा आहे.

इतके रामायण सांगून रामाची सीता कोण म्हणून विचारताय...आणि परिच्छेद

तुमचा राम कोण आणि सीता कोण यातच गोंधळ होतोय. तुम्ही बँकेची कामं करायला कोणी ठेवलं नसेल आणि जर स्वतःच करत असाल तर तुमच्या वेळापत्रकात बँकेची कामे करण्यासाठी वेळ असला पाहिजे. नोटा बदलण्यासाठी कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ लागला असेल पण ते एकदा किंवा दोनदा असावं असं गृहीत धरतो. कारण तुम्ही नुसतेच गोल गोल फिरताय, कुठलीच आकडेवारी देत नाही. तुमचा वेळ ब्यांकेत जास्त गेला म्हणून तुमचे वेळेचे आणि पर्यायाने पैश्याचे नुकसान झाले हे असू शकते. पण म्हणून जुनी ५००ची नोट बदलून नवीन ५०० ची घेतल्यावर तीचे मूल्य ४०० झाले असं होत नाही ना?

हे सर्व मोदींच्या मूर्ख निर्णयामुळे करावे लागले

हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मोदींचा हा निर्णय मूर्खपणाचा वाटतो तर मला विरोध करणारे मूर्ख वाटतात. तिघेही आपापल्या जागी बरोबर असू शकतात. यातुन तुम्ही काय शिकलात? अजून तरी तुमच्या मजुरांना बँक खाती काढायला सांगितलं का?

माझ्याकडे काळा पैसा नसताना मला हा नाहक भुर्दंड पडला.

वैयक्तिक तुमच्याकडे नसेल हो पण तुम्ही नकळतपणे काळा पैसा तयार व्हायला कसा हातभार लावत होतात हे मी वर स्पष्ट केलं आहे. सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं झालं.

मुद्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही ही अनावश्यक टिप्पणी करत आहात हे दिसते आहे

मी पळ काढत नाही. तुम्हाला एवढा राग का आला हे मला समजलं नाही, राहुल गांधी आवडत नसेल तर मला आवडत नाही हे सरळ सांगायचं, असेल तर राग यायचं कारण नाही. बाकी तुम्ही अंधभक्त, मोदीभक्त असे बऱ्याच प्रतिसादात म्हणलेले आहे पण असे कुठलेही विशेषण न देता मी फक्त राहुल गांधी आवडतो म्हणण्याने राग यावा याचे आश्चर्य वाटत आहे. मोदींना तुम्ही मूर्ख समजता म्हणजे ज्यांना मोदीभक्त तुम्ही म्हणत आहात त्यांना तुम्ही काय समजता हे स्पष्ट होतंय. त्या सगळ्यांची बिनशर्त माफी मागा मग मी माझे विधान मागे घेतो.

रच्याकने: मोदी आवडणाऱ्यांना जसे अंधभक्त म्हणले जाते तसे राहुल गांधी आवडणाऱ्याला मंदभक्त का म्हणू नये?

नितिन थत्ते's picture

30 Sep 2018 - 9:03 pm | नितिन थत्ते

हे सगळं ठीक असलं तर मग नोटबंदीपूर्वी जितक्या रकमेच्या नोटा होत्या त्याहून जास्त रकमेच्या नोटा सरकारने पुन्हा बाजारात का सोडल्या आहेत?

तुमच्या या सगळ्या लॉजिकनुसार मोदीसरकार पुन्हा काळे व्यवहार करणार्‍यांची सोय करून देत नाहीये का?

नितिन थत्ते's picture

30 Sep 2018 - 9:06 pm | नितिन थत्ते

http://www.newindianexpress.com/business/2018/mar/31/normalcy-returns-as...

money, currency, economy

Image for representational purpose only.
By Express News Service

MUMBAI: The currency in circulation in the country crossed the pre-demonetisation level at Rs 18.27 lakh crore as on March 23, indicating that full remonetisation is now complete and that currency pumping has resumed the normal course.

The move comes 15 months after the government rolled out the economic reform invalidating high-value notes on November 8, 2016.

The latest RBI data released on Friday shows that the currency in circulation stood at Rs 18.27 lakh crore as on March, 23 as against Rs 13.35 lakh crore a year before. Prior to demonetisation, currency in circulation stood at Rs 17.97 lakh crore, 86.4 per cent of which comprised high-denomination banknotes of Rs 500 and Rs 1,000.

नितिन थत्ते's picture

30 Sep 2018 - 9:10 pm | नितिन थत्ते

त्याशिवाय आणखी धक्कादायक बाब म्हणजे तीन चार महिन्यांपूर्वीपर्यंत २००० रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळत नव्हत्या. तेव्हा असे वाटत होते की सरकार २००० च्या नोटा चलनातून हळूहळू काढून टाकणार आहे. परंतु गेल्या दीड दोन महिन्यापासून एटीएममधून रेग्युलरली २०००च्या नोटा मिळू लागल्या आहेत. म्हणजेच मोठ्या मूल्याच्या नोटांमुळे काळे व्यवहार सुलभ होत असतील तर सरकार त्यास हातभार लावत आहे.

मार्मिक गोडसे's picture

2 Oct 2018 - 3:46 pm | मार्मिक गोडसे

नोटबंदी करण्यामागे हे एक कारण असेल का?
मोदिंनी तसं स्पष्ट सांगितले नाही, आणि तेच कारण असेल तर नोटबंदी केल्याने रोख व्यवहार कायमचे थांबले का? माझ्यामते नाही, ह्याचा अर्थ नोटबंदी हा त्यावर उपाय नक्कीच नाही.
तुम्ही मजुरांना रोखीत पैसे देत होतात याने रोख रकमेचा कसा ट्रेल तयार होतो हे बघा.
हे माहीत आहे हो, उगाच पाल्हाळ लाऊ नका.
तुमचा राम कोण आणि सीता कोण यातच गोंधळ होतोय.
तुमचाच होतोय, मी स्पष्ट शब्दात सांगितलय, नोटाबंदीमुळे माझ्याकडे रोख स्वरुपात असलेल्या ५०० , १००० च्या मला बदलताना खर्च झाला आणि व्यावसायिक नुकसानही झाले, आणि हे सर्व मोदिंनी मुर्खपणाने लादलेल्या नोटाबंदीमुळे झाले.
तुम्ही बँकेची कामं करायला कोणी ठेवलं नसेल आणि जर स्वतःच करत असाल तर तुमच्या वेळापत्रकात बँकेची कामे करण्यासाठी वेळ असला पाहिजे.
नोटाबंदीपुर्वी अशी समस्या मला उद्भवली नव्हती, नोटाबंदीचा काळ वगळता आजही अशी गरज वाटत नाही, मग कशाला उगाच मुर्ख लोकांचे सल्ले ऐकुन खर्च करा.
तुमचा वेळ ब्यांकेत जास्त गेला म्हणून तुमचे वेळेचे आणि पर्यायाने पैश्याचे नुकसान झाले हे असू शकते.
धन्यवाद, माझे नुकसान झाले हे मान्य केल्याबद्दल.
पण म्हणून जुनी ५००ची नोट बदलून नवीन ५०० ची घेतल्यावर तीचे मूल्य ४०० झाले असं होत नाही ना?
मला व्यवसायकरता रोख रक्कम लागत असते, नोटाबंदीपूर्वी बँकेतून मला ५००, १००० च्या ऐवजी त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटा मिळाल्या असत्या तर , नोटाबंदीमुळे मला बँकेत नोटा बदलायला जावे लागले नसते आणि माझे आर्थिक नुकसानही झाले नसते. ५०० , १००० च्या नोटा माझ्याकडे असल्यामुळे खर्च झाला आणि माझे नुकसान झाले हे वर तुम्ही मान्य केलं आहे. नोटाबंदीमूळे ह्या नोटेंचे मुल्य जपण्यासाठी माझा वेळ आणि पैसा खर्च झाला. नसता खर्च केला तर त्या नोटेंचे मुल्य 'शुन्य' होउन ते कागदाचे तुकडे माझ्या गळ्याचा फास बनले असते. त्या नोटेंचे मुल्य शुन्य कसे झाले असते ते हे तुम्हाला समजत असेल तर बदलेल्या माझ्याकडील नोटांचे मुल्य माझ्याकरता कमी कसे झाले हे ही तुम्हाला समजेल.
अजून तरी तुमच्या मजुरांना बँक खाती काढायला सांगितलं का?
काहीही. तुम्हाला व्यवहारज्ञान अजिबात नाही हे स्पष्ट दिसतंय. एक तर तुम्हाला माझ्या व्यवसायाचं स्वरुप माहीत नसताना तुम्ही असे (संपादित) सल्ले देत आहात(तुम्ही १००% कॅशलेस व्यवहार कसे करता ह्याची मला खूप उत्सुकता आहे). माझ्याकडे कायमस्वरुपी मजूर कामाला नसतात.जिथे माझे काम असेल तेथील स्थानिक मजुरांकडून मी काम करुन घेतो.काम झाले की लगेच रोख पैसे द्यावे लागतात,ह्या मजुरांचे बँक खाते असले तरी ते रोख पैसेच घेतात.रोख पैसे मिळाले तरच त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळते. चेकने पैसे देण्यास किंवा स्विकारण्यास मला कोणतीच अडचण नाही. कॅशलेस व्यवहारांसाठी सरकारी पातळीवरुन कायमस्वरुपी प्रयत्न झाल्यास त्याचे मी स्वागतच करीन. नोटाबंदी हा त्यावर कायमस्वरुपी उपाय नाही हे सिद्ध झाले आहे. सरकारने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लागणार्‍या आवश्यक पायाभूत सुविधा संपूर्ण भारतात उपलब्ध करुन द्याव्यात, असंही देशातील १०० % खेड्यांमध्ये सरकारने वीज पोचवल्यामुळे इंटरनेटही पोचवणे कठीण नाही. हे सर्व झाले की सगळ्या नोटाच रद्द करुन टाकाव्या, म्हणजे ना काळा पैसा निर्माण होणार, ना कोणी कर चुकवनार, ना दहशदवादी हल्ले होणार. हे सगळं करण्याऐवजी मोदी मुर्खासारखे नोटाबंदी करत बसले.
सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं झालं.
मान्य केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद'
राहुल गांधी आवडत नसेल तर मला आवडत नाही हे सरळ सांगायचं, असेल तर राग यायचं कारण नाही.
चर्चेचा तो विषय नसताना तुम्ही अनावश्यकपणे तसे खोडसाळ विधान केले. तसं सिद्ध करण्याचे आव्हान स्विकारायच्या ऐवजी पळ काढत आहात. खात्री करुन आरोप करावे, अन्यथा माफी मागून मोकळे व्हावे.
मोदींना तुम्ही मूर्ख समजता म्हणजे ज्यांना मोदीभक्त तुम्ही म्हणत आहात त्यांना तुम्ही काय समजता हे स्पष्ट होतंय. त्या सगळ्यांची बिनशर्त माफी मागा मग मी माझे विधान मागे घेतो.
मी आतापर्यंत जे खुलेपणे मोदीचे समर्थन करतात त्यांनाच मोदीभक्त असे संबोधले आहे. अजुनपर्यंत कोणीही त्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तुम्हाला गाढव आवडत असेल, त्याचा आवाजही आवडत असेल आणि त्यामुळे तुम्हाला मी 'गाढवभक्त' म्हणल्याने तुम्ही गाढव होत नाही किंवा तुमचा आवाजही गाढवासारखा होत नाही, त्यामुळे तुम्हाला राग येण्याचे कारण नाही, आणि राग येत असेल तर गाढवाची भक्ती करणे सोडुन द्यावे. ज्याची त्याची आवड.
मोदी आवडणाऱ्यांना जसे अंधभक्त म्हणले जाते तसे राहुल गांधी आवडणाऱ्याला मंदभक्त का म्हणू नये?
म्हणा की.

ट्रेड मार्क's picture

2 Oct 2018 - 8:06 pm | ट्रेड मार्क

खरंच अवघड केस आहे तुमची. मी आधी तुमच्या धंद्याच्या स्वरूपाबद्दल विचारलं तेव्हा तुम्ही सांगितलं नाही. मग आता कशाला ओरडताय? आणि वर मला मूर्ख म्हणणारे तुम्ही कोण. हा वैयक्तिक हल्ला आहे ना? आता संपादक मंडळ इकडे लक्ष देतंय का बघू.

मी जर म्हणलं की मजुरांबरोबर काम करून तुमची बुद्धी पण तेवढीच झालीये तर? जसे तुम्ही मोदींना शिव्या घालताय तसेच चोर पण पोलिसांना, न्यायालयांना घालत असतात. म्हणजे पोलीस आणि न्यायालये चूक आहेत का? जाऊदे, मी शक्यतो वैयक्तिक टीका करत नाही. तुम्ही वैयक्तिक झालात म्हणून नाईलाज झाला.

(संपादित) तुम्ही मोदींना शिव्या देत बसा...ना त्यांना काही फरक पडणार आहे ना इतरांना. ते त्यांचं काम करत रहातील.

संपादक मंडळ: मार्मिक गोडसे यांनी मला (संपादित) म्हणल्याने मी हा प्रतिसाद दिला आहे. त्यांनी माझी माफी मागितली तर हा प्रतिसाद उडवून टाकावा. मला कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करण्यात रस नाहीये.

मार्मिक गोडसे's picture

2 Oct 2018 - 9:06 pm | मार्मिक गोडसे

(संपादित)
अरे व्वा! हे बरंय तुमचं, मला (संपादित) संबोधून वर सं. मंडळाकडे माझी तक्रार करताय.
एक तर मुद्यावर चर्चा न करता विनाकारण वैयक्तिक झालात, माझ्या व्यवसायाशी काय देणेघेणे तुम्हाला. नसत्या चांभार चौकश्या. वर फुकटचे बालिश सल्ले देत बसलात. आता प्रतिवाद करता येत नाही म्हणून काही तरी निमित्त करून बसले रडत.
मी राहुल भक्त आहे हा जावईशोध तुम्हाला कुठून लागला हे सुध्दा स्पष्ट करा, अथवा ते विधान मागे घ्या.

सुबोध खरे's picture

24 Sep 2018 - 6:38 pm | सुबोध खरे

पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ?
तुमचं बेन्ड फारच ठणकतंय असं दिसतंय. काही उपचार करून घ्या कि.
किती ती जळजळ आणि ठस ठस?
मी कुठे फिरकावं, काय वाचावं आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याचा आपण ठेका घेतला आहे का?
सोडून द्या कि. आपला इलाज चांगल्या डॉक्टरकडून करून घ्या.

अभिजित - १'s picture

15 Sep 2018 - 7:19 pm | अभिजित - १

https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/demonetisation-...

Now that the RBI has admitted that 99.3% of all demonetised notes came back to the banking system (not counting what remains in Nepal and Bhutan), it is fairly clear that demonetisation was a flop. In economic terms. But it was a huge success in political terms for the prime minister personally and for his party in the Uttar Pradesh assembly elections
भक्त - छ्या .. ET फालतू पेपर आहे. संध्यानंद बरा !! ET विकला गेलाय !!

गामा पैलवान's picture

17 Sep 2018 - 5:28 pm | गामा पैलवान

हाहाहा, म्हणे ET विकला गेलाय! कोण घेणार विकत असला अंगठाछाप पेपर?

हा जो काळा पैसा आहे किनई, तो परत आलाय किनई, त्याने किनई, परतीच्या प्रवासात किनई, एके ठिकाणी किनई, हा#न ठेवलंय. त्याचा सुवास किनई सर्वत्र दरवळत नसून, फक्त किनई आयकर खात्यालाच येतो.

होक्किनई?

-गा.पै.