✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307089 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

आताच वडिलांशी बोललो, वडील

संदीप डांगे
गुरुवार, 11/10/2016 - 17:59 नवीन
आताच वडिलांशी बोललो, वडील इस्टेट ब्रोकरचे काम करतात. त्यांना विचारलं काय हालहवाल नोटाबदलीचा. म्हणाले नवीन खरेदी-विक्रीवर बंधनं आलीयेत. एकाने दुसर्‍याला द्यायला सतरा लाख कॅश आणले पण तो दुसरा विकत देणारा ह्या नोटा स्विकारण्यास तयार नाही. सौदा स्थगित झालाय. अजून दोन महिने रिअल इस्टेट शांत राहणार आहे. सुमारे ५० टक्क्यांनी किंमती घसरतील असा अंदाज आहे. नाशिकमधे नोटांच्या बदल्यात सोनारांकडे सोन्याचा भाव ५२००० रुपये तोळा चालू आहे. काळा पैसा तर असाही निर्माण होतंच आहे यातून. अजून बरंच काही गुलदस्त्यात आहे. मार्ग शोधणारे शोधतातच.

५० टक्क्यांनी किंमती ?

कपिलमुनी
गुरुवार, 11/10/2016 - 19:23 नवीन
अवघड आहे !
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अकोला शहरातली स्थिती आहे,

संदीप डांगे
गुरुवार, 11/10/2016 - 20:14 नवीन
अकोला शहरातली स्थिती आहे, नाशिक ला 3500 चे भाव असताना अकोल्यात 5000 चे भाव आहेत, हि फुगवण 50 % काळा पैशामुळे आहे
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

संदीप भौ..

चिनार
Fri, 11/11/2016 - 09:54 नवीन
संदीप भौ.. पन यामुळे घामाच्या आणि कर्जाच्या पैश्याने घर विकत घेतलेल्या लोकांचे एकप्रकारे नुकसानच होइल ना ? आता भाव कमी झाले तर घर विकतना आम्ही नुकसानीत विकायचे का?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

चलन फुगवटा कमी होईल

पैसा
Fri, 11/11/2016 - 10:02 नवीन
चलन फुगवटा कमी झाल्यामुळे आताच्या तुलनेत कमी किंमत आली तरी हातातल्या पैशांचे मूल्य आताच्या तुलनेत जास्त असेल. तसेही जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून मालमत्ता घेतलेली असेल तर मार्केट चढउतार किंवा इतर काही गोष्टींच्या प्रभावाने त्यात जसा फायदा होऊ शकतो तसे नुकसानही होऊ शकते याला मनाची तयारी पाहिजे. रहाण्यासाठी घेतलेल्या घराची किंमत कमी होवो की जास्त तसा काही फरक पडत नाही.
↩ प्रतिसाद: चिनार

देशासाठी इतकं सहन करायला हरकत

संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 10:41 नवीन
देशासाठी इतकं सहन करायला हरकत नाही
↩ प्रतिसाद: चिनार

मान गये डांगे भाऊ...!!

विशुमित
Fri, 11/11/2016 - 19:42 नवीन
मान गये डांगे भाऊ...!! देश भक्तांचा कस लागेल. (हा. घ्या )
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

http://economictimes

सुबोध खरे
गुरुवार, 11/10/2016 - 20:14 नवीन
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/income-tax-department-conducts-raids-across-mumbai-new-delhi-and-chandigarh/articleshow/55355059.cms
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

NRI ने पैसे कसे deposit करावेत ?

सप्तरंगी
गुरुवार, 11/10/2016 - 18:09 नवीन
NRI साठी फारशी माहिती मिळत नाहीये. NRO अकाउंट ला भरू शकतो पण भारताबाहेर असताना आणि ३१ मार्च पर्यंत भारतात येण्याची शक्यता नसताना हे ' अधिकृतरित्या (legally ) 'कसे काय साध्य करता येऊ शकेल ? Embassy ला हि अजून काहीही माहिती नाही आणि इथे कोणतीही भारतीय बँक नाही.

हाच प्रश्न

प्रदीप
गुरुवार, 11/10/2016 - 19:57 नवीन
मलाही पडला आहे. रिझर्व बँकेच्या ह्यासंबंधीच्या एफ. ए. क्यू. मधे हे पैसे तुम्ही तुमच्या NRO अकाउंटमधे भरू शकता असा उल्लेख आहे. "21. I am an NRI and hold NRO account, can the exchange value be deposited in my account? Yes, you can deposit the Specified banknotes to your NRO account." पण आपण जर ठराविक मुदतीच्या आत भारतात जाऊच शकणार नसू, तर काय करावे, ह्यासंबंधी काहीही माहिती नाही. तेव्हा मी कालच त्यांना ईमेलीतून हा प्रश्न विचारलाय. उत्तर मिळाल्यास इथे पोस्ट करेन.
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

आताच बातमी पाहिली

पैसा
गुरुवार, 11/10/2016 - 20:01 नवीन
त्याप्रमाणे नातेवाईकाला अ‍ॅथॉरिटी लेटर देऊन त्याच्याकडे नोटा पाठवता येतील असे स्टेट बँकेचे निवेदन आहे. अर्थात नोटा नातेवाईकापर्यंत कशा पोचतील ते मला माहित नाही.
↩ प्रतिसाद: प्रदीप

होय

प्रदीप
गुरुवार, 11/10/2016 - 21:18 नवीन
हे मीही वाचले आहे. पण नातेवाईकांना ह्यासाठी भरीस घालणे त्रासाचे वाटते.
↩ प्रतिसाद: पैसा

@ प्रदीप : हो मी पण हेच पहिले

सप्तरंगी
गुरुवार, 11/10/2016 - 20:39 नवीन
@ प्रदीप : हो मी पण हेच पहिले. नक्की सांगाल, आम्ही पण वाट पाहतोय काही अपडेट्स यायची. एम्बसीने वाट पहा किंवा आरबीआय ला मेल करायला सांगितले आहे. @ पैसा बहुतेक नोटा पोस्टाने पाठवणे वैध असते आणि सध्या नातेवाईकांच्या कामात अजून भर घालण्यापेक्षा स्वतःच हे करण्याचा मार्ग उपलब्ध व्हायला हवा.
↩ प्रतिसाद: प्रदीप

आरबीआयचे उत्तर

प्रदीप
Sun, 11/13/2016 - 15:57 नवीन
थोडेसे अपेक्षित होते, तेच आले. म्हणजे थोडक्यात एकमेव मार्ग आपल्या NRO अकाउंटमधे स्वतः अथवा कुण्या इतरांतर्फे भरणे. माहितीसाठी संपूर्ण उत्तर इथे डकवत आहे: "You can deposit the Specified banknotes to your NRO account. If you have Specified banknotes in India, you may authorise in writing enabling another person in India to deposit the notes into your bank account. The person so authorised has to come to the bank branch with the Specified banknotes, the authority letter given by you and a valid identity proof (Valid Identity proof is any of the following: Aadhaar Card, Driving License, Voter ID Card, Pass Port, NREGA Card, PAN Card, Identity Card Issued by Government Department, Public Sector Unit to its Staff)" त्यांच्या सध्याच्या धांदलीत उत्तर आले हेच विशेष मानतो.
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

आभार प्रदीप पण आमच्या नोटा

सप्तरंगी
Tue, 11/15/2016 - 20:18 नवीन
आभार प्रदीप पण आमच्या नोटा भारतात नाहीत इथे आहेत, म्हणजे वरील त्यांनी सांगितलेले option आमच्यासाठी बाद. इथे राहणाऱ्या आणि डिसेंबर मध्ये भारतात जाणाऱ्या बाकी भारतीयांकडे स्वतःचे आणि मित्रांचे पैसे आहेतच deposit करायला, त्यामुळे ते पण पण कितपत शक्य होईल माहिती नाही. सगळ्या अनिवासाची भारतीयांसाठी बाहेर काहीतरी option उपलब्ध असायला हवे होते. इथे बसून NRo अकाउंटला कॅश कशी deposit करणार ???
↩ प्रतिसाद: प्रदीप

अजून पण या प्रश्नच उत्तर मिळत

शब्दबम्बाळ
गुरुवार, 11/10/2016 - 20:40 नवीन
अजून पण या प्रश्नच उत्तर मिळत नाहीये कि जर काळा पैसे आटोक्यात आणायचा आहे तर २००० ची नोट का आणली जातेय? कदाचित १००० ची नोट पण पुन्हा येऊ शकते. मोठया किमतीच्या नोटांनी गैरव्यवहार सुलभतेने करता येतील...

बोकिलांनी एबीपी माझावरील

सतिश गावडे
Sun, 11/13/2016 - 17:18 नवीन
बोकिलांनी एबीपी माझावरील मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, जे लोकांनी बांधलेल्या "अंदाजांपेक्षा" वेगळे आहे. २००० च्या नोटा कमी प्रमाणात छापल्या जाणार असून ५०० आणि १०००च्या नोटा बाद केल्यानंतर लोकांची नोटांअभावी गैरसोय होऊ नये म्हणून हा पर्याय त्यांनी निवडला आहे. हे सांगताना त्यांनी हायवेच्या कामाचे उदाहरण दिले आहे. हायवेचे काम चालू केल्याने रहदारी ठप्प होऊ नये म्हणून हा सोयीचा असा बायपास आहे. दोन हजारची नोट का सांगताना लोकांनी भारी पुडया सोडल्या होत्या.
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

हा

पैसा
Sun, 11/13/2016 - 17:46 नवीन
आणि हायवेचे काम संपल्यावर बायपासची जरूरी रहाणार नाही. तेव्हा तो बंद होऊ शकतोच! माझा अंदाज असा की साधारण ५ वर्षांनी पुन्हा १००० आणि २००० च्या नोटा रद्द होतील. आणि तेव्हाची चलनवाढीची परिस्थिती बघून कदाचित ५०० सुद्धा.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय. मात्र ते नविन "जाळं"

सतिश गावडे
Sun, 11/13/2016 - 18:08 नवीन
होय. मात्र ते नविन "जाळं" नक्कीच नाही. ती परिस्थितीची गरज आहे. कमी उत्पादन खर्चात अधिक मुल्याचे चलन तातडीने उपलब्ध करणे हा त्यामागचा हेतू आहे.
↩ प्रतिसाद: पैसा

तरी त्याने काय फरक पडेल नक्की

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 18:17 नवीन
तरी त्याने काय फरक पडेल नक्की? म्हणजे २००० ची नोट, पण सुट्टे द्यायला कोणी तयार नाही, १०० च्या नोटांचा तुटवडा. पुढचे काही दिवस खरंच बघू देत काय होतंय.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय ते आहेच. मी आज दहा नोटा

सतिश गावडे
Sun, 11/13/2016 - 18:51 नवीन
होय ते आहेच. मी आज दहा नोटा घेऊन आलो आहे आणि कुणीही सुट्टे द्यायला तयार नाही. मात्र रोखीने कराव्या लागणार्‍या मोठ्या रकमेची तर सोय झाली. व्यक्तीशः मलाही अशा मोठ्या रोख रकमेची गरज होती. ती पुर्ण झाली. २००० हजारच्याही नोटा नसत्या तर मला सरकारच्या नावाने शंख करावा लागला असता.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बहुसंख्य किंवा पुरेश्या

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 21:05 नवीन
बहुसंख्य किंवा पुरेश्या %मध्ये* लोकांना बँकेच्या मदतीने (चेक, डीडी, केडिट/डेबीट कार्ड, फोन बँकिंग, ऑनलाईन, इ) पैश्याचे मोठे व्यवहार करण्याची सवय लागली की २००० च्या (व नजीकच्या काळात येणार असे म्हटल्या जाण्यार्‍या ५०० व अधिक किंमतीच्या) नवीन नोटा कायमच्या रद्द झाल्या तर आश्चर्य वाटू नये. हा काळ साधारण १ ते ३ वर्षे असेल असा अंदाज करता येईल, हा काळ बँकिंग व्यवहारांना सवयीचे करण्यासाठी सरकारने आतापर्यंतच्या वापरलेल्या व भविष्यातल्या इतर योजनांमुळे कमी जास्त होऊ शकतो. मोठ्या किंमतीच्या नोटा आजपासून ३ वर्षांच्या आत रद्द केल्या तर (अ) नवीन नोटांच्या उपयोगाने या काळात निर्माण झालेल्या काळ्या पैशाचा आवाका खूप कमी राहील व (आ) नवीन खोटा पैसा छापून तो वापरणे (त्या कृतीला शुन्यापासून सुरुवात करावी लागल्याने) आयएसआय सारख्या संघटनांना तितकेसे सोपे राहणार नाही. नवीन नोटा रद्द करून रु१००ची नोट मोठ्यात मोठी असल्यावर काळ्या पैशाचे व्यवहार अधिकच कठीण होतील. कोणत्याच देशात काळा पैसा ०% आहे असे नाही (जसे ० चोर्‍या ही स्थिती); कारण तशी अवस्था व्यवहारात आणण्यासाठी मोजावी लागणारी आर्थिक किंमत जबर असेल व त्यासाठी करावे लागणारे नियम/कायदे सर्वसामान्य नागरिकांना असह्य असतील. काळ्या पैशाचे प्रमाण नगण्य किंवा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार नाही इतके कमी असले तरी तो फायद्याचा तोडगा होईल. ====== * : ज्यांचे दिवसाचे उत्पन्न ६८४ रुपयांपेक्षा म्हणजेच वर्षाचे २.५ लाखापेक्षा कमी आहे त्यांची शिल्लक बँकेत आली तर उत्तमच; पण ती बँकेत आली की नाही याने काळ्या पैशावर परिणाम होणार नाही व त्या नागरीकांना ५०० किंवा अधिक किंमतीच्या नोटा चलनात असल्या नसल्या तरी फार फरक पडणार नाही. भारतात अश्या लोकांची संख्या लक्षणिय आहे. हे नागरीक त्या %च्या बाहेर असतील. याचाच अर्थ असा की, सद्यस्थितीत, मोठ्या किंमतीच्या नोटा रद्द करायची वेळ येण्यासाठी भारतात १००% किंवा त्याच्या फार जवळच्या %मध्ये लोक बँक सॅव्ह्व्ही व्हायची गरज नाही.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमचे म्हणणे योग्यच आहे काका.

सतिश गावडे
Mon, 11/14/2016 - 09:04 नवीन
तुमचे म्हणणे योग्यच आहे काका. मी माझ्या नजिकच्या काळातील रोख रकमेच्या गरजेबद्दल म्हटले. आपल्या रायगड जिल्ह्यातील एका अडनिड्या गावात आज तरी मी कार्ड वापरू शकत नाही. :) काल मेसमध्ये जेवायला गेलो असता त्यांना "तुम्ही मशीन घ्या आता" असे सुचवले. तर त्या काकू म्हणाल्या "आम्हाला डोकेदुखी होईल ती" :) यातलं पहीलं पाऊल म्हणजे शॉप अ‍ॅक्ट खाली नोंदणी केलेल्या दुकानांमध्ये कार्ड पेमेंट मशीन अनिवार्य करता येईल.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे सांगताना त्यांनी हायवेच्या

मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 19:10 नवीन
हे सांगताना त्यांनी हायवेच्या कामाचे उदाहरण दिले आहे. हायवेचे काम चालू केल्याने रहदारी ठप्प होऊ नये म्हणून हा सोयीचा असा बायपास आहे.
नुसता बोर्ड लावून प्रत्यक्षात बायपासचा रस्ताच नसेल तर काय फायदा? रहदारी ठप्पच होणार ना? आज २००० हजारच्या नोटेबाबतीत तेच होतेय.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय. त्याबाबत जनतेला पुरेशी

सतिश गावडे
Sun, 11/13/2016 - 19:28 नवीन
होय. त्याबाबत जनतेला पुरेशी माहिती करुन द्यायला हवी होती याच्याशी सहमत. हाच प्रश्न मलाही पडला होता आणि मी याच धाग्यावर तो लिहीला होता. मात्र कुणी ढूंकूनही पाहीले नाही माझ्या प्रश्नाकडे. नंतर काही प्रतिसादातून कळलं की "ते नविन जाळं आहे" =))
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

"ते नविन जाळं आहे" ह्यावर

संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 19:32 नवीन
"ते नविन जाळं आहे" ह्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या हुशारीबद्दल काय बोलावे ? =)) =)) =))
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सगासर, २००० च्या नोटेची गरज

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 20:27 नवीन
सगासर, २००० च्या नोटेची गरज तुम्ही तुमच्या उदाहरणानेच सिद्ध केलीय. जर काढली नसती तर ते लोकही ओरडलेच असते. आणि २ ते ४ दिवसात ५०० रु.च्या नोटा बाजारात असतील अशी आशा आहे. त्यानंतर हा प्रश्न आताईतका त्रासदायक असणार नाही.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गरज म्हणण्यापेक्षा उपयुक्तता!

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/13/2016 - 20:31 नवीन
गरज म्हणण्यापेक्षा उपयुक्तता!
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

IMPORTANT NOTICE :

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/10/2016 - 20:54 नवीन
IMPORTANT NOTICE : Income Tax department has added a new window in their I.T. E-FILING WEBSITE viz " ACCOUNT CASH TRANSACTIONS " , from today morning.....!!!!! The moment CASH is deposited into your Bank a/c , the amount will immediately reflect in this WINDOW of the I.T. Department. All the Banks Server's have been linked with the CPU of I.T. Department for CASH transactions....!!!!

हे फारंच भारी काम झालंय!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/10/2016 - 22:22 नवीन
आज रात्री एकपर्यंत ई-फाईलींग साइट बंद आहे. उद्या नक्की काये ते बघायला हवं.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

५०० आणि १००० च्या नोटा

सतिश गावडे
गुरुवार, 11/10/2016 - 21:46 नवीन
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या हे उत्तम झाले. पण आता त्याहीपेक्षा मोठ्या रकमेच्या नोटा छापण्याचे कारण काय?

भविष्यात आजून एक दणका संभाव्य

गामा पैलवान
गुरुवार, 11/10/2016 - 21:54 नवीन
श्रीगुरुजी,
कदाचित ते काही काळ २००० च्या नोटा अर्थव्यवस्थेत स्थिरावू देतील व काही काळानंतर अचानक २००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून अधिक प्रमाणात काळा पैसा श्वेत स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतील.
अगदी माझाही अस्साच अंदाज अजे. आ.न., -गा.पै.

या व्हिडीओ मध्ये या निर्णयाने

सही रे सई
Fri, 11/11/2016 - 00:31 नवीन
या व्हिडीओ मध्ये या निर्णयाने शोर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये वेगवेगळया सेक्टर वर कसा कसा परिणाम होईल हे छान समाजावून सांगितलं आहे. जरुर पाहावा.

या व्हिडीओ मध्ये या निर्णयाने

सही रे सई
Fri, 11/11/2016 - 00:32 नवीन
या व्हिडीओ मध्ये या निर्णयाने शोर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये वेगवेगळया सेक्टर वर कसा कसा परिणाम होईल हे छान समाजावून सांगितलं आहे. जरुर पाहावा.

माहिती हवी आहे

विकास...
Fri, 11/11/2016 - 08:55 नवीन
माहिती हवी आहे जाणकार लोकांनी माहिती द्यावी कि १. एका पॅन कार्ड वर पुढील ५० दिवसांमधील व्यवहार २,५०,००० च्या वर असतील तर त्यांचा स्रोत द्यावा लागेल? २. एका रेशन कार्ड मधील सगळ्या नावावरील सगळ्या खात्यावरील एकूण व्यवहार दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त असेल तर त्याचा स्त्रोत द्यावा लागेल? या पैकी बरोबर काय आहे?

पहिले अधिक बरोबर आहे. मात्र

खेडूत
Fri, 11/11/2016 - 11:45 नवीन
पहिले अधिक बरोबर आहे. मात्र त्या कुटुम्बातल्या *अन्य सदस्याचे अन्य व्यवहार पहाता ते शंकास्पद वाटल्यास चौकशी होईल. मात्र दुसर्‍या शक्यतेत आमची चौकशी का केली असे विचारता येणार नाही. त्या पॅनकार्डधारकाचा गेल्या दोन वर्षातला व्यवहार पहाता अशी शंका आल्यास चौकशी होऊच शकते. ( * कुटुंबातले अन्य सदस्य ओळखता येतील, कारण बँकेचे पोर्टल आयकर खात्याला उपलब्ध करून दिल्याचे वाचले. एका खात्याचा नॉमिनी दुसर्‍याचा कोण आहे त्याचा उल्लेख असतोच.)
↩ प्रतिसाद: विकास...

३ लाख जाहिर न केलेले पैसे

नावातकायआहे
Fri, 11/11/2016 - 09:29 नवीन
३ लाख जाहिर न केलेले पैसे असतिल तर दंड भरुन किती परत मिळतील? माहिती हवी आहे.

३ लाखातील

ट्रेड मार्क
Fri, 11/11/2016 - 22:06 नवीन
२.५ लाखांवर टॅक्स नसेल वरील ५०,००० वर १०% प्रमाणे ५,००० टॅक्स ५,००० च्या २००% पेनल्टी म्हणजे १०,००० म्हणजे एकूण १५,००० आत्ता भरायला लागतील. त्यात परत हे ३ लाख तुमच्या सकाळ वार्षिक उत्पन्नात धरले जातील आणि मग त्यावर जो काही आयकर असेल तो भरायला लागेल. मी यातला तज्ज्ञ नाही त्यामुळे कृपया तुमच्या CA ला वगैरे विचारावे.
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

जुनी गोष्ट.

राही
Fri, 11/11/2016 - 09:59 नवीन
मोरारजीभाईंनी नोटा रद्द केल्या होत्या तेव्हा सुरतेतल्या हिरेकारखान्यांतल्या कर्मचार्‍यांपैकी काहींनी नोटेची सुरनळी करून त्यात तंबाखू भरून त्याचे धूम्रपान केले होते. त्या काळात हिरेकारागिरांचा पगार चार-पाच आकडी असे. तेव्हाही मोरारजीभाईंवर सडकून टीका झाली होती. आणि या कृतीचा फारसा उपयोग होणार नाही असे म्हटले गेले होते. याच्या बर्‍याच आधी मोरारजीभाईंनी सुवर्णनियंत्रण कायदा आणला होता ज्याद्वारे उच्च शुद्धतेच्या सोन्याचे दागिने बनवण्यावर बंदी आणली होती. १४ कॅरट इतक्याच शुद्धतेचे (पूर्ण शुद्धता म्हणजे २४ कॅरट) दागिने बनवणे सक्तीचे केले होते. यात भरपूर तांबे असल्याने आणि तांबे हे सोन्याइतके मॅलिएबल आणि डक्टाइल नसल्याने नाजुक कलाकुसरीचे दागिने बनवता येईनासे झाले. ओबडधोबड वळी, तोडे, आंगठ्या कोणी घेईनासे झाले. सुवर्णकारागिरांचा धंदा बसून ते बेरोजगार झाले. त्यांनी आंदोलन केले. तेव्हा नुकसानभरपाई म्हणून या सुवर्णकारांचा समावेश वर्गीकृत जातींमध्ये करून त्यांना शिक्षणात आणि नोकर्‍यांत आरक्षणाची हमी देण्यात आली. अर्थात आपल्या इथल्या सुवर्णबुभुक्षित लोकांनी अनधिकृतपणे शुद्ध सोन्याचे दागिने घडवून घेऊन या कायद्याचे तीन तेरा वाजवले ती वेगळी गोष्ट.

पुरवणी..

राही
Fri, 11/11/2016 - 10:08 नवीन
अर्थात असे निर्णय वारंवार घेतले जात नसतात. असे म्हणजे चलनसंहार किंवा अवमूल्यन. चलनसंहार तर संकटाच्या वेळीच केला जातो. चलनाचे स्वरूप सतत अस्थिर राहिले तर लोकांचा चलनशाश्वततेवरचा विश्वास उडू लागतो. चलनातले व्यवहार कमी होऊ लागतात. भारतासारख्या अर्थनिरक्षर समाजात असे होणे हे त्रासदायक ठरू शकते. ई-व्यवहार किंवा प्लास्टिक व्यवहार रुळू लागले की चलनसंहाराची तितकीशी गरजच उरत नाही.
↩ प्रतिसाद: राही

भले

अन्नू
Fri, 11/11/2016 - 10:21 नवीन
अशाच आता निवडणुकीच्या जेमतेम तीन दिवस आधी हजार आणि दोन हजारच्या नोटी रद्द कराव्यात! ;)

महाराष्ट्रात निवडणुका आहेतच

अनुप ढेरे
Fri, 11/11/2016 - 10:45 नवीन
महाराष्ट्रात निवडणुका आहेतच आता. त्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी जमवलेले असणार पैसे. त्यांची रिअ‍ॅक्क्षन बघण्यासारखी असेल.
↩ प्रतिसाद: अन्नू

२००० रुपयाची नोट बघितली..

बबन ताम्बे
Fri, 11/11/2016 - 12:20 नवीन
आकाराने १०० रु. च्या नोटेपेक्षा छोटी, अत्यंत पातळ कागद. लहान मुलांचे खेळण्यातल्या खोट्या नोटा असतात तशी वाटते. म्हणतात की याची नक्क्ल बनवणे सोपे नाही, पण प्रथम दर्शनी तर २००० रुपयाची नोट अगदी पातळ कागदाचा छोटा तुकडा वाटतो आणि यदाकदाचीत कुणी नकली नोट बनवलीच, तर असली-नकली नोटेमधे सर्वसाधारण माणसाला फरक ओळखणे कठीण होऊन जाईल. त्या मानाने सध्याच्या (आता आउटडेटेड) ५०० आणि १००० च्या नोटा उच्च दर्जाच्या वाटतात . नोटा रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय खूप स्तुत्य. पण दुसरीकडे अशा २००० च्या नोटा छापून काळ्या पैशावर नियंत्रण कसे येणार हे कळले नाही. उलट नवीन २००० रुपयाची नोट खूपच हँडी झालीय हाताळायला.

आता हवाला वाल्यांना सोयीचे

एस
Fri, 11/11/2016 - 12:30 नवीन
आता हवाला वाल्यांना सोयीचे झाले. पूर्वी खिशात बिशात जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत रक्कम हे अंगडीये नेऊ शकत होते. आता दहा लाख नेतील. शंभर रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा कशाला हव्या आहेत? परत काळा पैसा निर्माण होईल.

एक शन्का आहे - जे सोनार अनधिक्रुतपणे

gogglya
Fri, 11/11/2016 - 12:33 नवीन
अव्वा च्या सव्वा रक्कम घेउन सोने विकत आहेत, त्यांच्याकडील जास्तीचे पैसे पांढरे कसे करतात ?

अव्वा च्या सव्वा रक्कम घेउन

मार्मिक गोडसे
Fri, 11/11/2016 - 12:49 नवीन
अव्वा च्या सव्वा रक्कम घेउन सोने विकत आहेत, त्यांच्याकडील जास्तीचे पैसे पांढरे कसे करतात ?
हाच प्रश्न मला पडलाय. डाल मे कुछ काला है. म्हणून मी वर ह्याविषयी विचारले होते.
↩ प्रतिसाद: gogglya

८ दिवस आधीची विक्री

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 11/11/2016 - 20:32 नवीन
व्यापार्‍यांना ८ दिवस आधीची विक्री दाखवाता येते. टॅक्सेशनमध्ये ज्या रिसीटस दाखवता येतात, त्या ८ दिवस प्रीडेटेड असु शकतात. त्यामुळे त्यांना आधीची विक्री दाखवुन त्या नोटा जमा करता येईल. अर्थात हा एक अंदाज. सोनार मंडळींकडे किती सोने आहे, ह्याचा काहिही अंदाज नसल्याने सोनाराच्या कॅपॅसिटीनुसार तो पैसा व्हाईट करु शकेल.
↩ प्रतिसाद: gogglya

टेकीला आलेली चिंताग्रस्त

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 21:25 नवीन
टेकीला आलेली चिंताग्रस्त माणसे अश्या अनेक चुका करतील आणि सरकारला त्यांना खड्यासारखे निवडायला मदतच होईल :) सोने घ्या किंवा इतर काही खरेदी करा; कोणत्याही विक्रीची नोंद (सोनार, मॉल किंवा इतर ठिकाणी) होईलच. कारण नोंद न करता जुन्या नोटा घेऊन विक्री केली तर ते बेकायदेशीर होईल व विक्री करणारा त्याच्याकडे त्या नोटा कश्या आल्या ते कसे दाखवणार ? शिवाय नोव्हेंबर आणि डिसेंबरमधल्या (आणि मागच्या महिन्यांत खोटेपणाने दाखवली तरी त्यामहिन्यांमधल्या) विक्रिची तुलना गेल्या काही वर्षांतील त्या महिन्यांत झालेल्या विक्रिशी करविभाग करेलच... व त्याला पटेल असे कायदेशीर उत्तर देणे कठीण असेल. खरा व्यवहार उघड केला नाही तर विक्री करणारा पकडला जाईल. त्यामुळे, त्याने खरा व्यवहार दाखवून त्यावरचा कर भरणे त्याच्यासाठी योग्य असेल. पण तसे केल्याने खरेदीदार उघडा पडून आयकराची चौकशी त्याच्यापर्यंत पोचेल :)
↩ प्रतिसाद: gogglya

आकाराने १०० रु. च्या

मार्मिक गोडसे
Fri, 11/11/2016 - 12:36 नवीन
आकाराने १०० रु. च्या नोटेपेक्षा छोटी, अत्यंत पातळ कागद. लहान मुलांचे खेळण्यातल्या खोट्या नोटा असतात तशी वाटते.
कदाचीत २००० च्या नोटेचा कागद हलक्या दर्जाचा वापरला असावा ज्यामूळे तीचा उत्पादन खर्च कमी असेल व पुढेमागे चलनातून बाद केले तरी फारसे नुकसान होणार नाही.

पातळ कागद

पैसा
Fri, 11/11/2016 - 13:09 नवीन
५०० आणि हजारच्या नोटा जेव्हा खोट्या सापडतात तेव्हा बहुतेक वेळा त्यांचा कागद नेहमीपेक्षा हाताला जाड लागतो. आम्ही बँकातले लोक नोट मशीनमधे न टाकता मोजता मोजता केवळ कागदाच्या स्पर्शावरून खोटी नोट ओळखू शकतो. जर का दोन हजारचा कागद पातळ असेल तर त्या खोट्या नोटा अधिक सहज ओळखू येतील.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा