कट्टा

अभिजित कुमावत's picture
अभिजित कुमावत in जनातलं, मनातलं
14 Nov 2016 - 9:07 pm

कट्टा हा शब्द बहुतेक करुन पुणेरिच.

कट्टा जिथे अनेक मित्र एकमेकांना भेटतात. जिथे अनेक नवीन मित्र भेटतात, अनेक व्यक्ती भेटतात.

कट्टा म्हणजे एक ठिकाण जिथे सगळ्यांना काही वेळ घालवावा असे वाटते. ईथे बऱ्याच चर्चा रंगतात. कुठलाही विषय पाहिजे असा नाही, बास सोबात कोणीतरी असावे एवढच.

कट्टा म्हणजे अशी कुठली जागा fix नाही. एखाद hotel, टपरी, cafe, चौक, पार, ground, अगदीच देऊळ सुद्धा. सर्व मित्रांना योग्य अणि सोईस्कर वाटणारि एक जागा.

एक मात्र नक्की कट्याची सवय ज्याला लागते त्याला ती सवय सहजा सहजी काही सोडता येत नाही. कट्टा ही जागाच अशी.

इथले विषय सन्दर्भ धरून असतीलच अस नाही. पण कुठलेही विषय इथे विनाकारण रंगू शकतात. अगदी लहानपणीचे विषय असुद्यात् किंवा अत्ताचे, picture चे असू दयात नाहीतर गाण्यांचे, collage, office, girlfriend, बायको, मित्र, मैत्रीण, घर, politics.... असे यथेच्य विषय. न संपणारे विषय, कधी परत बोलू नये असे वाटणारे विषय, गंभीर विषय, किंवा gossips पण. एथ कधी कोणाची फार खेचली जाते, तर कधी कोणाबद्दल फार हळ हळ व्यक्त होते.

ईथे फार वेगळे वेगळे plans ठरतात. ट्रिप, movie, कोणाला कसे चेपायचे. कोणाला कसे सावारायचे. कोणाला कसे झापायचे तर कोणाला कसे समजावयाचे.....

प्रत्येकाच्या आयुष्यात हा कट्टा म्हणजे हवी हाविशि जागा.... जेव्हा रोज जाण होत तेव्हा तर त्या कट्या बद्दल वटनार कौतुक असतच... पण कट्टयावर जाण कमी झाल तर त्याबद्दल जास्त हळहळ वाटते.....

भल्या भल्यांची होते ईथे थट्टा
भल्या भल्यांना लागतो ईथे बट्टा
मैंत्रिवर इथे लागतो मोठा सट्टा
पण फार हवा हवासा वाताणारा असा हा कट्टा......
Abhi.k.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

14 Nov 2016 - 9:34 pm | आदूबाळ

शेट, स्वागत आहे. लिहीत रहा.

अभिजित कुमावत's picture

14 Nov 2016 - 9:52 pm | अभिजित कुमावत

जरूर

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Nov 2016 - 10:11 pm | माम्लेदारचा पन्खा

पण असो....छान लिहिलंय.....!

अभिजित कुमावत's picture

14 Nov 2016 - 10:23 pm | अभिजित कुमावत

हा हा हा... धन्यवाद... नवीन काय जुना काय कट्टा कधीही कुठंही जमू शकतो

पैसा's picture

14 Nov 2016 - 10:25 pm | पैसा

छान लिहिलय!

अभिजित कुमावत's picture

14 Nov 2016 - 11:44 pm | अभिजित कुमावत

धन्यवाद

अभिजित कुमावत's picture

14 Nov 2016 - 11:44 pm | अभिजित कुमावत

धन्यवाद

कंजूस's picture

15 Nov 2016 - 7:34 am | कंजूस

कल्याण वसईत पारनाका.
सांगली मिरजेकडे कुसवावर भेटतात.
मुंबईत नाका
पुणे चौक/घाट?

मला वाटलं कट्ट्याचा धागा काढलंनीत का काय.