संकट आपल्यामागे की आपण संकटाच्या पुढे...
काल सकाळी- सकाळी मोर्निंग वॉकला गेलो होतो गाडीवरून. अहो म्हणजे, गाडीवरून बागेत गेलो आणि तिथे मोर्निंग वॉक/योग केले.
तिथून घरी परत येत असताना एका गल्लीमध्ये गाडी नेली. तेव्हा तेथील एक कुत्रे जे खरे तर माझ्या वाटेवर नव्हते ते उगाच पळायला लागले. त्याची एवढी घाबरगुंडी उडाली की पळता-पळता ते बरोबर गाडीच्या समोर आले आणि आणखीन घाबरून जोरात पळू लागले.
वास्तविक पाहता मुळात कुत्र्याने माझी गाडी आली म्हणून पळण्याची गरज नव्हती कारण ते तसेही वाटेत येत नव्हते. मात्र नंतर त्याच्या चुकीच्या अस्वस्थतेमुळे ते विनाकारण गाडीसमोर (संकटासमोर ) धावू लागले.