नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
11 Dec 2016 - 7:22 am

मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.
तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.

१. 'साडी'तील सौंदर्य (-वती)

...

२. या भावनांतील गीत पुराणे...

.....

४. चेहरे
...

५. निसर्गचित्रे
...

६. व्यक्तीचित्रे (पाश्चात्त्य)
...

७. किल्ले, प्रासाद, प्रार्थनागृहे....
...

८. राजाधिराज आणि राणीसरकार
...

९. अभिनेत्री

...

आणखीही बरेच काही.....(सूचनांचे स्वागत आहे).
(क्रमशः) .... आगामी भाग २: 'साडी'तील सौन्दर्य(-वति)

वावरसंस्कृतीकलासमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रत्येक कॅटेगरीतल्या सर्वोत्तम ( किंवा २/३) प्रतिमा टाकून, त्याचा रसास्वाद घेणं इष्ट होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2016 - 10:16 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर धागा कल्पना !

तुमच्या रसिक दृष्टीतून चित्रे पहायला नेहमीच मजा येते. प्रत्येक चित्राबरोबर तुमची टिप्पणी जरूर टाका, म्हणजे आम्हाला कलाकाराच्या दृष्टीतून दिसलेले चित्रही बघायला मिळेल.

चित्रगुप्त's picture

11 Dec 2016 - 6:43 pm | चित्रगुप्त

@ संजय सर आणि डॉ. म्हात्रे: सूचनांबद्दल आभार. खरेतर चित्रांविषयी शब्दात काही लिहीणे माझ्यासाठी खूपच अवघड आहे, तरी यथानुशक्त्या प्रयत्न करेन. कदाचित 'मला या चित्रात काय आवडले' असे काहीतरी लिहू शकेन.

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2016 - 12:24 am | संजय क्षीरसागर

म्हणजे चित्राचा आस्वाद कसा घ्यावा, त्यामागे चित्रकाराची भूमिका काय आहे , रंगांचा मनावर होणारा परिणाम, बॅकग्राऊंडचं वैशिष्ठय...... वगैरे कळतील. नुसती कलाकृती पाहून तितकासा उलगडा होणार नाही.

अत्यंत सुंदर !!!!!!!!
क्रमांक १ उजवी बाजु (भावशुन्य)
क्रमांक ९ उजवी बाजु (भडक)
च्या दोन सुंदरी वगळता
बाकी सर्व अत्यंत सुंदर नेत्रसुखद.
चित्रगुप्त सर तुम्ही चांगल्या मुड मध्ये दिसताय याचा फायदा उचलुन काही खुप आवडलेल्या ( पण शुन्य कळलेल्या ) पेंटींग टाकतो प्लीज भाष्य करावे आम्हालाही थोडा आनंद मिळेल. थोडीफार चित्र कसे पाहावे समजेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Dec 2016 - 4:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

निंफ्स अँड द सेटीर

आहे बहुदा हे, मला नक्की नाही सांगता येत आहे पण 'वासना कसे एका जीवाला ग्रासतात' हे दाखवायचा एक यशस्वी प्रयत्न चित्रकाराने ह्यात केला आहे, त्या नग्न स्त्रिया म्हणजे सेलेस्टिअल निंफ्स (स्वर्गलोकातल्या अप्सरा) असून त्यांना जलक्रीडा करताना आशाळभूत कामातुर नजरेने पाहणाऱ्या एका सेटीरला (अर्धमानव अर्धअज म्हणजेच अर्ध शरीर मानवी अन अर्ध बकऱ्याचे असणारा एक ग्रीक पुराणातला जीव) पाण्याच्या तळ्यात ओढत आहेत, जे काही त्या सेटीरला तितकेसे रुचले नाहीये अन तो अप्सरांच्या त्या प्रयत्नांना विरोध करतोय, काही निंफ्स तळ्याच्या पलीकडल्या किनाऱ्यावर असून त्या कदाचित घाबरलेल्या असाव्यात.

कंजूस's picture

11 Dec 2016 - 12:29 pm | कंजूस

छान आहेत चित्रं.

चित्रगुप्त's picture

11 Dec 2016 - 7:01 pm | चित्रगुप्त

@ मारवाश्री आणि कंजूसपंत, चित्रे आवडत आहेत, हे वाचून छान वाटले.
मारवाश्री तुम्ही दिलेल्या बुगेरो (William Bouguereau १८२५-१९०५) च्या चित्राबद्दल लवकरच लिहीतो. बुगेरोवर नुक्तेच एक मोठे पुस्तक प्रकाशित झालेले आहे, ते घेण्याचा विचार करतो आहे. बुगेरो हा चित्रकार फ्रेंच अ‍ॅकॅडेमिक कलेचा कळस म्हणता येईल, परंतु पुढे आधुनिक कलेच्या पाठीराख्यांनी त्याची हेटाळणी करून कलाइतिहासातून त्याला बाद केले, ते एक शतक. आता पुन्हा त्याचे पुनर्मुल्यांकन होऊन प्रतिष्ठा मिळत आहे.

.

या माहीतीसाठी व त्याहुन सुरेख बुगेरोच्या दुव्यासाठी
दंडवत स्वीकारावा
_/\_

चित्रगुप्त's picture

11 Dec 2016 - 9:35 pm | चित्रगुप्त

बुगेरो विषयी विकिपिडिया पेक्षाही जास्त चांगली माहिती, विविध लेख आणि चित्रे खालील दुव्यावर आहेतः
http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=7

पैसा's picture

12 Dec 2016 - 10:24 pm | पैसा

मलाही तुमच्याकडून निव्वळ चित्रांपेक्षा त्यावरचे भाष्य जास्त वाचायला आवडेल.

चित्रगुप्तजी, तुम्ही सर्व भाग फक्त "'साडी'तील सौन्दर्य" विषयावर केलेत तर फार चांगले होइल.

विवेकपटाईत's picture

13 Dec 2016 - 7:01 pm | विवेकपटाईत

खरोखरच सुंदर, मला ४ आणि ९ नंबरची चित्रे जास्त आवडली.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ज्योति अळवणी's picture

14 Dec 2016 - 3:23 pm | ज्योति अळवणी

Sundar kalpana

प्रचेतस's picture

14 Dec 2016 - 6:31 pm | प्रचेतस

धागा नाही पटला.

जालीय साध्या चित्रांपेक्षा डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.

डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.

एका अर्थी खरं आहे, परंतु अश्या विख्यात कलाकृतींवर टनावारी साहित्य उपलब्ध आहे, त्यासमोर मी आणखी काय पणती लावणार ? परंतु सर्वसामान्य नेटकराच्या नजरेतून निसटणार्‍या अनेक सुंदर प्रतिमा असतात. त्यांचा शोध घेण्याचा एक प्रयत्न आहे.