मी कोणी एवढा मोठा नाही की कोणी तरी येईल व माझी मुलाखात घेईल. पण मला माझी काही व्यसने सोडायचीच आहेत. पण मला माझा अनूभव पण शेअर करायचा आहे. अजून सवय सुटली नाही आहे. पण प्रयत्न करतो आहे. सध्या मी योग आणी सेल्फ अवर्नेसवर जास्त लक्श देऊन आहे. ज्या मध्ये मी खूप गोष्टीचा वापर करत आहे. या दिवाळीमध्ये मी अल्कोहोल पासुन लांब राह्ण्याचे ठरवले आहे. गेली चार दिवस मी एकटाच घरी आहे, पण मी ड्रिन्क रोज करत आहे. मला समजत नही आहे की मी ड्रिन्क का करत आहे. मी तर सोडण्याचा प्रयत्न करत आहे. आधी मी सकाळी, दुपारी आणी रात्री पण घेत असे. पण हळू हळू मी ट्राय करुन सकाळचे बंद केले पण अजून दुपारी व रात्री आपोआप मी वाईन प्शॉप मध्ये जाऊन बाटली घेऊन येतो. ट्राय चालू आहे, यातून बाहेर पडण्याचा पण यश येत नाही आहे.
काय करावे हे कळत नाही आहे. एखादा उत्तम मार्ग कोणास माहिती असेल तर प्लीज सांगा.
(हे लिहण्यसाठी मला आता ३० मिनिट लागली. एखादा सोपा उपाय पण सांगा टाईपसाठी.)
प्रतिक्रिया
31 Oct 2016 - 1:32 am | मोदक
नमस्कार,
तुम्हाला व्यनी केला आहे.
मोदक
9 Nov 2016 - 7:30 pm | ज्योति अळवणी
मनाचा निर्धार हवा. याहून जास्त चांगला उपाय मला सुचत नाहीये
9 Nov 2016 - 7:36 pm | अप्पा जोगळेकर
दुपारी व रात्री आपोआप मी वाईन प्शॉप मध्ये जाऊन बाटली घेऊन येतो
आपोआप म्हणजे कोणी भानामती करते का. काय भाउ कैच्या कैच. हे सहानुभूती मिळवण बास करा आणि व्यसनमुक्ती केंद्रात जा.
9 Nov 2016 - 7:38 pm | अप्पा जोगळेकर
व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यात कोणताही कमीपणा नाही. आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाता ना तसेच.
10 Nov 2016 - 12:07 am | अरिंजय
तुम्हाला व्यक्तीगत संदेश पाठवला आहे.
धन्यवाद
10 Nov 2016 - 2:06 am | जयन्त बा शिम्पि
जवळच्या ' विपश्यना ' केन्द्राचा शोध घ्या आणि दहा दिवसांचे शिबिर करुन या.जमले तर एकापेक्षा अधिक शिबिर करावीत.
फायदा होणारच.
10 Nov 2016 - 3:34 am | विंजिनेर
हा लेखक खरा आहे का ते तपासा बरं... मला वेगळीच शंका येतीये
- (डु. आयडीचे व्यसन लागलेला सोडवणारा - विंजिनेर