जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ?
ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते. अश्यावेळी कामी येतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले अन भयानक जास्त खडतर संयुक्त अभ्यास, वायुसेना क्षेत्रात ते रेड फ्लॅग संयुक्त अभ्यास असतात, नेवी मध्ये आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्यु, ही नावे बरीच नावाजलेली आहेत.
ह्यातील रेड फ्लॅग अलास्का, संयुक्त संस्थाने अमेरिका इथे आयोजित होतात तर फ्लीट रिव्यु ला फिरते असते आयोजकपद. आर्मी करता असल्या अभ्यासाचा मुकुटमणी शोभावा असा एक अभ्यास असतो, इंग्लंड आर्मीने आयोजित केलेला हा कार्यक्रम, भयानक खडतर तर असतोच शिवाय तो एका सैनिकाची क्षमता, संघशक्ती, निर्णयक्षमता, फायरिंग मध्ये कौशल्य, ते फर्स्ट एड मधली कला सगळे काही तपासतो. अश्या ह्या कार्यक्रमाचे नाव आहे “द कॅंब्रियन पॅट्रोल”
आता ह्या कार्यक्रमाबद्दल साद्यंत सांगायचे झाले, तर रॉयल ब्रिटीश आर्मी ह्या इंग्लिश सैन्याच्या भूदलशाखेतल्या टेरीटोरियल आर्मी मधल्या वेल्श सैनिकांनी ४० वर्षांपूर्वी सुरु केलेली एक परंपरा म्हणजे कॅमब्रियन पॅट्रोल. ह्याची रूपरेषा अतिशय साधी असते. एकूण ५५ किलोमीटरचा रूट, तो सहभागी झालेल्या देशाच्या सैन्य तुकडीने फुल कीट लोड घेऊन (अंदाजे २२ किलो माणशी) ४८ तासात कापायचा. ह्या प्रवासा दरम्यान त्यांना युद्धकैदी प्रबंधन (पिओडब्ल्यू मॅनेजमेंट), काउंटर इंसर्जन्सी ऑपरेशन, मेडिकल एव्हक्युएशन, सर्च अॅड रेस्क्यु, रेकी इत्यादी नेमून दिलेली कामे सुद्धा करावी(च) लागतात, रस्त्यात जर कुठे सामुग्री विसरली तर त्या विसरलेल्या सामुग्रीच्या बरोबरीने दगड सामानात भरून वजन कायम राखावे लागते, पण त्याने तुमच्या संघाचे मार्क कमी होतात. हा सगळा खेळ खेळला जातो तो उत्तर वेल्स, इंग्लंड मधल्या कॅंब्रियन डोंगरांत अन वेल्श दलदली भागात. म्हणूनच ह्या अभ्यासाचे नाव असते कॅंब्रियन पॅट्रोल.
आजच ह्या अभ्यासाबद्दल का लिहावे वाटले ? तर आज ह्या अभ्यासात सहभागी झालेल्या भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ ने (२/८ गोरखा रायफल्सने) सुवर्णपदक प्राप्त केले आहे, भारत सहभागी व्हायला लागल्यापासून हे भारताचे बहुतेक तिसरे पदक असून सुवर्णपदक प्राप्त करणे म्हणजे संबंधित संघाने पूर्ण अभ्यासात ७५% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणे होय, ह्या अगोदर डोगरा रेजिमेंट ने २०१४ मध्ये अन २०११ मध्ये ह्याच अभ्यासात सुवर्णपदक मिळवून भारताची मान गर्वाने ताठ करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. चला आज आपण सगळे मिळून ह्या विश्वातल्या सर्वात कठीण युद्धाभ्यासात सर्वात अव्वल आलेल्या आपल्या सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करूयात.
जय हिंद
काही क्षणचित्रे
(करावी लागणारी कारवाई)
(गतविजेते डोगरा जवान)
(ह्यावर्षीचे सुवर्णपदक विजेते गोरखा २/८ चे जवान)
प्रतिक्रिया
23 Oct 2016 - 9:25 pm | एस
अत्यंत अभिमानास्पद क्षण! भारतीय जवानांना सलाम! आणि याची ओळख करून दिल्याबद्दल बापूसाहेब, तुम्हांला शतश: धन्यवाद!
23 Oct 2016 - 11:08 pm | मोदक
+१११११
सलाम
__/\__
24 Oct 2016 - 8:37 am | प्रचेतस
_/\_
24 Oct 2016 - 9:47 am | तुषार काळभोर
_/\_
24 Oct 2016 - 11:48 am | टुकुल
__/\__
24 Oct 2016 - 8:42 pm | पिलीयन रायडर
__/\__
23 Oct 2016 - 9:45 pm | चांदणे संदीप
डोगरा रेजिमेंटला जोरदार सॅल्यूट!!__/\__
Sandy
23 Oct 2016 - 9:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
ह्या वर्षी २/८ (२ बटा ८) गुरखा जिंकली सँडी भाय, डोग्रा २०१४ चे विनर आहेत :)
23 Oct 2016 - 10:09 pm | चांदणे संदीप
२/८ गुरखांनाही तेवढाच कडक सॅल्यूट!
खरे तर भारतीय सैनिकांशी संबधित कोणती गौरवास्पद बातमी आली तर ती माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी कुठल्या एका पलटण/रेजिमेंटची कामगिरी न राहाता ओव्हरॉल इंडियन मिलीटरीचीच बहादुरी असल्यासारखी वाटते! __/\__
!! गरूड का हूँ बोल प्यारे !!
Sandy
23 Oct 2016 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ च्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही बातमी वाचल्यावर याबद्दल काही लिहावे असे वाटत होते. थोडा उशीर झाला हेच बरे झाले.
कारण, त्यामुळे ही अभिमानास्पद बातमी भारतिय संरक्षक दलाचा सदस्य असलेल्या मिपाकराच्या हस्ते इथे वाचायला मिळाली. हे जास्त सुयोग्यच झाले !
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !
23 Oct 2016 - 10:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
अर्रर्रर्र! मी वाचताच अधीर होऊन लिहिले, तुम्ही systematic लिहिले असते काका, असो. आमच्या घिसाडघाईने कौतुक केल्याबद्दल आभार :)
23 Oct 2016 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं लिहिले आहे. वर लिहिल्याप्रमाणे तुम्ही लिहिणेच जास्त योग्य होते.
23 Oct 2016 - 10:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
त्याचे संस्करण केल्याबद्दल संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार :)
23 Oct 2016 - 11:49 pm | अभ्या..
एक्काकाकांशी १०० टक्के सहमत.
जगात भारी आपली आर्मी. नुसते म्हणायचे नाही तर प्रुव्ह करतात वारंवार.
एकदम भारी वाटले वाचून.
बादवे बापूसाब, ते पाकी दलिंदर नसतेत का असल्या ठिकाणी? नुसती काड्या करणारी आर्मी दिसते ती.
24 Oct 2016 - 8:22 am | कैलासवासी सोन्याबापु
२०१५ चे विनर आहेत पाकिस्तान आर्मी अभ्याव, ते होतात ऍक्सिडेंट कधीकधी ;)
23 Oct 2016 - 10:14 pm | बोका-ए-आझम
फ्लीट रिव्ह्यूबद्दल माहित होतं, पण कँब्रियन पॅट्रोलबद्दल माहिती नव्हती. त्याबद्दल धन्यवाद बापू! मिलिटरी स्पोर्टसमध्येही आपली कामगिरी वाखाणण्यासारखी आहे असं ऐकलंय. त्याबद्दल कधीतरी लिहा अशी विनंती करतो.
23 Oct 2016 - 10:16 pm | बोका-ए-आझम
आपले सैनिक तयारीच्या बाबतीत जगाला नमवू शकतात हे सिद्ध झालेलं आहे. _/\_
23 Oct 2016 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
यात हे पण पाहण्यासारखे आहे की अश्या स्पर्धेत भाग घेणार्या अनेक विकसित देशांकडे प्रशिक्षणासाठी असलेल्या अनेक सोयी सवलती भारतिय सैन्याकडे नाहीत.
या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी अधिकच खुलून दिसते !
27 Oct 2016 - 9:16 pm | अर्धवटराव
आपली आर्मी जास्त कणखर बनायला हे ही एक अप्रत्यक्ष कारण असावे काय ??
27 Oct 2016 - 9:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
केवळ शारिरीक श्रमांच्या किंवा मनोबलच्या बाबतीत हे काहीसे खरे ठरू शकेल (पण, तेही खात्रीने सांगता येणार नाही. कारण शारिरीक श्रम किंवा मनोबल सर्वच गोष्टींचा उपाय असू शकत नाही). आधुनिक सुविधा नसणे ही विकसित देशांबरोबरच्या आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या अभ्यासात किंवा स्पर्धांत नक्कीच मोठी अडचण असते. तयारी करताना खेळाची उत्तम साधने व सुविधा नसताना ऑलिंपिक्समध्ये भाग घेणार्या खेळाडूंना जसे कठीण पडते तसेच काहीसे !
23 Oct 2016 - 10:34 pm | अन्या दातार
भारतीय सेनादलाचे अभिनंदन. क्षणचित्रे अजून जरा डिट्टेलवार देता येतील का?
24 Oct 2016 - 1:56 am | डॉ सुहास म्हात्रे
इथे त्या बक्षिस समारंभाचा व्हिडिओ व सविस्तर बातमी पाहता येईल.
24 Oct 2016 - 2:35 am | नेत्रेश
27 Oct 2016 - 12:53 pm | llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणायला आलो होतो. गेल्यावर्षी सिल्व्हर मेडल होते. डॉन या पाकी वृत्तपत्रानुसार २०१६ चे गोल्ड पण पाकलाच मिलाले आहे. जालावर रिझल्टस उपलब्ध नाहीत ना हिस्टॉरिकल डेट उपलब्ध आहे.
27 Oct 2016 - 7:34 pm | गामा पैलवान
इथे गुरखा बटालियन ला सुवर्णपदक मिळाल्याचे दाखवले आहे : https://www.youtube.com/watch?v=SlxiLogRgeQ
गंमत म्हणजे वरील चलचित्रात गस्त ५० मैल म्हणजे ८० किमी असल्याचा उल्लेख आहे. तर पाकिस्तानी आवृत्तीत ५० किमीचा उल्लेख आहे.
खरंखोटं देव जाणे.
-गा.पै.
27 Oct 2016 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
The Cambrian Patrol is not a competition. Gold (75 percent), silver (65-74 percent) and bronze (55-64 percent) medals are awarded based on the number of points earned on completion of the gruelling course. Certificates are awarded to teams that finish with lower than 55 percent of the points.
कँब्रियन पॅट्रोल ही स्पर्धा नसून सैन्याची पात्रता ठवणारा वार्षीक सराव-अभ्यास (exercise) असतो. या सराव-अभ्यासात ७५% गुण मिळविलेल्या संघाला गोल्ड मेडल दिले जाते. एकापेक्षा जास्त संघांना गोल्ड मेडल मिळू शकते किंवा कोणालाच ७५% गुण न मिळाल्यास त्या वर्षी गोल्ड मेडल दिले जात नाही.
हा अतिशय खडतर अभ्यास यशस्वीपणे संपवू शकणे ही सुद्धा अभिमानाची गोष्ट समजली जाते. जगभरच्या सैन्यातल्या उत्तम सैनिकांचे गट भाग घेत असूनही दरवर्षी जवळ जवळ २०% गट हा अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत.
या अभ्यासातली आतापर्यंतची भारताची पदकसंख्या अशी आहे :
२०१६ : सुवर्णपदक (२/८ गोरखा रायफल्स)
२०१५ : रौप्य पदक (३/४ गोरखा रायफल्स)
२०१४ : सुवर्णपदक (८ गढवाल रायफल्स)
२०११ : सुवर्णपदक (४/९ गोरखा रायफल्स)
24 Oct 2016 - 4:45 am | चित्रगुप्त
अगदी वेगळेच विश्व आहे हे सर्व. त्यासाठी ट्रेनिंग वगैरेही जबरदस्त असणार, त्याबद्दलही लिहावे, ही विनंती.
24 Oct 2016 - 8:47 am | प्राची अश्विनी
अभिमान वाटला.\\
24 Oct 2016 - 8:50 am | नाखु
अभिनंदन.आणि इतक्या कमी सुवीधांच्या व सैन्याबद्दल गैरसमज पसरविणार्या माध्य्माचा(एकांगी बातम्या देऊन) पार्शव्भुमीवर हे यश अगदी वेगळे आणि जास्ती कौतुकास्पद आहे.
सलाम त्रिवार सलाम
24 Oct 2016 - 8:51 am | प्राची अश्विनी
अभिमान वाटला.\\
24 Oct 2016 - 9:19 am | महासंग्राम
अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे बाप्पुसा हि. सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ च्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन !
तुमच्या ओळखीचे कोणी गोरखा जवान असतील तर त्यांना आमचा सलाम नक्कीच सांगा..
थँक्स फॉर सर्विंग नेशन !!!
24 Oct 2016 - 9:29 am | मनिमौ
गुरखा 2/८ रेजिमेंट चे आणी लेख लिहुन ईथे आम्हाला या सरावाची माहिती दिल्याबद्दल बापु तुमचे पण आभार
24 Oct 2016 - 10:00 am | आतिवास
माहितीपूर्ण.
प्रत्यक्ष युद्धाची स्थिती याहून कैक पटींनी खडतर असणार याबाबत शंका नाही.
24 Oct 2016 - 11:44 am | अप्पा जोगळेकर
अभिनंदन
24 Oct 2016 - 11:53 am | मृत्युन्जय
वाह. काय काटक आणि निधडे लोक असतील हे. भारतीय सैन्याला सलाम आणि विजेत्या टीमचे भरभक्कम अभिनंदन. ही बातमी एका सैनिकाकडुन समजावी हे सुद्धा आनंददायक.
बाप्पु व्यवस्थित समजावुन सांगितले आहे तुम्ही. एक्का काकांनी उत्कृष्टरीत्या लिहिले असते यात शंकाच नाही पण तुम्ही कुठेच कमी पडलेला नाहित समजावुन सांगताना. अभिनंदन आणी अभिवादन
24 Oct 2016 - 12:09 pm | पुंबा
मनःपुर्वक अभिनंदन.. गर्वाने मान ताठ आणि छाती फुलून येण्याचे असंख्य क्षण या शेरदिल जवानांमुळे आपल्या निरस आयुष्यात येत असतात. त्यांना मानाचा मुजरा आणि आपल्यालासुद्धा.
24 Oct 2016 - 12:17 pm | प्रीत-मोहर
अभिनंदन!!! आणि थँक्स फॉर सर्विंग थे नेशन.
आमचे अभिनंदन त्यांच्यापर्यंत पोचवता आले तर पोचवाल का बापुसाहेब?
24 Oct 2016 - 5:25 pm | नि३सोलपुरकर
अभिमान वाटला __/\___.
24 Oct 2016 - 5:59 pm | टवाळ कार्टा
बाब्बो...लय भारी
24 Oct 2016 - 5:59 pm | टवाळ कार्टा
बाब्बो...लय भारी
24 Oct 2016 - 7:28 pm | गामा पैलवान
सोन्याबापु,
साधी रूपरेषा म्हणजे नक्की काय? हा सराव साधाच असेल तर याला इतकं महत्त्व का? सियाचेनसारख्या महाभयानक ठिकाणी गस्त घालणाऱ्या आपल्या तुकड्यांना तुलनेने सोप्या ठिकाणी सराव करून काय सिद्ध करायचं आहे? उगीच प्रश्न पडलेत.
यांतून भारतीय सैन्याचा तेजोभंग करायचा माझा अजिबात हेतू नाही. फक्त कम्ब्रियन गस्त हे भारतीय सैन्याच्या कर्तृत्वमापनाचं मानक होऊ शकतं का असा प्रश्न उपस्थित करायचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
ता.क. : गस्तीचा मार्ग ८० किमी चा आहे (स्रोत:विकी)
24 Oct 2016 - 8:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
"रूपरेषा साधी" ह्यावरच तुम्ही अडकले असाल तर तुम्ही पुढे अन नीट वाचले नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
तरीही प्रश्न अनुत्तरीत राहू नयेत म्हणून हा प्रतिसाद प्रपंच
१. साधी रूपरेषा हा प्रयोग अतिशय वेगळ्या प्रकारे वापरला आहे, म्हणजे गमतीनेच जर कोणी "साधंच काम आहे फक्त माऊंट एवरेस्ट चढायचंय" म्हणले तर त्यात जितके साधे अपेक्षित असेल इतकेच ते साधे आहे हे नोंदवतो, अशी अपेक्षा आहे की तुमच्या पहिल्या अन दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर यात मिळाले असावे.
पुढे चालूयात,
सियाचीन वर गस्त घालणारी फौज, त्यांची परिस्थिती वेगळी अन बाकी ड्युटीवर असणारी वेगळी, सियाचीनची तुलना त्याच्याशी किंवा कॅमब्रियन पॅट्रोल सोबत करणे कधीच संयुक्तिक ठरू शकत नाही, तसेच पूर्ण 12 लाख खडी फौज एकाचवेळी सियाचीन वर नसते हा ही मुद्दा आहे, थोड्या खाली खालच्या बॉर्डरवर असलेल्या सैन्याला ही exercise गरजेच्या असतात, युद्धाभ्यास करायला आपल्याकडेही इतर देशीय फौजा येतात, आर्मी बहुतांशी ट्रेडिशन्स वर चालते, कॅमब्रियन अभ्यास ही अशीच एक उदात्त परंपरा आहे, तश्या परंपरा बनवून चालवणे हे ही कठीण असते, मुळात मेटल लागते त्याला आयोजन ते सहभाग नोंदवायला, 67 वर्षांच्या अस्तित्वात स्वतंत्र भारताच्या फौजेने सुद्धा अश्या परंपरा सुरु करून यशस्वी रित्या चालवल्या आहेत, उदाहरणार्थ , इंडो अमेरिकन युद्धाभ्यास जे दरवर्षी होतात, भारत रशिया संयुक्त अभ्यास असलेला इंद्र सराव, अशी काही त्याची उदाहरणे आहेत, अश्याच इंग्लिश ट्रेडिशन पैकी एक म्हणजे कॅमब्रियन पॅट्रोल, आता तो तुम्हाला महत्वाचा वाटो अथवा न वाटो, जगभरातल्या लोकशाही देशांच्या फौजांत तो सराव महत्वाचा मानतात त्याला काय करता येईल असे वाटत नाही, धन्यवाद
24 Oct 2016 - 8:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
अवांतर, कॅमब्रियन पॅट्रोलचा आराखडा बदलत्या काळानुसार बदलता असतो, ८० किमी आधीच्या काळी होता,सद्ध्या त्याचे अंतर कमी असून त्याच्यात अंतर्भूत केलेल्या इतर चाचण्या जास्त असाव्यात, ४० वर्षांपूर्वीचे कॅमब्रियन सराव काही मी पाहिलेले नाहीत हे आगाऊच नोंदवतो
24 Oct 2016 - 10:01 pm | चाणक्य
कडक सॅल्यूट आपल्या आर्मीला. बापू, धन्यवाद ईथे बातमी दिल्याबद्दल.
24 Oct 2016 - 10:23 pm | गामा पैलवान
सोन्याबापु,
प्रत्यक्षात कस असणं आणि त्यास मान्यता मिळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी ब्रिटीश स्पर्धांच्या विरोधात नाही. पण मला भारतीय सैन्यासाठी भारतीय मानके बनवलेली बघायला आवडतील.
आ.न.,
-गा.पै.
24 Oct 2016 - 10:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
बरं एकंदरीत तुम्हाला लिम्बु चमचा स्पर्धेत स्वतःच भाग घेऊन स्वतःच पहिले येऊन स्वतःच स्वतःला बक्षीस देऊन स्वतःच स्वतःसाठी टाळ्या वाजवून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे असं एकंदरीत मजेशीर चित्र उभे राहिले, असो!
25 Oct 2016 - 1:53 am | गामा पैलवान
सोन्याबापु,
अगदी बरोबर बोललात पहा. आहेच मुळी मजेशीर चित्रं. तसंही पाहता वसाहतवादी चौकटीतनं बाहेर पडायला मजेशीर प्रक्रिया अवलंबणं म्हणजे सोन्याहून पिवळं, नाहीका?
आ.न.,
-गा.पै.
28 Oct 2016 - 10:55 am | llपुण्याचे पेशवेll
अगदी बरोबर बोललात पहा. आहेच मुळी मजेशीर चित्रं. तसंही पाहता वसाहतवादी चौकटीतनं बाहेर पडायला मजेशीर प्रक्रिया अवलंबणं म्हणजे सोन्याहून पिवळं, नाहीका?
शतशः सहमत. सैन्यच नव्हे अन्य अनेक ठीकाणीही आपण वसाहतवादी चौकटी नाहक पाळत असतो. असो एखादी स्वाभिमानी पिढी येईल आणि बदलाला सुरवात होइल अशी आशा आहे.
27 Oct 2016 - 4:21 am | मराठमोळा
कोणत्याही जवानांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
भारतीय सेनेचे विशेष स्थान पाहून आनंद झाला. त्यांचे अभिनंदन आणि माहिती दिल्याबद्दल सोन्याबापुंचे धन्यवाद.
27 Oct 2016 - 9:34 pm | अर्धवटराव
आहेतच मुळी आपले जवान तसे :) अभिमान वाटतो या पठ्ठ्यांचा.
काहि प्रश्न
१) मागे एका धाग्यात तुम्ही कमांडो ट्रेनींगचा परामर्श घेतल होता. त्या ट्रेनींगचा उपयोग नॉर्थ-ईस्ट आणि काश्मीरमधे वारंवर होतो असंही म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या पेट्रोलींग कॉम्पीटीशनचा फीडबॅक आर्मीच्या ट्रेनींग, स्ट्रॅटजी वगैरेसाठी उपयोगी पडतो का?
२) आर्मी आलटुन-पालटुन प्रत्येक रेजीमेंटला अशा कॉम्पीटीशनसाठी पाठवते काय? जेणेकरुन सर्वच युनीट्स येकदम जोरदार व्हावेत?
३) पार्टीसिपेट करणारी सैन्यतुकडी खास त्या कामाकरता घडवली असते कि रँडमली सिलेक्ट करतात जवान्स ??
हि मानकं आपल्या आर्मीच्या क्षमतेला ओव्हरऑल कसे अफेक्ट करतात ? मस्ट बी इंट्रेस्टींग.