रच्याक्ने कच्ची पोळी हाकानाका
चित्तचोरी त्यांची म्हणे फेल झाली
वाचकांची फालतू घालमेल झाली
ना हिशेब जमला ना उधळपट्टी जमली
डोकी नकोत्यात रिकामी खपली
दिखाऊ प्रेमबाजांचा गुंताच नुसता
कामाचे काम सोडून कशाला वाचता
नै सुचत जिलबीसाठी चार ओळी
कच्चीच र्हैली आमची विडंबनाची पोळी.