मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(एक ग्लास त्याचा....)

सतिश गावडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक ग्लास त्याचा, एक माझा! एकत्र बसून थोडं वेगळेपण वेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..! त्याचं सावधपण माझं झोकांडणं बसण्यातली चखण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक ग्लास त्याचा, एक माझा! बिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक ग्लास त्याचा.... asdf

वाचने 22825 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अत्रुप्त आत्मा 18/04/2017 - 09:47
ह्या ह्या ह्या..! .... ..... http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/gun-face-smiley-emoticon.gif गा वडे मास्तरांचा ग्लास जमला फस् क्लास!

संजय क्षीरसागर 18/04/2017 - 11:50
हे एक वेरिएशन बघा : बसण्याचा हिशोब घरचा एक ग्लास तिचा, एक माझा ! सगळी दारु एकच चढणारही सारखीच फक्त घेण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा! माझी आधी संपेल, तिची नंतर नेहेमीचंच हे पिण्यातलं-अंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी उष्टी... चलाखीदार... बदली पण तरीही.. एक ग्लास तिचा, एक माझा! एकत्र बसून थोडं वेडेपण वेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..! तिचं सावधपण, माझं उधळलेपणं घेण्यातली आणि भरण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक ग्लास तिचा, एक माझा! चुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या! कधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर परत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक ग्लास तिचा....

Secret Stranger 20/07/2018 - 15:20
खूप मजा आली वाचताना..

खिलजि 27/07/2018 - 13:33
वाचतानाच चढली याला काय म्हणावं नशा कि अजून दुसरं काही हे असे शब्द वाचले कि ते दिवस आठवले जागा मिळेल तिथे प्याले रिचवले कुणी काय तोडले? कुणी काय ओकले ? लक्ष्यात त्याच्याच राहिले ज्याने बिल दिले आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही आणि असला तरी , ती मजा येत नाही सगाशेठ , हि कविता मी प्रिंटवली आहे , आणि हालमध्ये लावण्याच्या विचारात आहे . वाचूनच चढली राव , आता बाराची गरजच नाय उरलीय . धन्यवाद त्रिवार धन्यवाद ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

पुंबा 31/07/2018 - 18:02
आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही
अरेरे खिल्जीभौ. असं नका करत जाऊत. वेळ काढायचा. 'मद्य हे पूर्णब्रह्म' हे जाणून असा.

खिलजि 31/07/2018 - 18:11
पुम्बा साहेब आजही ते दिवस आठवतात राव ,,,, लय मज्जेदार किस्से घडून रह्यायलेत या जिंदगानीत . लिहिताना बी कससंच व्हतंय ...
मला वाटत हि चालेल ( कल्पना ) नुसती चालणारच नाही तर सुस्साट धावेल एका हातात जॅक डॅनियल नि दुसऱ्या हातात लेखणी लिहू कशावर तेच कळत नाही आहे कागदावर पडलीय शेजवान चटणी डोळे थोडे झालेत मंद मंद लॉलिपॉप चा वास दरवळतोय धुंद धुंद तिसऱ्या पेंगला आता कुठे सुरुवात झालीय बघा जरा सवंगड्यानो ,कशी रांगोळी आलीय बालपणीचा बार आठवून आजही गळे काढतोय उद्या आषाढी लागतेय, म्हणून आजच पितोय जोर साहेबांमधि तेव्हाही नव्हता आणि आताही नाही थर्र्याची चव काही औरच होती , जाता जात नाही नारिंगी, मोसंबी, टॅंगो पंच , त्यावर चढायचा मळीचा कळस सालं आता टाय लावून प्यायचं म्हंटल नवख्या गडयांना येतोय आपलाच किळस आताच्या चखण्याला ती चवच नाही काय तर म्हणे , सुरमई फ्राय , कोळंबी फ्राय तिखटमीठ लावलेली सुकट नि कांदा आता कुठेच दिसत न्हाय आता सोडापाणी गारेगार लागतंय सोबतीला ऐरकण्डिशनचं वारं लागतंय एव्हढं करूनही चढत न्हाई राव त्याचंच फार वाईट वाटतंय शुध्धीत लिहितात ते शुद्धलेखन धुंदीत लिहितात ते काव्यलेखन मागच्या २२ तारखेला करुनि चिकन हाणहाणहाणून करतोय तुम्हांसी अर्पण सध्याचा चातुर्मासिक खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर