(नाक गळतंय माझं..)
(मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..)
नाक गळतंय माझं
तसं ते नेहमीच गळतं
पण पाऊस आला की
येतात जोराच्या
दोन चार शिंका
अन नाक येते
कफही होतो जरासा
नाक गळतंय माझं
रुमाल ओलागिच्च झालाय
केंव्हाचं तुंबलंय
वाट पाहतेय निचरा होण्याची
हाताशी व्हिक्स आहेच
पण विकोरील मिळेना..
जौदे ,निचरेल ... आपोआप