(याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे)
डिअर ऑल,
हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला. त्यावर ते वदले (ते 'त' ला 'ट ' आणि 'न' ला 'ण' म्हणतात) : "देखो पंडिटजी, आप को कोई किटाब छापणी है तो हमे कोणहू एटराज नही, लेकिन आप अगर नोट छापना चाहटे है टो एक बाट ध्यान मे राखियेगा, आजकी दुणियामे आगर नोट कमाणा हो टो पब्लिक को चूटिया बणाणा जरुरी है. बाकी आप की मर्जी"
मग आम्ही घरी येऊन यावर बरेच चिंतन केले, आणि फायनली खालील बेत आखला:
आपण आता अध्यात्मिक मार्गदर्शन करणारी एक अभिनव वेबसाईटचालू करायची.
"Step-By-Step संभोगा टू समॅढी plus निर्वाना and मोक्षा " असे सर्वांना सहज समजेल असे साईटचे नाव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मित्र करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे डॉलर्स ) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर डॉलर्स शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट ट्राय-लिंग्विअल (मराठी, हिंदी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
मराठीत प्रश्नांची उत्तरे 'कामिनी बाई' देतील, हिंदीत 'सविता भाभी' आणि इंग्रजीत 'मल्लू आंटी' देतील.
सदस्यता शुल्क न मुद्दाम डॉलरात ठेवले आहे, त्यामुळे फॉरेनर्स, एनाराय वगैरे आकर्षित होतील, शिवाय नेटिवांना हे काहीतरी इंटरनॅशनल, लै भारी प्रकरण आहे असे वाटून तेही इकडे घुसतील.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) बराचसा डेटा सेक्स्ट्युअल असेल आणि व्हिडीओज, इमेजेसची रेलमपेल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
(टीप: खरेतर आमचे मित्र आणि चौबेजी यांना वरील सर्व माहिती आहेच, परंतु माहिती मागण्याच्या मिषाने साईटची फुकट जाहिरात करावी हा अंतस्थ हेतू आहे, खोटे कशाला बोला ?)
प्रतिक्रिया
11 Apr 2017 - 12:20 pm | संदीप डांगे
वेब डिझाईन करणाऱ्याला डोमेन व सर्व्हर कुठून घ्यावे हे माहित नसणे म्हणजे ब्लाउज शिवणाऱ्याला मापे कशी घ्यावी हे माहित नसण्यासारखे आहे.
=)) =))
11 Apr 2017 - 12:23 pm | अभ्या..
चित्रांगदाचा (पक्षी : कामिनीबाईंचा) ब्लाऊज काय मस्तंय. ब्रोकेड का किनखाब म्हणायचे याला? उठून दिसतोय अगदी.
13 Apr 2017 - 12:12 pm | एकुलता एक डॉन
अश्लील अश्लील अश्लील
11 Apr 2017 - 2:10 pm | सतिश गावडे
11 Apr 2017 - 3:42 pm | ५० फक्त
अभ्याचं एकवेळ ठीक आहे, मला वाटलं तुमची कापड एक प्रकार अनेक या विषयात पिएचडी झाली असेल एव्हाना...
11 Apr 2017 - 5:05 pm | सतिश गावडे
शहरातील सर्व हॉलवर साड्यांचे सेल लावण्यास बंदी घालावी अशी मी याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. :P
11 Apr 2017 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
11 Apr 2017 - 3:27 pm | श्रीगुरुजी
जबरी. हहपुवा.
काय राव तुम्ही एका महान जगद्गुरूच्या महान शिष्याची हेटाळणी करताय!
कुठे फेडाल . . . .........................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................
कुठे फेडाल हे पाप असं म्हणायचं होतं. उगाच अश्लील अर्थ काढू नका.
11 Apr 2017 - 4:54 pm | गामा पैलवान
काय हो चित्रगुप्त, वाचकांना छुत्या बनवताय होय! च्यायला कामिनी ही बाई नसून हिजडा आहे. खांद्यांकडे बघा जरा! :-D
शिवाय हिजड्याकडून संभोगाचे धडे घेणं म्हणजे ....! ;-D
आ.न.,
-गा.पै.
11 Apr 2017 - 5:34 pm | अप्पा जोगळेकर
खांदे पाहून लिंग ठरते होय. हे माहीत नव्हते. धन्यवाद.
11 Apr 2017 - 5:57 pm | गामा पैलवान
अप्पा जोगळेकर,
तुमच्या आकलनासाठी नवनीत सुलभ प्रश्नसंच विकसित करणेत आला आहे.
प्रश्न १. चित्रात लिंग दिसतं आहे का?
उत्तर : नाही.
प्रश्न २. चित्रातल्या व्यक्तीचे खांदे पुरुषी मापाचे दिसताहेत का?
उत्तर : होय. चेहऱ्याच्या मानाने खांद्यांची रुंदी जास्त आहे. जशी पुरुषांची असते.
प्रश्न ३. चित्रातल्या व्यक्तीचा छातीचा उभार कसा आहे?
उत्तर : छातीला उभारंच नाही.
आ.न.,
-गा.पै.
14 Apr 2017 - 2:10 pm | चित्रगुप्त
माननीय रुस्तम ए हिंद गामा पैलवान साहेब, कामिनी 'बाईमाणूस' नसून तृ.पं. आहेत, हे त्यांच्या खांद्यांवरून ठरवण्याची क्लुप्ती थोरच आहे. त्याबद्दल त्रिवार वंदन.
तरीसुद्धा काय तो निर्णय घेण्यापूर्वी सदर कामिनीबाईंचे खालील नृत्य एकदा नजरेखालून घालावे, ही विनंती:
https://youtu.be/CiJVWzSFDJo
11 Apr 2017 - 4:58 pm | सूड
जर्मन मध्ये उत्तरं हवी असतील तर अस्मादिक तयार आहेत.
11 Apr 2017 - 6:06 pm | अभ्या..
मी स्टेनलेस स्टील मध्ये देईन उत्तरे. नो प्रॉब्लेम.
11 Apr 2017 - 5:02 pm | सतिश गावडे
आपले तथाकथित अध्यात्मावरील टुकार पुस्तक घेऊन प्रकाशकांकडे गेल्यावर प्रकाशकांनी हाकलून लावले असेल म्हणून हे साईटचे खूळ सुचले असणार.
साईट पेड असेल तर काळं कुत्रंही साईटकडे फिरकणार नाही हे तुमचे मित्र आणि चौबेजी यांनी सांगितलं नाही का तुम्हाला?
आणि स्वतः पेड साईट बनवत असताना इथे सल्ला मात्र फुकटात मागत आहात (खरं तर सल्ल्याच्या निमित्ताने फुकट जाहिरात करत आहात) ते कोणत्या व्यावसायिक नितीमूल्यात बसते बरे?
चाललेत पेड मोक्ष द्यायला.
11 Apr 2017 - 6:16 pm | चित्रगुप्त
आणि
प्रेरणा प्रेरणा प्रेरणा....
ही सर्व प्रेरणेची कमाल आहे महाराजा.
11 Apr 2017 - 6:45 pm | कंजूस
विडंबन नाय जमलं हो।
11 Apr 2017 - 7:03 pm | उपेक्षित
जम्या जम्या सही जम्या
:० :)
11 Apr 2017 - 7:29 pm | चौकटराजा
माझी सूचना आहे. "माझी अडचण व मल्लू वैनीचा सल्ला" असे सदर साईट वर असावे. व मागचा उत्तरे देणारा मात्र डॉ प्र को. हा बाप्या गडी असावा. लई भावजी सल्ला इचारायला येत्याल. तीन उत्तरावर एक उत्तर फ्री असावे.
13 Apr 2017 - 7:33 pm | जयंत कुलकर्णी
पण त्यांना तेवढा अधिकार प्राप्त झाला आहे का?
१ त्यांना "घंटा''ह्या शब्दाचा वापर करता येतो का?
२ त्यांना इतरांना तुच्छ मानता येते का ?
३ जगातील सगळी अक्कल तिच्याच डोक्यात ठासून भरलेली आहे असे त्यांना वाटते का ?
४...असे अनेक प्रश्न त्यांना विचारले तर बरे होईल.
मिपाकर अजून प्रश्र्न विचारतीलच...
16 Apr 2017 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा
आध्यात्मातल्या या नवकमंडलूचा साक्षात चिट्रगुप्टाणी बाजार उठवला!![http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif)
17 Apr 2017 - 1:39 pm | चित्रगुप्त
"आध्यात्मातला नवकमंडलू" या संकल्पनेबद्दल अआ बुवांचा सदाशिव पेठेत भव्य जाहीर सन्मान करावा, असे आवाहन 'अध्यात्मातील नवछाटी'-- 'Nलायटन्न्मेंट प्रभात' च्या सम्पादिका कामिनीबाई यांनी आजच केले असल्याचे वर्तमान आहे. यास 'अध्यात्मातील नवपादुका' सौ सविता भाभी, 'अध्यात्मातील नवकफनी' सौ. मल्लूआंटी आणि 'अध्यात्मातील नवरुद्राक्ष' स्वामी वात-सायण या सर्वांनी अनुमोदन दिलेले आहे.
17 Apr 2017 - 10:08 am | vikramaditya
आपले लाडके सर नेहेमी म्हणतात "मिपावर फुकट सल्ला विचारणारे मग इथे फिरकत देखील नाही, हे कळवायला कि पुढे काय झाले?"
ह्याच न्यायाने आता बघुया सर कळवतात का की वेब साइट सुरु झालि का? जगभरातील चाहत्यान्नी फी भरुन मेम्बरशीप घेतली का?
सर्वत्र स्टार्ट अप मध्ये लोक्स पैसा खेचत असताना बघुन सुचलेल्या ह्या मिलियन डोलर कल्पनेचे काय झाले? इ.इ...
असो, १४०० वयोमान असुन ही कोरडा असलेल्या त्या चांगदेव महाराजान्ना ज्ञानेश्वर माउली भेटली. ईथे बघु कधी उजेड पडतो?
12 May 2017 - 7:40 pm | tusharmk
वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये संजय क्षीरसागर in तंत्रजगत http://www.misalpav.com/node/39432
हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?