गीतगुंजन २३: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन
संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली.