रंगभूमी दिन
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं. आणि आजच्या पिढीत जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी यांनी हि परंपरा पुढे कायम ठेवली आहे.
या रंगमंचावर आजपर्यंत विविध विषयांची मांडणी झाली तरी किती ???
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना विरोध करणारे 'किचकवध', जरठ कुमारी विवाहावर आधारलेलं 'संगीत शारदा' असो कि ज्याने रंगभूमीवर वादळ निर्माण झाले असे 'साखराम बाइंडर, पारंपरिक पद्धतीला धक्का देवून सादर केलेलं 'घाशीराम कोतवाल' होतं. व्यवसायीक आयुष्य आणि नातेसंबंधावर परखड भाष्य करणारे 'दोन स्पेशल' असो. ह्या आणि अश्या कित्येक नाटकांनी हि रंगभूमी समृद्ध केली. बदलत्या काळानुसार नाटकांचे विषयसुध्दा बदलले. या सर्वांत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांना विसरून कसं चालेल, त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केलेल्या 'वर्हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी एकपात्री नाटकात त्यांनी जिवंत केलेला 'बाप्पा' 'जॉनराव' कोण विसरू शकेल.
आज 'मराठी रंगभूमी दिन' आजच्या दिवशी रंगभूमीला आयुष्य वाहिलेल्या सगळ्या ज्ञात-अज्ञात रंगकर्मीना मानाचा मुजरा !!!
6 mins ·
Privacy: Public
प्रतिक्रिया
मानाचा मुजरा. पण मराठी
खरंय तुमचं एस राव मराठी
मानाचा मुजरा.