रंगभूमी दिन

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
5 Nov 2016 - 10:53 pm

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं. आणि आजच्या पिढीत जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी यांनी हि परंपरा पुढे कायम ठेवली आहे.
या रंगमंचावर आजपर्यंत विविध विषयांची मांडणी झाली तरी किती ???
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना विरोध करणारे 'किचकवध', जरठ कुमारी विवाहावर आधारलेलं 'संगीत शारदा' असो कि ज्याने रंगभूमीवर वादळ निर्माण झाले असे 'साखराम बाइंडर, पारंपरिक पद्धतीला धक्का देवून सादर केलेलं 'घाशीराम कोतवाल' होतं. व्यवसायीक आयुष्य आणि नातेसंबंधावर परखड भाष्य करणारे 'दोन स्पेशल' असो. ह्या आणि अश्या कित्येक नाटकांनी हि रंगभूमी समृद्ध केली. बदलत्या काळानुसार नाटकांचे विषयसुध्दा बदलले. या सर्वांत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांना विसरून कसं चालेल, त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केलेल्या 'वर्हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी एकपात्री नाटकात त्यांनी जिवंत केलेला 'बाप्पा' 'जॉनराव' कोण विसरू शकेल.
आज 'मराठी रंगभूमी दिन' आजच्या दिवशी रंगभूमीला आयुष्य वाहिलेल्या सगळ्या ज्ञात-अज्ञात रंगकर्मीना मानाचा मुजरा !!!
6 mins ·
Privacy: Public

संस्कृतीकलानाट्यसंगीतसाहित्यिकप्रकटनविचारशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

मानाचा मुजरा. पण मराठी रंगभूमीवर अजून बरेच काही लिहिता आले असते. अगदी सांगलीत मराठी नाटकाची नांदी कशी झाली ते आता हर्बेरियम सारख्या सुवर्णकाळ पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्या प्रयोगांपर्यंत.

महासंग्राम's picture

5 Nov 2016 - 11:18 pm | महासंग्राम

खरंय तुमचं एस राव मराठी रंगभूमीवर बरंच काही लिहिता येईल, पण आता जे सुचलं ते लिहिलं. तुम्ही म्हणता तसं लिहायचा नक्की लिहायचा प्रयत्न करेन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 12:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> आजच्या दिवशी रंगभूमीला आयुष्य वाहिलेल्या सगळ्या ज्ञात-अज्ञात रंगकर्मीना मानाचा मुजरा...!

आमचाही सर्व रंगकर्मीना मानाचा मुजरा.

-दिलीप बिरुटे