अंधार्या त्या रातीमधूनी
शांत भयाण घरट्यामधले
पक्ष्यांचे ते किलबिल गाणे
मौन अचानक झाले..
रात्रीस खेळ चाले येथे
रात्रीस खेळ चाले..
सुन्या सुन्या त्या वाटेवरूनी
एकांताला साद घालता
नयनी विचित्र भुताटकीचे
दाहक चित्र ते दिसले..
रात्रीस खेळ चाले येथे
रात्रीस खेळ चाले..
पाचोळा तो सैरावैरा
वारा हा पिसाट वाहे
भयभीत उभे ते झाड
पान स्तब्ध ते झाले..
रात्रीस खेळ चाले येथे
रात्रीस खेळ चाले..
सावल्या त्या मुक्याने हलती
भोवताली त्या विणती माया
डोहाच्या या खोल तळ्याशी
सावट गुढ पसरले..
रात्रीस खेळ चाले येथे
रात्रीस खेळ चाले..
नि:शब्द तरंग हे उठले
अंधार सारे चांदण झाले
आकाश रहस्यमय धुक्याला
आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले येथे
रात्रीस खेळ चाले..
भयाण रात्र खेळ विचित्र
नयनी दाटते रहस्यचित्र
घडलेले अन् घडवलेले
सुत्र अंधारी ल्याले..
रात्रीस खेळ चाले येथे
रात्रीस खेळ चाले...