हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया
सूफी़जम जगातली एक अनोखी प्रणाली आहे. तिच्यात सारं व्यक्त जग प्रेयसी आहे आणि ज्या अव्यक्तानं सारं व्यक्त तोललंय, तो प्रितम आहे. जे व्यक्त आहे, मग तो पुरुष देह असो की स्त्री देह, सूफी़ंच्या दृष्टीनं ते सर्व स्त्रैण आहे. जे कधीही व्यक्त होऊ शकत नाही, तो पुरुष आहे. खरंतर जोपर्यंत अव्यक्ताशी मीलन होत नाही तोपर्यंत जेजे काही व्यक्त आहे ते स्त्रैण आहे. हा प्रकृती आणि पुरुषातला अनंगरंग सूफी़ जगण्याचा अंदाज़ आहे. सूफी़जम हा जगण्यातला रोमान्स आहे. सूफी़ साधनेची फलश्रुती व्यक्त आणि अव्यक्ताच्या मीलनात आहे. आणि मीलनानंतर प्रियकर- प्रेयसी एकच आहेत. भक्तीमार्ग सूफी़जमपेक्षा वेगळा आहे.