एखादं गाणं मनाचा ठाव घेतं कारण त्याची शायरी, संगीत संयोजन आणि गायकांनी केलेली कमाल सगळं वातावरण भारुन टाकतं. कैफ़ी आझमींचा क़लाम, मदनमोहनची अफलातून चाल आणि रफ़ी समवेत लतानं जमवलेला अत्यंत नज़ाकतदार रंग म्हणजे हे गाणं.
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए,
तन की चांदी, मन का सोना, सपनोंवाली रात लिए ।
मेरी दुनिया मे तुम आई.....
पहिल्या दोनच ओळीत रफीचा मखमली आवाज आणि `सपनोंवाली रात लिए' हा एंड पॉइंट, प्रेयसी आपल्या प्रियकराच्या दुनियेत आणखी कायकाय घेऊन आली असेल याची उत्कंठा निर्माण करतो.
मग सतारीचा सुरेख पीस वातावरणाची खुमारी वाढवतो आणि पुढच्या आणखी दोन ओळी नवी कमाल करुन जातात. `दिलमें दिलकी बात लिए ' ही जीवघेणी शब्दयोजना आणि नंतर येणार्या `अरमां की बारात लिए' या समेवर येणार्या ओळीत, रफीनी `बारात' हा शब्द इतका कहर गायला आहे की आता गाणं क्षणभर इथेच थांबावंस वाटतं !
तनहा तनहा, खोया खोया, दिलमे दिलकी बात लिए,
कबसे यूं ही फिरता था मैं, अरमां की बारात लिए ।
त्यावर मग लतानी दिलेला रिस्पॉन्स आणि त्यात गायलेली `आंखोंमें ये रात लिए' ही ओळ काळजाचा ठाव घेते. पण कैफी़ आझमी पुढे आणखी सितम करतात. `कैसे जाऊं सखियोंमें अब, तेरी ये सौगात लिए' ... सौगात ही जागा लतानी अशी काय बहारदार घेतली आहे, कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा एकदा ऐकावी अशी !
ढलका आंचल, फैला काजल, आंखोंमें ये रात लिए,
कैसे जाऊं सखियोंमें अब, तेरी ये सौगात लिए ।
नंतर इंटरल्यूड म्युझिकमधे जे काय स्वरसंयोजन आहे ते गाणं आणखी मिस्टीकल करतं आणि गाण्याची लय वाढते..... इथे रफी आणि लताची जुगलबंदी श्रवणीय आहे.
सीनेकी ये धड़कन सुनले न कोई,
हाए, हाए, हाए, देखे ना कोई,
ना जाओ, ना जाओ,
हटो, हटो, डर लगता है,
सुनो, सुनो,
डर लगता है,
मग रफीच्या या ओळी शायरीची परमावधी गाठतात. `दिलमें कितनी कलीयां महेकी, कैसे कसे फूल खिले', हे इतकं लोभस वर्णन आहे की आपण थक्क होतो. पण त्या पाठोपाठ, `नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी खैरात लिए' या ओळी येतात आणि कहर करुन जातात. `खैरात' या शब्दावर तर जान कुर्बान आणि रफीनी तो शब्द असा काही गायला आहे की मशाल्ला!
दिलमें कितनी कलीयां महेकी, कैसे कसे फूल खिले,
नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी खैरात लिए ।
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए ।
_____________
मग पुन्हा सुरेख इंटरल्यूड म्युझिक आहे. त्यानंतर होणार्या लता-रफीच्या जुगलबंदी नंतर, लताकडे सम सोपवतांना, रफी ज्या अंदाजा़त` रात है अपनी,......' म्हणतो तेव्हा प्रियकर आणि प्रेयसीच्या मिलनासाठी रात्रसुद्धा न संपणारी आणि निरंतर झाल्यासारखी वाटते.
चांदसे कैसे आंखे मिलाऊं,
बाहोंमें आओ, तुमको बता दूं,
बस भी करो,
अब ना डरो,
रात है अपनी,......
समेवर येण्यापूर्वीच्या ओळीत `बदली जाए चाल मेरी', ही शब्दयोजना लतानी सुरांना संपूर्ण समर्पित होऊन गायली आहे. इथे कैफी़जींनी `बदली जाए चांदनी' अशी शब्द योजना केली असती तर ती अजून मोहक झाली असती. त्यातून उत्तररात्रीनंतरच्या पहाटेचा महौल जाणवला असता.
त्यानंतर जे काय वाद्यसंयोजन आहे, समेवर येण्यापूर्वीचा जो पिक-अप केलायं त्याबद्दल मदनमोहनजींना सलाम!
समेवर येतांना `हाथोंमें अब हाथ लिए' या ओळी लतानी अशा काही म्हटल्या आहेत की तीला स्वरसाम्राज्ञी का म्हणतात ते कळतं.
पायल छनके, कंगना खनके, बदली जाए चाल मेरी,
मंजिल, मंजिल, चलना होगा, हाथोंमें अब हाथ लिए ।
गाण्याच्या शेवटी रफीनी पुन्हा पहिल्या ओळी तितक्याच लाघवीपणे म्हणून हे गाणं असंच सुरु राहावं, हा मिलनाचा सिलसिला संपूच नाही अशी आस निर्माण करुन गाणं अजरामर केलं आहे.
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए,
तन की चांदी, मन का सोना, सपनोंवाली रात लिए ।
प्रतिक्रिया
26 Jan 2017 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय सुंदर.
गाण्याच्या शेवटी रफीनी पुन्हा पहिल्या ओळी तितक्याच लाघवीपणे म्हणून हे गाणं असंच सुरु राहावं, हा मिलनाचा सिलसिला संपूच नाही अशी आस निर्माण करुन गाणं अजरामर केलं आहे.
खरं आहे.
आज की रात तो दिल तोडोना......
धन्स वो संक्षीसेठ. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
26 Jan 2017 - 9:31 pm | संजय क्षीरसागर
रविवारी मित्रानं मदनमोहन आणि ओपीच्या गाण्यांच्या एका कार्यक्रमाचं माझ्यासाठी खास तिकीट काढलं होतं. त्या कार्यक्रमात अली हुसेन आणि प्रिया जोशीनी हे गाणं असं काय जबरदस्त रंगवलं की नशा छा गया. तेव्हापासून या गाण्यावर लिहायचा मूड होता. मला इथं ऑडिओ अपलोड करता येत नव्हता म्हणून थोडा उशीर झाला. त्यात कंजूसजींनी फार मोलाचं सहकार्य केलं आणि आबानं फायनल रिविजन करुन दिली त्यांचा ऋणनिर्देश करतो.
गाण्यातली शायरी केवळ अप्रतिम आहे. मदनमोहनजींनी कमालीची चाल दिली आहे आणि अत्यंत मोहक वाद्यसंयोजन केलंय. महत्वाच्या शब्दांपूर्वी लता आणि रफीनी घेतलेले क्षणार्धाचे पॉझेस त्यांच्या सांगितिक सौंदर्याची जाण दाखवतात. दोघांचे आवाज सुरेख लागले आहेत आणि गाण्याची सघनता वाढवण्यासाठी बहुदा माईक्सपासून किंचित दूर उभं राहून ते गायलं आहे. त्यामुळे सभोवतालच्या वॉइडचा गाण्यात हळूवर प्रवेश झाला आहे. या किमयेमुळे गाणं मिस्टिकल झालं आहे.
26 Jan 2017 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनमोहन आणि ओपीच्या गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय मैफील म्हणावी लागेल. मस्त.
आपल्यामुळे आम्हालाही हे गाणं इंजॉय करता आलं.
बाकी, गाणं आणि शायरी अप्रतिम आहे. ''नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी खैरात लिए' हे तर कसलं जबरा आहे.
अतिशय सुंदर गाणं ऐकवलं. आजच्या दिवसाचा समारोप एक सुंदर गाणं ऐकून झाली मजा आली.
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए,
तन की चांदी, मन का सोना, सपनोंवाली रात लिए
हे तर अप्रतिमच आहे. धन्स. वो सेठ.
-दिलीप बिरुटे
(संक्षीसेठचा फ्यान)
26 Jan 2017 - 10:10 pm | संजय क्षीरसागर
हायलाईट केलेल्या शब्दांवर रफी आणि लतानी घेतलेल्या जागा तर अप्रतिम आहेत पण त्यापूर्वी घेतलेले पॉझेसही केवळ ऐकण्यासारखे आहेत.
कबसे यूं ही फिरता था मैं, अरमां की
बारात
लिए ।कैसे जाऊं सखियोंमें अब, तेरी ये
सौगात
लिए ।मंजिल, मंजिल, चलना होगा, हाथोंमें अब
हाथ
लिए ।आणि या ओळीत ....
नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी
खैरात
लिए ।खैरात हा शब्द कैफी़जींना कसा सुचला असेल याचं नवल मला कायम राहील. रफीनी तो शब्द गातांना जो काय कहर केलायं तो वेगळाच !