शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ.
ये ना थी हमारी किस्मत के विसाल-ए-यार होता
अगर और जिते रेहते, यही इंतझार होता.
तिला भेटणं हे नशिबातच नव्हतं. अजून जगलो असतो तरी सुद्धा वाट बघत बसलो असतो.
प्रेमभंग झालेला माणूस कायम नशिबाला दोष देत असतो. वरील शेर हे त्याचा चपखल उदाहरण म्हणता येईल.
केहते है जिते है उम्मीद पे लोग, हमको जिने कि भी उम्मीद नही.
आशेवर लोक जगतात असं ऐकलंय खरं, पण मला तर आता जगण्याची पण आशा नाही राहिली.
दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द कि दवा क्या है.
हमको उनसे वफा कि है उम्मीद, जो नाही जानते वफा क्या है.
तुला काय झालंय वेड्या मना, या दुःखाला औषध कुठून आणू.
आम्हाला त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे ज्याला प्रेम काय हेच माहीत नाही.
कोई उम्मीद बर नही आती
कोई सूरत नजर नही आती
कुणीच दिसत नाही आता आणि काही आशा सुद्धा उरलेली नाही.
ये मसाई-ले-तसववुफ ये तेरा बयाँ गालिब .
तुझे हम वली समझते जो ना बादाखार होता
किती छान बोलतोस गालिब. तुला तर आम्ही संतच समजलो असतो, जर तू मद्यपी नसतास तर.
प्रतिक्रिया
10 Mar 2017 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिलंय, अजुन भरपूर येऊ द्या...!
ये "शायरी" भी "दिल" बहलाने का एक"तरीका" है, साहब......!!
जिसे हम "पा" नहीं सकते उसे"अल्फ़ाज़ों" में जी लेते हैं.....!!
-प्रा.डॉ. गालीब बिरुटे ;)
(आपला विश्वासू )
10 Mar 2017 - 8:49 am | पैसा
अजून लिहा!
10 Mar 2017 - 11:50 am | मिसळलेला काव्यप्रेमी
थोड अजुन खोल जा.. गालिब वरवर हाताला लागत नाही.
10 Mar 2017 - 2:07 pm | जव्हेरगंज
अजून पायजेल.
10 Mar 2017 - 4:07 pm | वरुण मोहिते
आणि इतकंच लिखाण ?? बोहोत नाइन्साफी है !!!!