वीररस

प्रार्थना प्रिमियर लीग विजयाची

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
1 Sep 2014 - 2:10 pm

पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी.

गणपती बाप्पा काय काय सांगू
आलोय आम्ही मागायला
ते ते सगळं, जे जे लागतं,
प्रिमियर लीग मारायला ||धॄ||

कोच आहे विद्वान खरा
आहे जरा निराळी त-हा
मात्र सगळ्या प्लेयर्सना
शिकवा त्याचं ऐकायला ||१||

संघ टाकतोय कात जरी
नेहमीचीच ही बात जरी
नव्या जुन्याची सांगड तेवढी
मदत करा घालायला ||२||

बुद्धी पास द्यायला आणि
ताकद किक मारायला
जोर थोडा पायांमध्ये
बॉक्स टू बॉक्स धावायला ||३||

वीररसशांतरसकविताक्रीडा

एकलव्य..

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जे न देखे रवी...
26 Jun 2014 - 10:35 am

एकलव्य....
कित्येक शतके उलटली
युगांतरे झाली
सत्तांतर घडले
मी माञ स्थिर आहे
त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत..
कोणी नाकारले म्हणूनच
शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच
मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले
मी धर्नुधर झालो
रक्ताळलेल्या चार बोटांचा
श्रेष्ठ शिष्यही झालो
तेव्हाच;
त्या हाताकडे पाहताना
दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर
पण;
मी डगमगलो ढासळलो
तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात?
तुमच्या सहानुभूतीच्या नजरात?
तुमच्या पाणावलेल्या इतिहासात?
तुमच्या या पराजित युगात...!

करुणवीररसशांतरसकविता

श्रद्धा म्हणजे...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
21 Jun 2014 - 7:23 pm

श्रद्धा म्हणजे आधी असतो
कल्पनांचा भास
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
त्यां'चाच पहिला श्वास

श्रद्धा म्हणजे आधी असतो
जाणिवांचा खेळ
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
फुकट जाणारा वेळ

श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी
दो वक्ताची रोटी
श्रद्धा म्हणजे काही तोंडी
सहज पडलेली बोटी!

श्रद्धा म्हणजे काहिंसाठी
pre plan जुगारी अड्डा
श्रद्धा म्हणजे कुणासाठी
स्वत:च पडायचा खड्डा

श्रद्धा म्हणजे कुणी करतात
ठरवून मोठ्ठी होळी
श्रद्धा म्हणजे कुणी मारतात
ठरवून छुपी अरोळी

वीररससंस्कृतीधर्मकवितासमाज

सेहेवागी पोवाडा

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
30 May 2014 - 11:42 pm

जय हो..
जय हो..
जय हो..
(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!

(गद्य) मृत्युच्या छायेत असतांना..मृत्युच्या छायेत असतांना..
मरणाची धुंदी चढावी..आणि बेधुंssssद मस्ती करावी..हा या शिलेदाराचा जन्मजात स्वभाव..खास बाणा!

वीररससंस्कृतीकलानाट्यसाहित्यिकमौजमजा

माझं मत कुणाला.....

निलरंजन's picture
निलरंजन in जे न देखे रवी...
8 Apr 2014 - 11:43 pm

माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला
त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला
त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला
माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला
माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला
सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला
माझं मत त्याला रे
माझं मत त्याला....

विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)

काहीच्या काही कवितावीररसविडंबनराजकारणचित्रपट

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Mar 2014 - 11:26 am

सूर्य थकला आहे

पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अभय-काव्यअभय-लेखनवाङ्मयशेतीवीररसवाङ्मयकविता

निवडणूका जवळ आल्या सारखे वाटतंय

निलरंजन's picture
निलरंजन in जे न देखे रवी...
2 Mar 2014 - 5:16 pm

निवडणूका जवळ आल्यासारखे वाटतंय
गरीबांची कणव करणारे गल्लोगल्लीत जमलेयं
कैवारी जो तो जनतेचा बनू पाहतोय
पोटात एक ओठात एक अन मनात काही वेगळच साचलयं

पोस्टर फलक बोर्ड नाक्यानाक्यावर लागलेत
इच्छुक आणि समर्थक आता आपले घोडे दामटू लागलेत
निवडून येण्याची स्वप्न आता घडोघडी पडू लागल्यात
जिकण्यासाठीचा हिशेब जे ते ठेवू लागलेत

उमेदवारीच्या खेळात आता वजन आपले लावू लागलेत
हा आपला हा परका डाव पुन्हा नव्याने मांडू लागलेत
आपआपला सवतासुभा मतदार आपले राखू लागलेत
मिटींगा मेऴावे भाषण सभा चौकाचौकात घडू लागलेत

वीररससमाजराजकारण

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 4:09 pm

पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>

शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे

अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे

निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो

मग

कोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसबालकथाविडंबनविनोदऔषधोपचारविज्ञानकृष्णमुर्तीमौजमजा

नाटकी बोलतात साले!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Apr 2013 - 11:07 am

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

अभय-गझलमराठी गझलवीररसअद्भुतरसरौद्ररसकवितागझल

त्यांचाच जीव घे तू ..

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2013 - 10:48 am

त्यांचाच जीव घे तू .....

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलवीररसकवितागझल