वर्तुळ......
हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला.