माम्मा मियाचे गणित : (गणित असले तरी) न बिचकता वाचण्यासारखे, पण घाबरवणारे
(आधीचा संदर्भ: https://misalpav.com/node/46429)
जर १९ फेब्रुवारी २०२० च्या दिवशी आणि थोडे त्या आधी व थोडे त्या नंतर मिलानमधल्या सान सिरो स्टेडियममध्ये एकत्र जमलेल्या आणि त्यानंतर सर्वदूर पांगलेल्या या ४०,००० - ५०,००० फुटबॉलवेड्यांच्या उन्मादाचा परिणाम गणिती दृष्टीनें अभ्यासायचा असेल तर?