एकांकीका : धडा
अंक पहिला / प्रवेश पहिला.
वेळ : सकाळी ७:३०
प्रसंग रोजचाच.
मावशी (किचन मधून) : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे काढुन ठेवलेत, बूट घालून तयार रहा.
नायिका (ओसरीत बुटाला पॉलिश लाण्यात मग्न.) : ह्म्म्म.
मावशी बाहेर येते. नायीका दिवाणखान्यातून दिसत नाहीये.
मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत? अनोखी बस चुकेल.
नायिका (वस्स्क्न खेकसुन): बुटांना पॉलिश करतेय ना?"
मावशी : बरं बरं आटाप लवकर.
प्रवेश दुसरा.
वेळ : सायंकाळ ७:३०
आई : अनोखी, आपण एक नाटक बसवायचय.
नायिका (अभिनयाचं नाव काढताच कळी खुललेली): कसलं? कसलं?
आई : असच घरगुती नाटक आहे. हीरोईन तुझ्या येवढीच शाळेत जाणारी मुलगी.
मिसळपाव
( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.:
२६ जानेवारी १९८७!
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो.