राहणी

माहिती हवी आहे - हिरे, माणिक, मोती, पोवळा

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
25 Dec 2014 - 11:14 am

मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.

माझ्या मनात सध्या असलेले प्रश्नः

इथे कुणी खड्यांच्या मराठी नावासोबत त्यांचे विलायती नावे देऊ शकेल का?

हिरे घ्यायला गेल्यावर ते कारखाण्यात बनवलेले नाहीत (खाणीतून मिळवलेले अस्सल आहेत) यासाठी काय परिक्षा असते?

जीवनमानराहणीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

कथा bigger cypher ची

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in जनातलं, मनातलं
21 Dec 2014 - 5:16 am

एक विचार-
लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे!
यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला.
म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे!

मांडणीसमाजराहणीप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमतप्रश्नोत्तरे

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 1:23 pm

मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे.

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीदेशांतरविचारअनुभव

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

मनात आले ते... तसे...

असा मी असामी's picture
असा मी असामी in काथ्याकूट
3 Dec 2014 - 9:31 am

नमस्कार, मिपा वर लिहण्याचा पहिलाच प्रयत्न.
आज सकाळी कार्यालय मध्ये येताना F.M. वरचे गाणे इतके डोक्यात गेले की मनातली गरळ ओकल्याशिवाय चैन पडनार नाही.

बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
2 Dec 2014 - 12:04 pm

बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे.
लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही.
माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही.
खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.
झालं.

जीवनमानराहणीविचारलेखमतशिफारससल्ला

बदक आले हो अंगणी..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 3:31 pm

इस्पिक एक्कांकडचे पाहुणे पाहून आमच्याकडे खूप पूर्वी आलेल्या पाहुण्यांची फार आठवण आली.
म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख येथे पोस्ट करत आहे-

राहणीअनुभव

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
25 Nov 2014 - 3:56 am

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 12:34 am

सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

धोरणवावरसमाजजीवनमानतंत्रराहणीविचारमत