बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
2 Dec 2014 - 12:04 pm

बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे.
लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही.
माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही.
खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.
झालं.

तर!
आता मुद्द्याकडे वळतो. एक सुरेख क्वोट वाचलं होतं कुठेतरी. 'If your boyfriend skips his leg-day in the gym, dump him.' पायांतील ताकद किती महत्वाची आहे ते हे वाक्य अतिशयोक्तीद्वारे योग्यपणे सुचवतं.

संपूर्ण शरीराचा भार सांभाळणारे पाय मजबूत व बळकट असणं अतिशय महत्वाचं आहे. असं असूनही, हे माहित असूनही अनेक जण, विशेषतः जिम मधे व्यायाम करणारे जण, पायांच्या व्यायामाचा कंटाळा करतात. असो. धागा जिम मधे जाणा-यांसाठी नसून घरी राहून फिट राहू इच्छिणा-यांसाठी आहे. तर; पायांची किंवा लोअर बॉडी ची ताकद छोट्यात छोट्या क्रीयेत महत्वाची ठरते. आणि ती नसली म्हणजे किरकोळ तक्रारी सुरू होतात, जसं की गुडघा दुखतो, चालल्यावर पाय दुखतात इत्यादी.

यासाठी जिमला जायची गरज आहे असं मुळीच नाही. आपल्याला घरी राहूनही आपल्या पायांतील स्नायू बळकट व तंदुरुस्त ठेवणं सहज शक्य आहे. कुठलंही वेगळं साहित्य/उपकरण न वापरता.

यासाठी पाच व्यायामप्रकार इथे सुचवत आहे. मला आवडलेले, मला परिणामकारक वाटलेले. हे नियमितपणे (म्हणजे रोज नव्हे) केल्यास पायांचं बळकटीकरण करणं साध्य होऊ शकेल. याशिवायही अनेक व्यायाम आहेत. पण तूर्तास हे सुचवत आहे.

१) इन्विजिबल चेअर - हा व्यायामप्रकार क्वाड्रासेप्स म्हणजेच मांडीच्या पुढच्या भागातील स्नायूंसाठी आहे. बैठका मारणं काहीजणांना गुडघेदुखी किंवा अतिरिक्त वजन या कारणांमुळे शक्य होत नाही. तेही हा प्रकार सहज करू शकतात.

1

पाठ भिंतीला टेकावी. हात ताठ समोर ठेवावेत किंवा मांडीवर. पाठ सरळ. हळू हळू गुडघ्यातून वाकत शरीर खाली न्यावं. नावाप्रमाणेच, चेअर ही काल्पनिक किंवा अदृश्य आहे. गुडघे काटकोनात येईपर्यंत खाली जाऊन त्या स्थितीत रहावं. जमेल तोवर किंवा ४५ से. - १ मि. पर्यंत. मग हळू हळू पूर्वस्थितीत यावं. आधारासाठी समोर एखादं स्टूल, किंवा खुर्ची ठेवावी जिच्यावर जोर देऊन पूर्वस्थितीत येता येईल (जर आधाराशिवाय जमलं नाही तर). असं तीन वेळा करावं. थोडक्यात, खुर्ची आहे असं समजून खुर्चीत बसल्यासारखं बसणे. घ्यायची खबरदारी, गुडघे काटकोनात किंवा तितकं खाली जाणं जमलं नाही तर विशालकोनात असावेत. पण लघुकोनात नकोत.

२) वॉकिंग लंजेस - लंजेस हा एक उत्तम व्यायाम आहे. प्रामुख्याने मांड्यांचा पुढचा व मागचा भाग याने बळकट होतो. म्हणजेच क्वाड्रासेप्स व हॅमस्ट्रिंग्स. करायला जरा कठीण वाटू शकतो.

2

सुरुवातीची स्थिती म्हणजे सरळ उभे रहाणे. मग एक पाय पुढे टाकून, मागच्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवत खाली बसावं. वर उठत मागचा पाय पुढे नेऊन पहिल्या पायाचा गुडघा खाली टेकवत खाली बसावं. घरातल्या घरात चालत चालत हा प्रकार करता येतो. जागच्या जागीही लंजेस करतात, त्यात फक्त मागचा पाय पुढे न टाकता बसलेल्या स्थितीतून पुन्हा पूर्वस्थितीत यायचं असतं. घ्यायची खबरदारी म्हणजे तुमच्या पुढे टाकलेल्या पायाचा गुडघा, त्या पायाच्या अंगठ्याहून पुढे जाता कामा नये. नाहीतर गुडघ्यावर ताण येऊ शकतो. पाठ नेहमी ताठ असली पाहिजे.

३) काफ रेजेस - कुठेही उभ्या उभ्या होणारा हा व्यायाम आहे. काफ म्हणजेच पोठ-यांसाठी हा व्यायाम असून, केवळ 'चवड्यावर उभे रहाणे' हे त्याचं सोप्पं वर्णन होऊ शकतं.

3

पूर्ण रेंज ऑफ मोशन मिळण्यासाठी एक फूटभर उंचीचं स्टूल घ्यावं. त्यावर उभं राहून चवड्यांवर उभं रहावं, खाली येताना स्टूलाच्या खाली टाचा न्याव्यात, व या स्थितीतून पुन्हा चवड्यांवर उभं रहावं. याने स्नायूच्या आकुंचन प्रसरण या दोनही क्रीया होतात. अजून कठीण करायला हाच प्रकार एक पाय वर घेऊन एका पायाने करावा.

४) स्टिफ लेग्ड डेड लिफ्ट्स - हा खरं तर वजन उचलून करायचा प्रकार आहे. पण त्याशिवायही केल्यास हॅमस्ट्रिंग्स, म्हणजेच मांडीच्या मागच्या स्नायूंवर परिणामकारक ठरू शकतो.

4

सरळ उभे रहावे. शरीराचं वजन मागे टाकत गुडघे किंचित वाकवावेत. व पाठ सरळ ठेवत कमरेतून पुढे वाकावे. साधारण जमिनीला समांतर स्थिती आल्यावर एक सेकंद तशाच स्थितीत राहून हळूहळू शरीर वर आणावे.

५) हिप रेजेस - कमरेखालचा भाग म्हणजेच लोअर बॉडी ही परिभाषा डोळ्यासमोर ठेवून हा व्यायाम सुचवत आहे. हिप्स साठी हा उत्तम व्यायाम आहे. कुणालाही सहज करता येऊ शकतो.

5

सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपावे. हात शरीरालगत असावेत. पाय गुडघ्यात वाकलेले असावेत. हात जमिनीवरच ठेवत कमरेचा भाग वर उचलावा. गुडघ्यापासून ते खांद्यापर्यंतचे शरीर एका रेषेत आणावे. या स्थितीत काही सेकंद राहून हळूहळू शरीर पूर्वस्थितीत आणावे.

हे पाच व्यायाम पायांतील बहुतांश स्नायू कार्यरत करतात, त्यांच्यावर ताण देतात. घरच्या घरी, उपकरणाशिवाय, साधारणपणे कुणालाही जमतील असे हे व्यायाम आहेत. For a building to be strong; the foundation has to be strong. आपल्या शरीराचं फाउंडेशन स्ट्राँग करायला/ठेवायला हे व्यायाम कामी येतात. तेंव्हा, आवडेल, झेपेल त्यांनी करा ! Be fit. Be strong.

जीवनमानराहणीविचारलेखमतशिफारससल्ला

प्रतिक्रिया

चांगलय.
करुन पाहायला पायजे.

विअर्ड विक्स's picture

2 Dec 2014 - 12:12 pm | विअर्ड विक्स

२१ डिसेम्बर ला सेना भवन जवळील कोहिनूर TOWER (५२ माळी ) चढण्याची स्पर्धा आहे. भाग घेतलेला आहे. बघू पायात कितपत ताकत आहे ते ? त्यासाठी व्यायाम सुचवले तर बरे होईल…. सध्या बंगळुरात मुक्काम आहे. स्पर्धेदिवशी मुंबईत धडकायचा विचार आहे.

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 12:29 pm | वेल्लाभट

शिवाय जागच्या जागी धावणे, दोरीउड्या यासारखे कार्डिओ प्रकार केलेत तर स्टॅमिना वाढायला मदत होईल.
स्पर्धेबाबत शंका: रेस आहे की केवळ एकावन मजले चढणे हाच गोल आहे?

कविता१९७८'s picture

4 Dec 2014 - 5:10 pm | कविता१९७८

चढताना तोंडाद्वारे श्वास न घेता नाकानेच घ्या नाहीतर थकायला होईल , आणि घाई घाईत चढु नका सावकाशीनं घ्या, शक्यतो ७-८ व्या मजल्या पासुन घाम यायला सुरुवात होते, माझा २० -२५ माळे चढायचा सराव आहे.चढताना लक्ष वर न ठेवता पायर्‍यांवर ठेवा कारण जास्त मजले चढल्यावर बर्‍याचदा पाय लटपटु लागतात. नी कॅप्स चालत असतील तर चांगल्या प्रतीचे नी कॅप्स घाला, पायात स्पोर्ट्स शुज बरे पडतात.

स्पा's picture

2 Dec 2014 - 12:26 pm | स्पा

हु मिस लेग्स

gfg

धन्यवाद वेल्ला काका , आपल्या हेल्थ फ्रिक ग्रुपवर कधींचा हा विषय सुरु होता
सूड राव कुठे गेले ;)

माझीही शॅम्पेन's picture

2 Dec 2014 - 2:02 pm | माझीही शॅम्पेन

मला पण add करा रे ... मी पण रंनिंग फ्रीक आहे

स्पा's picture

2 Dec 2014 - 2:04 pm | स्पा

व्यनि कर्तोय

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 2:19 pm | टवाळ कार्टा

मला पण अ‍ॅडवा

>>आपल्या हेल्थ फ्रिक ग्रुपवर कधींचा हा विषय सुरु होता

झायरात झायरात करत अजून कसं कोण आलं नाही म्हणे?

आणि इतरांना झैरातबाज म्हणतात ! :)

विअर्ड विक्स's picture

2 Dec 2014 - 12:54 pm | विअर्ड विक्स

अधिक माहितीसाठी खालील पत्ता कळफलकावर टंका.

http://www.skyscraperdash.com/

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 12:55 pm | वेल्लाभट

गॉट इट! विचार चाललाय.....

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 1:59 pm | वेल्लाभट

खरं तर मांगी-तुंगी करून आलेलो असल्याने ४५०० पाय-यांपुढे १२५० मुळीच कठीण वाटत नाहीये...

१)कोणत्या गडावर जाण्याअगोदर हे पायांचे व्यायाम करायचे आहेत?
२)तो पहिला क्वोट विस्कोट करून सांगाल काय? बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे?
३)बसण्यासाठी खुर्ची असतांनाही कळ का काढावी?

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 2:03 pm | वेल्लाभट

गुड क्वेच्चन्स!

१)कोणत्या गडावर जाण्याअगोदर हे पायांचे व्यायाम करायचे आहेत?

लं'गड'

२)तो पहिला क्वोट विस्कोट करून सांगाल काय? बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे?

बॉईफ्रेंड नसण्याची कारणं आधी शोधावीत.

३)बसण्यासाठी खुर्ची असतांनाही कळ का काढावी?

खुर्ची न मिळाल्यास 'कळ'वळण्याची वेळ येऊ नये म्हणून

बॉईफ्रेंड नसल्यास कोणाला कुठे डम्प करावे

=))

मजा आली गुर्जी. बाकी चालू दे.

'वेल्लाभट' यापुढे काही भटकंती असणार या अपेक्षेने धागा उघडला पण टिव्हीवरचा आरोग्य-विचारा-तुम्ही- सांगतो -आम्ही पाहून काही कलाडगती आहे हे खात्री झाली. तरी पायांना चांगलीच गती दिली आहे. आनंद झाला.+10

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 3:22 pm | वेल्लाभट

कमाल करता राव ! :)
धागा 'साहित्य' मधे कशाला टाकला असता, भटकंती असती तर ?
त्यावरून किलिक झालं.... साहित्य मधे धागा असला तरी धाग्यातील व्यायामाला साहित्याची गरज नाही :D
लोळ !

कंजूस's picture

2 Dec 2014 - 5:45 pm | कंजूस

केवळ गम्मत केली हो !

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 5:48 pm | वेल्लाभट

मी गंभीरपणे नायच घेतली

तुषार ताकवले's picture

2 Dec 2014 - 5:38 pm | तुषार ताकवले

पाठदुखीसाठी काही व्यायाम आहेत का? ते केले तरच चालू शकेल.

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 5:45 pm | वेल्लाभट

धाग्यात म्हटल्याप्रमाणे, या बाबत डॉक्टरांस विचारा, ते योग्य राहील.

लेखन आवडले. अदृष्य खुर्चीचा व्यायामप्रकार गेल्या शनिवारीच मुलाने शिकवला. वाट लागली. अजून एक प्रकार शिकलीये पण जमला नाही. मग पुन्हा सूर्यनमस्कार सुरु केले.

सूड's picture

4 Dec 2014 - 2:21 pm | सूड

'If your boyfriend skips his leg-day in the gym, dump him.'

आणि हे

पायांतील ताकद किती महत्वाची आहे ते हे वाक्य अतिशयोक्तीद्वारे योग्यपणे सुचवतं.

यांचा परस्परसंबंध कळेल काय?

वेल्लाभट's picture

4 Dec 2014 - 2:23 pm | वेल्लाभट

अस्मिता म्हणते, "शोधलं; की सापडतंच." तुम्हालाही सापडेल. :D

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 2:34 pm | टवाळ कार्टा

अरेरे अशी शोधाशोध करेपर्यंत वाईट वेळ आली :P

वेल्लाभट's picture

4 Dec 2014 - 2:43 pm | वेल्लाभट

साध्या साध्या गोष्टींचेही भनाट भनाट अर्थ काढणारी मंडळी कमी आहेत का इथं !

मी काढलेला अर्थ सांगितला तर माझा आयडी माझ्या भविष्यातील संभाव्य डूआयडींसकट ब्यान होईल. ;)

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 3:52 pm | टवाळ कार्टा

व्यनीतुन तो अर्थ सगळीकडे पाठवणे ;)

जेपी's picture

4 Dec 2014 - 6:10 pm | जेपी

@टका-
एवढा पण अर्थ माहित नाय. खफवर नजर टाक.मारवा यांनी संयत भाषेत सांगितला आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 7:23 pm | टवाळ कार्टा

@ मारवा

=))

_/|\_

सूड's picture

4 Dec 2014 - 3:31 pm | सूड

>>अस्मिता म्हणते,

कोण ही अस्मिता? आणि तिने तिच्या मुलगामित्राला टाकून दिलं असेल तर त्याचा ती सुविचार वैगरे कसा काय बनवू शकते? ;)

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 3:54 pm | टवाळ कार्टा

इथे १ वाक्य लिहिले असते...पण माझेपण भविष्यातीन डूआयडी गायब होतील :D

अरे सूड, किती ऑब्व्हियस गोष्ट आहे ही. मध्यमपदलोपी का काय म्हणतात तसा स्युडोसमास केलाय इथे. ;)

vikramaditya's picture

4 Dec 2014 - 3:39 pm | vikramaditya

अनेक फायदे असतात. असो. इथेच थांबलेले बरे.

सध्या तीन दिवस योगासने आणि दोन दिवस वेट ट्रेनिंग सुरु आहे

बॅटमॅन's picture

4 Dec 2014 - 6:02 pm | बॅटमॅन

वेट ट्रेनिंगनंतर ड्राय ट्रेनिंगला किती वेळ लागतो म्हणे?

साती's picture

4 Dec 2014 - 7:43 pm | साती

डिपेंड्स तुम्ही वेट ट्रेनिंग करताना किती भिजलाय.
;)

बॅटमॅन's picture

4 Dec 2014 - 7:57 pm | बॅटमॅन

धन्यवाद मॅडम, खूप मोलाची माहिती दिलीत. ;)

-हाणमान.

साती's picture

4 Dec 2014 - 7:42 pm | साती

आता रेखाचित्रे टाकल्याने समजायला एकदम सोप्पं झालंय.
धन्यवाद.
यातले एक आणि पाच नेहमी करते. पाचवा अ‍ॅब्जसाठी उत्तम आहे.
काफ रेजेस करताना स्टूलवरून पडायची भिती वाटेल. नुसत्या जमिनीवर किंवा खरं म्हणजे कट्ट्यावर/पायरीच्या कडेवर उभं राहून करायला सोपा पडेल हा प्रकार.
नुसतेच लंजेस करत होते आता वॉकिंग लंजेस करून बघते.