धोरण

मूलभूत हक्क

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
23 Jan 2014 - 3:04 pm

माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात
. हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .

ओला रुमाल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 7:02 am

"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़
कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित.
वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद.

धोरणसंस्कृती

बंबईसे आया मेरा दोस्त

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
21 Jan 2014 - 11:37 pm

मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते!

पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

धोरणसंस्कृतीजीवनमानतंत्रऔषधोपचारशिक्षणप्रकटनसद्भावनामाध्यमवेधअनुभवमाहितीप्रश्नोत्तरे

तुझी 'माया'च बाकी .......

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
16 Jan 2014 - 5:02 pm

तूच दिलीस साथ
ढासळत्या मनाला,
सावरलेस संकटात
क्षणोक्षणी जीवनाला !!

धडपडून उठतांना तो
जीव कासावीस झाला,
तुझी ‘माया’च बाकी
जीवन उणं होताना !!

ते पंख उबीचे
अन दिलासा मनाला,
दिलीस कल्पना वाईटाची
जरी क्षणिक मोह झाला !!

बोचकरलं परिस्थितीने परी
खंत नव्हती जगण्याला,
गेलो सामोरे त्याला अन
दुःखाचा पराजय केला !!

उन्मादात जगणं व्हावं
आणि पेटावं उमेदीला,
जिद्दीला मायेची जोड हवी
जीवन सफल करण्याला !!

- साजीद यासीन पठाण

धोरण

आय ए एस आणि शेतकरी

Rahul Bhuskute's picture
Rahul Bhuskute in काथ्याकूट
12 Jan 2014 - 7:50 pm

माझ्या ओळखीचे एक व्यक्ती सतत म्हणायचे की आजकालचे आय ए एस ऑफिसर हे सगळॅ कॉन्व्हेन्ट मधले आहेत आणि त्यान्चा सामान्य माणसाच्या जीवनाशी / शेतकर्यान्च्या जिव्हाळ्याच्या प्रश्नान्शी काहीही सम्बन्ध न आल्याने सगळी नोकरशाही व किम्बहुना राज्यव्यवस्था कुचकामी व कागदी बाहुली ठरते ...

हे मला बर्याच अन्शी पटले .

खरोखर एखादा शेतकर्याचा मुलगा आय ए एस झाला , किम्वा आय ए एस परीक्षे मध्ये येणारे प्रश्न शेती/शेतकरी व त्यान्च्या समस्या या सन्दर्भात असले , तर परिस्थितीत काही फरक पडू शकेल का?

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
10 Jan 2014 - 11:38 am

गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली.

जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!!

"एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

धोरणइतिहासकवितागझलसमाजदेशांतरराजकारणछायाचित्रणप्रकटनसद्भावनाआस्वादमाध्यमवेधमदत

जे का रंजले गांजले

Rahul Bhuskute's picture
Rahul Bhuskute in काथ्याकूट
8 Jan 2014 - 4:09 pm

आमटे हे कुटुंब हे खरोखर आदरणीय आहे. बाबा आमटेंची मुले (डॉ. प्रकाश आमटे) हेच त्या आदिवासींच्या शाळेत शिकले व कुठलही आधुनिक सोविसुविधा नसताना डॉक्टर बनवून दाखवले. जिथे कुष्टरोग म्हटले तर आपल्या अंगावर काटा येतो व त्यांच्या जवळ पण जायची भीती वाटते. अश्या लोकांना आपले म्हणून जवळ केले व ते समाज कार्य केले ते खरोखर वंदनीय आहे. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." जेंव्हा सरकारांनी ९ वरील gas सिलेंडर वरील अनुदान रद्द केले तेंव्हा डॉ. प्रकाश आमटेनी असे सांगितले कि आम्हाला गस सिलेंडर भरपूर लागतात व सिलेंडर मध्ये आमचे खूप पैसे खर्च होतील.

चैतन्य -चूर्ण

Rahul Bhuskute's picture
Rahul Bhuskute in काथ्याकूट
2 Jan 2014 - 6:20 pm

नमस्ते मंडळी

माझा पेशा अध्यापन असला तरी मी समाजाच्या कष्टकरी वर्गातूनच आलेलो आहे .

हा मिसळपाव . कॉम वर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे

तर आजचा मुद्दां असा आहे की तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून सरकार असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ,की त्याना देशातील जनतेच्या आरोग्याची फारच काळजी आहे …। इत्यादी .

परंतु ग्यानबाची मेख अशी की सिगारेट व दारू महाग आणि कथित उच्चभ्रू व्यसनांवर कोणी बंदीची कुर्हाड आणू इच्छित नाही .

भ्रामक मायाजाल

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
2 Jan 2014 - 6:56 am

नुकत्याच दोन बातम्या आल्या

साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_...

2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha...

कारण जीवन हे लोणचं आहे...

भिकापाटील's picture
भिकापाटील in जे न देखे रवी...
31 Dec 2013 - 12:45 pm

कधी गोड, कधी तिखट आहे
कधी खारट, कधी तुरट आहे
कारण जीवन हे लोणचं आहे...||१||
...
लोणचं पूर्ण मुरल्यावर
चांगला लागतं खाल्ल्यावर
जीवन पूर्ण जगल्यावर
टेकतो आपण मरणावर ||२||

लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार
जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार
लोणचं जसं testy लागतं
तसच जीवन हे फार कष्टी असतं
कारण जीवन हे लोणचं आहे....||३||

लोणच्याला राहायला जशी बरणी लागते
तसच जीवन जगायला धरणी लागते
लोणचं जसं कधी ना कधी संपतं
तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं
कारण जीवन हे लोणचं आहे....||४||

धोरण