नुकत्याच दोन बातम्या आल्या
साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_...
2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha...
काही महिन्यापूर्वी झालेल्या दाभोळकर हत्येबाबतही सनातन वर भरपूर गरळ मीडियातून ओकण्यात आले ,परंतु आजतागायत एकाही सनातन कार्यकर्त्या विरुद्ध ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत , त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही धार्मिक संघटनेचा हात या कृत्यात नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले होते .
गुजरात मध्ये गोध्रा हत्याकांडांनंतर उसळलेल्या दंगलीत तेथील स्थानिक हिंदूंनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारास " अल्पसंख्यांका वरील हल्ले" ठरवून गेली 14 वर्षे हेच ढोंगी सेक्युलरवादी अन मीडिया ,नरेंद्र मोदींना "मौत का सौदागार " ठरवून ढोल बडवत आहेत . पण परवाच मोदींनाही क्लीन चिट मिळालेली आहे .
शंकराचार्य प्रकरणातही त्यांच्यावर असलेले हत्येचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झालेले आहे .
एकंदरीत सर्व प्रकरणांचा आढावा घेता ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया हे साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार करत असल्याचे लक्षात येते . दिग्गी भाऊनी आणि सुशील कुमारनी तर "भगवा आतंकवाद" वगैरे पर्यन्त मजल मारली होती.याचा अर्थ येनकेन प्रकारेण खोटेनाटे आरोप करून भगव्या संघटनांना / नेत्यांना "मारेकरी" ठरवून बदनाम करायचे आणि लांगूलचालन करून निवडणूकात मतांची पोळी भाजून घ्यायची ,असे साधे सोपे "व्होट-बँक पॉलिटिक्स " या सगळ्या प्रकारामागे आहे हेच सिद्ध होते .
प्रश्न हा आहे की सामान्य जनता या ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया यांनी फेकलेल्या भ्रामक मायाजालातून बाहेर पडून सामान्य जनता खरे मुद्दे काय आहेत ते समजून घेईल का ? आणि येत्या निवडणुकीत Good Governence आणि विकास हे मुद्दे सातत्याने लावून धरणार्या पक्षाला निवडून देईल का?
प्रतिक्रिया
2 Jan 2014 - 9:20 am | ऋषिकेश
शेवटी CBI म्हणजे काय सरकारी पिंजर्यातील पोपट. सरकार म्हणेल तसे वागणार! हो ना?
2 Jan 2014 - 2:31 pm | मारकुटे
सहमत आहे
2 Jan 2014 - 2:51 pm | म्हैस
सह्मत . गुजरात दंगलींबद्दल ओरड करणारे . ह्या दंगलींना घडलेल्या कारणाबद्दल मात्र बोलत नाहीत. तुम्ही हिंदूंना कोंडून जिवंत जाळून मारा पण त्यांनी त्याचा प्रतिकार करायचा नाही असं म्हणायचंय व्होट-बँक पॉलिटिक्स वाल्यांना
2 Jan 2014 - 6:44 pm | रमेश भिडे
सहमत
2 Jan 2014 - 10:31 pm | विद्युत् बालक
नाही हो रेल्वे चे डबे हे परग्रह वासियांनी जाळले होते म्हणून तर त्या हत्याकांडा बद्दल ब्र पण काढला जात नाही !