✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुझी 'माया'च बाकी .......

P — psajid, गुरुवार, 01/16/2014 - 17:02
तूच दिलीस साथ ढासळत्या मनाला, सावरलेस संकटात क्षणोक्षणी जीवनाला !! धडपडून उठतांना तो जीव कासावीस झाला, तुझी ‘माया’च बाकी जीवन उणं होताना !! ते पंख उबीचे अन दिलासा मनाला, दिलीस कल्पना वाईटाची जरी क्षणिक मोह झाला !! बोचकरलं परिस्थितीने परी खंत नव्हती जगण्याला, गेलो सामोरे त्याला अन दुःखाचा पराजय केला !! उन्मादात जगणं व्हावं आणि पेटावं उमेदीला, जिद्दीला मायेची जोड हवी जीवन सफल करण्याला !! - साजीद यासीन पठाण

प्रतिक्रिया द्या
1186 वाचन

💬 प्रतिसाद (3)

बहोत खुब! किती छान लिहितोस!

आयुर्हित
गुरुवार, 01/16/2014 - 19:09 नवीन
दिलीस कल्पना वाईटाची जरी क्षणिक मोह झाला !! किती छान लिहितोस! सर्वांना असी विवेकशील माया मिळो हीच प्रार्थना त्या सर्वेश्वराला!! बोचकरलं परिस्थितीने परी खंत नव्हती जगण्याला, गेलो सामोरे त्याला अन दुःखाचा पराजय केला !! बहोत खुब! खूप छान! लढाऊ वृत्तीच हवी जीवन जगतांना, हेच खरे! दोन बदल सुवावेसे वाटतात: १) जीव कासावीस झाला धडपडून उठतांना, तुझी ‘माया’च बाकी जीवन उणं होताना !! यात यमक साधले जाईल असे वाटते. २) उन्मादात जगणं व्हावं साजिद पेटावं उमेदीला, जिद्दीला मायेची जोड हवी जीवन सफल करण्याला !! असे जर कवीचे नाव पद्यात आले तर कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहते. चू.भू.दे.घे. आपला मिपास्नेही :आयुर्हीत
  • Log in or register to post comments

अभिप्रायाबद्दल धन्यवाद !

psajid
Sat, 01/18/2014 - 11:32 नवीन
तुम्ही सुचवलेला बदल स्वागतार्ह वाटतो.
  • Log in or register to post comments

भावना पोचली

पैसा
Tue, 01/21/2014 - 21:54 नवीन
शब्दयोजना जरा जास्त व्यवस्थित अशा वृत्तात करता आली तर बघा. म्हणजे चांगल्या कल्पनेचं सादरीकरण पण तसंच लयीत आणि मात्रांमधे बसणारं असेल तर जास्त छान. तुमची कविता मुक्तछंदात नाही त्यामुळे ती वृत्तबद्ध असावी ही सूचना आवडली तर पुढल्या वेळी अमलात आणून बघा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा