~आज मला शब्द व्हायचय~
~आज मला शब्द व्हायचय~
आज मला शब्द व्हायचय
पुस्तकात बसून अर्थात न्हायचय
मग अरण असो कि सल असो
सगळ्यांनी फक्त मलाच पहाचय
……. आज मला शब्द व्हायचय
कधी कोणाच्या आठवणीत
तर कधी कोणाच्या बातवणीत
खरच मला कवितेत जायचंय
शब्द बनून ओठांवर रहायचय
……. आज मला शब्द व्हायचय
भूक माझी फारच थोडी
फक्त मला अर्थांना खायचय
रेघा रेघांचे शरीर फक्त
सल्लज्ज अश्या एका ओळीत रहायचय
……. आज मला शब्द व्हायचय